मागील पोस्ट मध्ये आपण बँक म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे, कदाचित तुम्ही वाचली सुद्धा असेल. पण आजच्या या पोस्ट मध्ये आपण बँकेचा सर्वात महत्वाचा असलेला IFSC CODE या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. यामध्ये या कोड चा कसा वापर केल्या जातो, त्याचे महत्व काय? अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग मध्ये पाहूया.
सध्या, भारतात एकूण 34 बँका आहेत त्यापैकी 12 भारतीय सरकारी बँका आहेत आणि उर्वरित 22 खाजगी क्षेत्रातील बँका आहेत.
भारतातील या सर्व बँकांचा एक विशिष्ट IFSC कोड आहे, हा IFSC कोड हा एक विशिष्ट ओळख कोड आहे जो कोणत्याही विशिष्ट बँक खात्याची बँक आणि शाखा ओळखण्यासाठी वापरला जातो आणि NEFT, RTGS आणि IMPS सारख्या बँक हस्तांतरण प्रणालींमध्ये वापरला जातो.
IFSC Code म्हणजे काय? | IFSC Code Information in Marathi
IFSC Code चा फुल्ल फॉर्म भारतीय वित्तीय प्रणाली कोड म्हणजेच (Indian Financial System Code) असा होतो. या कोड ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे नियुक्त केल्या जाते. या कोड मध्ये ११ (Digit) अंक असतात त्यामधील काही डिजिट हे न्यूमरिक तर काही डिजिट हे अल्फाबेट असतात म्हणून याला अल्फान्यूमेरिक कोड म्हटलं जात.
या कोड मध्ये सुरुवातीला जे अल्फाबेट डिजिट असतात ते बँकेच्या नावाचे समर्थन करतात, आणि बाकी कोड हा न्यूमेरिक स्वरूपात असतो. IFSC च्या माध्यमातून भारतात इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच इंटरनेट बँकिंग ची सुविधा प्रदान केली जाते.
त्याचबरोबर हा कोड भारतातील तीन मुख्य पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टममध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक बँक शाखेची ओळख करतो. यामध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT), रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) या मुख्य पेमेंट प्रणाली चा समावेश होतो.
IFSC Code चा उपयोग | Uses of IFSC Code in Marathi
IFSC कोड चा वापर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT), रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) आणि सेंट्रलाइज्ड फंड्स मॅनेजमेंट सिस्टम (CFMS) इत्यादी प्रकारच्या सेवेमध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट ची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्सफर करण्यासाठी IFSC कोड चा वापर करते, IFSC Code शिवाय कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर व्यवहार होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे या कोड शिवाय बँक खाती ओळखणे, विविध बँकांमध्ये पैसे हस्तांतरित करणे शक्य नाही. तथापि, एकाच बँकेत IFSC कोडशिवाय पैसे हस्तांतरित करणे शक्य आहे.
बँकेचा IFSC Code कसा शोधायचा | How to Find IFSC Code Marathi
तुमच्या बँकेचा IFSC कोड शोधणे खूप सोपे काम आहे, तुम्ही बँकेचे नाव आणि तिचे स्थान ओळखल्यास, तुम्ही RBI च्या वेबसाइटवर जाऊन बँकेचा IFSC कोड ऑनलाइन शोधू शकता. तसेच तुम्ही बँकेला फोन करून विनंती करू शकता.
लाभार्थीच्या बँक स्टेटमेंट आणि चेकवर आयएफएससी कोड दिलेला असतो, तुम्ही तुमच्या बँकेचे नाव आणि शाखेचे नाव टाइप करून Google वर तुमचा IFSC कोड देखील तपासू शकता. तसेच गूगल या सर्च इंजिन वर IFSC Code सर्च करून तुम्ही बँकेची शाखा, नाव आणि ठिकाण देखील माहित करू शकता.
तसेच बँकेचा IFSC कोड शोधान्यासाठी तीन पर्याय खालील प्रमाणे स्पष्ट केले आहेत.
- Check Book – तुमच्या बँकेच्या चेक बुक वर तुमचा IFSC code ठळक अक्षरांमध्ये दिलेला असतो, काही बँकेच्या चेक बुक वर तो खाली दिलेला असतो तर काही बँकेच्या चेक बुकमध्ये तो वरती असतो परंतु नीट बघितलाच तर तो तुम्हाला लगेच दिसेल.
- Bank Account Passbook – जेव्हा आपण कोणत्याही बँकेत खाते ओपन करतो तेव्हा बँकेकडून आपल्याला एक प्रकारची खाते पुस्तिका दिली जाते त्यामध्ये आपण बँकेचे सर्व व्यवहारांची नोंद केल्या जाते, याच खाते पुस्तिकेवर अकाउंट नंबर, आपले नाव, पत्ता, शाखेचा पत्ता, एमआरसीआर कोड, आणि आयएफसी कोड अश्या सर्व प्रकारची माहिती दिलेली असते.
- Google Search Engine – त्याचप्रमाणे तुम्ही वेबसाइटच्या मदतीने सुद्धा आयएफसी कोड सहज प्राप्त करू शकतात, सर्च इंजिन मध्ये IFSC Code वेबसाईट सर्च करावी, तिथे उपलब्ध असलेल्या यादी मधून तुमची बँक निवडावी, त्यानंतर राज्य, जिल्हा आणि तालुका निवडून तुमच्या बँकेच्या शाखेचे नाव शोधताच तुम्हाला तेथे आयएफएससी कोड प्राप्त होईल.
अश्या विविध प्रकारे आपण IFSC Code प्राप्त करू शकतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
IFSC CODE चा फुल्ल फॉर्म काय? | IFSC Code full form in Marathi
IFSC Code ला मराठी मध्ये भारतीय वित्तीय प्रणाली कोड आणि इंग्लिश मध्ये Indian Financial System Code असे म्हटले जाते.
IFSC कोडमध्ये किती अंक असतात?
या कोड मध्ये ११ (Digit) अंक असतात त्यामधील काही डिजिट हे अल्फाबेट तर काही डिजिट हे न्यूमेरिक असतात.
IFSC Code चे उदाहरण काय आहे?
IFSC Code – SBIN0000454
वरील प्रमाने दिलेल्या IFSC Code चे सुरुवातीचे चार वर्ण आहेत, जे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला संदर्भित करतात, आणि शेवटची सहा अक्षरे हि बँकेच्या विशिष्ट शाखेचा संदर्भ देतात, तसेच तुम्ही जर हा कोड गूगल वर सर्च केला तर तुम्हाला या कोड ची शाखा पुणे हि आहे.
मला IFSC कोड ची गरज कधी पडेल?
IFSC Code वापर RTGS (Real Time Gross Settlement), NEFT (National Electronic Funds Transfer) आणि IMPS (Immediate Payment Service)या इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणालीद्वारे रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.
परिणामी, प्रत्येक वेळी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे हस्तांतरणाचे व्यवहार करताना IFSC कोड खूप आवश्यक असतो.
IFSC कोडचे महत्त्व काय आहे?
IFSC कोड हा बँकिंग व्यवहारांचा आधारस्तंभ आहे, हा कोड महत्वाचा आहे कारण
• या कोड द्वारे एका विशिष्ट बँकेच्या शाखेची ओळख करण्यास मदत करते.
• पेमेंट ट्रान्सफर त्रुटी दूर करण्यात मदत करते.
• NEFT, RTGS आणि IMPS असे इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्यासाठी या कोड चा वापर केला जातो.
निष्कर्ष | IFSC Code Meaning in Marathi
अश्या प्रकारे आपण बँकेच्या IFSC Code बद्दल संपूर्ण आणि महत्वाची माहिती जाणून घेतली आहे, त्यामध्ये IFSC कोड म्हणजे काय? हा कोड कसा शोधायचा, त्याचा उपयोग इत्यादि बाबींचा अभ्यास केला,
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला तुमच्या गरजेची माहिती या लेखामध्ये मिळाली असेलच, तरी तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी आहे याबद्दल कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि या ब्लॉग पोस्ट ला तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा.
धन्यवाद !!