आजच्या नवनवीन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटींग च्या युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामध्ये च फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब हे लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्क बनले आहेत आणि या सोशल मीडिया चा वापर खूप लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात करतात. यामध्ये Social Media Influencer, Facebook Influencer आणि Instagram Influencer, YouTube Influencer हे शब्द खूप वेळा कानावर पडतात.
परंतु बऱ्याच लोकांना Influencer बद्दल माहिती नसेल? त्यामुळे आपण या लेखामध्ये आपण Influencer म्हणजे काय? आणि Social Media Influencer काय असते? याबद्दल संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन मराठी मधून जाणून घेऊ. (Influencer and Social Media Influencer information in Marathi)
Influencer म्हणजे काय? | What is Influencer Meaning in Marathi
Influencer चा मराठी अर्थ प्रभाव पाडणे किंवा प्रभावित करणे असा होतो. म्हणजेच एखादी व्यक्ती त्याच्या बोलण्याने, वागण्याने किंवा कृतीने दुसऱ्या व्यक्तींना प्रभावित करत असेल तर त्या व्यक्तीला Influencer असे म्हटल्या जाते. तसेच Influencer म्हणजे प्रभाव पाडणारा व्यक्ती किंवा प्रभावित करणारा व्यक्ती.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? | Social Media Influencer in Marathi
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मिडिया चा वापर करून विविध लोकांना प्रभावित करणे होय. विविध सोशल मिडिया वर पेजेस, खाते तयार केले जाते आणि या पेजेस च्या साहाय्याने विविध प्रकारची इंटरेस्टिंग माहिती पोस्ट केल्या जाते.
जर ही माहिती उपयोगी आणि लोकांना आवडत असेल तर तुमच्या सोशल मीडिया पेज किंवा अकाउंट च्या माध्यमातून मोठ्या संख्येने लोक प्रभावित होतील आणि पेज ला लाईक किंवा फॉलो करतील.
तसेच याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फॉलोवर्स ला विविध गोष्टीबद्दल माहिती देता येते. आणि त्यामध्येच जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल माहिती देऊन तो प्रॉडक्ट खरेदी करण्यास प्रभावित केले तर तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता.
इन्फ्लुएंसर सोशल मीडिया अकाउंट वर विविध प्रकारच्या पोस्ट करतो आणि लोकांपर्यंत पोहचतो. तसेच मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स बनवतो आणि विविध प्रकारे मार्केटींग करत असतो. तसेच विविध प्रकारच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला प्रमोट करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो. तसेच Influencer फेसबुक, इंस्टाग्राम, आणि युट्यूब, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि पैसे कमवतात.
Influencer Marketing म्हणजे काय? | Influencer Marketing in Marathi
Influencer कडे त्याच्या फॉलोवर्स च्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग असतो म्हणून विविध प्रकारच्या नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी इंफ्लुएंस विपणन चा वापर केला जातो. मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची मार्केटींग करण्यासाठी Social Influencer सोबत जुळतात आणि इन्फ्लुएंसर लक्षित ग्राहक वर्गापर्यंत त्यांच्या प्रॉडक्ट ची मार्केटींग करतो.
Influencer बनण्याचे फायदे | Benefits of Influencer
इंफ्लुएंसर बनण्याचे खूप सारे फायदे आहेत पण आपण काही महत्वाचे फायदे पाहुयात.
1. इन्फ्लुएंसर झाल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते म्हणजे आपण Popular होतो.
2. सोशल मीडिया इंफ्लुएंसर मुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे कमविता येतात. यामध्ये प्रॉडक्ट प्रमोट आणि मार्केटींग करून पैसे कमविता येतात.
3. जर आपण इंफ्लुएंसर बनलो तर आपण स्वतःचे प्रॉडक्ट तयार करून त्या प्रॉडक्ट ला सेल करू शकतो. आणि स्वतःचा ब्रँड तयार करू शकतो.
अश्या प्रकारे खूप फायदे इंफ्लुएंसर बनल्यामुळे होतात.
>> आणखी माहिती वाचा – Freelancing म्हणजे काय संपूर्ण माहिती
Influencer पैसे कसे कमवितो? | How to Influencer Earn Money
Influencer सोशल मीडिया मध्ये विविध प्रकारच्या प्रॉडक्ट ला त्याच्या खात्यावर प्रमोट करत असतो त्याचप्रमाणे जो प्रॉडक्ट प्रमोट करायचा आहे त्या कंपनी सोबत भागीदारी करतो त्यामुळे influencer च्या माध्यमातून जेवढे प्रॉडक्ट विकले जातील त्यावर influencer ला कमिशन प्राप्त होते. अशाप्रकारे Influencer पैसे कमवू शकतो.
Influencer कीती पैसै कमवितो?
इन्फ्लुएंसर सोशल मीडिया मधून किती पैसे कमवू शकतो हे सर्व त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर असलेल्या फॉलोवर्स वर अवलंबून असते. जर Influencer चे सोशल मीडिया खात्यावर फॉलोवर्स कमी प्रमाणात असतील तर तेव्हा जास्त पैसे कमवू शकणार नाहीत आणि जर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स असतील तर मोठ मोठे ब्रँड्स जाहिराती साठी संपर्क साधतील आणि मोठ्या प्रमाणात पैसे सुद्धा देतील.
निष्कर्ष
अश्या पद्धतीने Influencer म्हणजे काय? आणि Influencer Marketing मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
जर तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर कमेंट करा आणि शेअर सुध्दा करा.
🙏धन्यवाद!!!🙏