ई-बुक म्हणजे काय? | E-book Information in Marathi

ई-बुक म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या ज्ञानमय प्रवासामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी रोजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच अल्पशा विश्रांतीची आवश्यकता असते. या विश्रांतीच्या काळामध्ये लोक आपापले छंद जोपासतात, जसे की कोणी गाणी ऐकते तर कोणी पुस्तके वाचते.

वाचन हा बऱ्याच लोकांचा आवडता छंद आहे  पण अवांतर वाचनाची पुस्तके ही एकतर खूपच मोठी किंवा जड असतात, त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना रोज बस अथवा ट्रेन मधून प्रवास करताना पुस्तके सोबत नेता येत नाहीत.  

यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे ई-बुक होय. यासाठी तुम्हाला कुठेही पुस्तक सोबत नेण्याची गरज पडत नाही, तर ते पुस्तक तुमच्या मोबाईल मधेच असते याच टॉपिक बद्दल आपण आजच्या पोस्ट मध्ये माहिती पाहूया. यामध्ये E-book म्हणजे काय? या बद्दल संपूर्ण माहिती करून घेऊया. 


ई-बुक म्हणजे  काय? | E-book Meaning in Marathi

एखाद्या छापील पुस्तकाची सॉफ्ट कॉपी म्हणजेच ई-बुक होय, eBook ला मराठी मध्ये इलेक्ट्रॉनिक पुस्तक (Electronic Book) असे देखील म्हटले जाते. ज्याप्रमाणे आपण महत्त्वाचे दस्तऐवज स्कॅन करून मोबाईल मध्ये पीडीएफ फॉरमॅटमध्ये ठेवत असतो, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या लोकप्रिय पुस्तकाची पीडीएफ तयार करून ती ई बुक च्या स्वरूपात उपलब्ध होत असते. 

आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मार्फत ई पुस्तक वाचण्यासाठी अनेक असे ॲप्स डाऊनलोड करू शकतो ज्याद्वारे ई-बुकचे वाचन सोपे होते. एखादे पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेणे आणि त्याचे वाचन झाले की ते परत करणे अशी पद्धत आहे, पण मात्र ज्यांना ग्रंथालयात जाणे शक्य आहे ते या पद्धतीचा वापर करतात आणि ज्यांना ग्रंथालयात जाणे शक्य होत नाही ते E-Book चा वापर करतात.

सध्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या अफाट प्रगतीमुळे तुम्हाला ऑनलाईन पुस्तके मागवता येतात, किंवा ई -बुक आपल्या मोबाईल मध्ये घेऊन त्याचे वाचन करता येते. तसेच तुम्ही या ई-पुस्तकाचे वाचन संगणक, लॅपटॉप, आणि मोबाईल च्या साहाय्याने करू शकता. 

 ई-बुक बद्दल संपूर्ण माहिती

काही लोकांना लेखनाची खूप आवड असते परंतु लिखाण करून त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा विचार केला तर त्याला खूप खर्च लागतो. पण Electronic Book प्रोव्हाइड करणाऱ्या ऍमेझॉन किंडल या प्लॅटफॉर्म ने नवीन लेखकांसाठी लिखाण करण्याची एक सोय आणि संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये विविध लेखक या प्लॅटफॉर्म वर स्वतः लिहिलेले eBook विनामूल्य प्रकाशित करू शकतात, यामुळे ज्या लोकांना लेखनाची आवड आहे त्यांच्यासाठी एक उत्तम संधीच आहे. 


ई -बुक चे फायदे | E-Book Benefits in Marathi

  1. जेव्हा आपण बाजारामध्ये पुस्तक खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा त्या पुस्तकाची किंमत ईबुक च्या तुलनेत खूप जास्त असते, कारण या कागदी पुस्तकांना छपाईचा खर्च आणि इतरही खर्च असतो. पण E-Book ला मात्र अश्या प्रकारचा काहीही खर्च नसल्यामुळे त्याला अगदी थोड्या किमतीमध्ये आपण घेऊ शकतो आणि वाचन करू शकतो. 
  2. ई बुक चे वाचन आपण कोणत्याही ठिकाणी करू शकतो तसेच ईबुक चे वाचन करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पुस्तक जवळ बाळगावे लागत नाही, कारण ई बुक आपल्या मोबाइल मध्ये साठवून ठेवल्या जाते. 
  3. त्याचप्रमाणे बाजारपेठेत एखादे पुस्तक खरेदी करायला गेले तर ते पुस्तक आपल्याला मिळेलच असे नाही कारण जर पुस्तकांचा तुटवडा भासला तर आपल्याला हवे ते बुक मिळू शकत नाही पण ई पुस्तकांचा कधी तुटवडा भासत नाही हे ई पुस्तक तुम्ही कधीही, कोठेही अगदी काही क्षणात मिळवू शकता. 

आणखी माहिती वाचा – ब्लॉग कसा सुरु करायचा संपूर्ण माहिती


ई बुक कसे तयार करावे? | How to Create an eBook

  • सर्वप्रथम लेखकाने canva.com या लिंक वर क्लिक करून तिथे दिलेली सर्व वैयक्तिक माहिती भरून आपले अकाउंट बनवायचे आहे.
  • त्यानंतर ईबुक चे लेखन करण्यासाठी सर्च या ऑप्शनवर जाऊन तेथे ई-बुक टाईप करा आणि नंतर ई बुक साठी आकर्षक अशी डिझाईन सिलेक्ट करा.  
  • सिलेक्ट केलेल्या डिझाईन मध्ये आपल्या पुस्तकाचे लेखन सुरू करायचे आहे लेखन सुरू करण्यासाठी टेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट करून तिथे आपलं लिखाण सुरू करा.
  • यामध्ये तुम्ही हव्या त्या ठिकाणी चित्रे देखील काढू शकता, त्यामध्ये आपल्या आवडीचा कलर बॅकग्राऊंड, अक्षरांची मांडणी त्यांचे लिखाण हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये देखील तुम्ही करू शकता.
  • आपले ईबुक लिहून तयार झाल्यावर त्या ई-बुकला नाव देऊन शेजारी दिलेल्या डाउनलोड बटनावर क्लिक करायचे. डाऊनलोड करण्यासाठी आपल्यासमोर अनेक पर्याय विविध फॉरमॅटमध्ये उपलब्ध असतील. तुम्हाला हवा तो फॉरमॅट तुम्ही सिलेक्ट करावा व आपले ई-बुक डाऊनलोड करून घ्यावे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

ई-पुस्तक (E-Book) कशास म्हणतात?

एखाद्या छापील पुस्तकाची सॉफ्ट कॉपी म्हणजेच ई-बुक होय, E book ला मराठी मध्ये इलेक्ट्रॉनिक पुस्तक (Electronic Book) असे देखील म्हटले जाते. आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मार्फत ई पुस्तक वाचण्यासाठी अनेक असे ॲप्स डाऊनलोड करू शकतो ज्याद्वारे E book चे वाचन सोपे होते.

ई-बुक विक्री करून कमवीता येतात का?

ई पुस्तकाची ऑनलाईन विक्री करून पैसे कामविता येतात, यामध्ये ॲमेझॉन किंडल या ॲप द्वारे तुम्ही तुमच्या लिहिलेल्या ई-बुकची विक्री करू शकता व पैसे कमवू शकता. जर तुमच्या ई बुक ची विक्री झाली तर यामधील काही रक्कम ही ॲमेझॉन किंडल कडे ठेवली जाते व उरलेली रक्कम ही लेखकाला दिली जाते.

सर्वोत्तम ई-बुक रीडर ॲप्स कोणते आहेत?

Amazon Kindle App
Google Play Books
Free-Ebooks.net
FBReader
Scribd
Bluefire Reader


निष्कर्ष | What is eBook in Marathi

अश्या प्रकारे आपण ई-बुक याबाबत सविस्तर मराठी माहिती वरील लेखामध्ये बघितली आहे, आम्हाला आशा आहे कि वरील सर्व माहिती तुम्हाला समजलीच असेल आणि जर तुम्हाला वरील माहितीमध्ये तुम्हाला काही समस्या असेल तर नक्कीच आम्हाला विचार.

तसेच ई बुक बद्दल संपूर्ण माहिती हा लेख तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना सुद्धा महत्वाच्या आणि उपयोगाच्या माहितीचा लाभ घेऊ द्या. 

धन्यवाद!

Leave a Reply