MBA Full Form in Marathi | MBA म्हणजे काय?

MBA चा फुल फॉर्म

MBA म्हणजे काय? । What is MBA in Marathi 

MBA ही व्यवसाय प्रशासनातील मास्टर डिग्री आहे, यात पहिल्या वर्षी आपणास व्यवसाय व्यवस्थापनाविषयी काही प्राथमिक स्वरूपाची बेसिक माहिती दिली जाते. अणि मग द्वितीय वर्षात आपण खालील पैकी कुठल्याही एका क्षेत्रात बिझनेस मॅनेजमेंट एम बीए मध्ये स्पेशलायझेशन करू शकतो.

उदा, मार्केटिंग फायनान्स, आॅपरेशन मॅनेजमेंट, हेल्थ केअर मॅनेजमेंट, आॅथरप्रिनरशीप इत्यादी 

एमबीए ही एक पदव्युत्तर पदवी आहे. ही पदवी बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करीअर करण्यासाठी तसेच मोठमोठ्या कंपन्या मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. पदवीचे शिक्षण प्राप्त केल्यानंतर ज्यांना व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रामध्ये (Business Management) आपले करीअर करायचे आहे असे तरूण तरुणी या कोर्स  ला अॅडमिशन घेत असतात.

MBA फुल्ल फॉर्म । MBA Full form in Marathi

MBA चे संक्षिप्त रूप म्हणजे मास्टर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Master of Business Administration) असा होतो हि एक बॅचलर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच BBA ची मास्टर डिग्री आहे. 

एमबीए ला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपले सर्वप्रथम पदवी प्राप्त करणे गरजेचे असते. एमबीएला अॅडमिशन घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागते ज्यात कॅट, मॅट, सॅट इत्यादी परीक्षा समाविष्ट असतात.

एमबीए ला कला, विज्ञान आणि वाणिज्य या कुठल्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स आपण फुलटाईम किंवा पार्ट टाइम देखील करू शकतो.


MBA पदवी घेण्याचे प्रकार | MBA Meaning in Marathi

  1. एमबीए इन फुलटाईम – हया कोर्सचा एकुण कालावधी एकुण दोन ते तीन वर्षे इतका आहे, यालाच एमबीए रेग्युलर असे देखील म्हटले जाते. यात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपणास पदवीमध्ये किमान ५० टक्के प्राप्त करणे आवश्यक असते.
  2. पार्ट टाइम एमबीए – नोकरी करण्यासोबत तात्पुरता पार्ट टाइम एमबीए करू शकतो.
  3. इव्हनिंग एमबीए – ह्या एमबीए कोर्स मध्ये संध्याकाळी काॅलेज भरत असते, इव्हनिंग एमबीए हा एक फुलटाईम एमबीए कोर्स आहे.
  4. एक्झिक्युटिव्ह एमबीए – हा एमबीए कोर्स करण्यासाठी आपल्याकडे एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील एखाद्या नामांकित कंपनीत तीन चार वर्षे काम करण्याचा अनुभव असायला हवा.

MBA करीता शैक्षणिक पात्रतेची अट | MBA Meaning in Marathi

Master of Business Administration मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपणास किमान ५० टक्के गुणांसह पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. एमबीए ला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपणास एक सामान्य प्रवेश परीक्षा (Entrance Exam) पण द्यावी लागते. जसे कि CAT, MAT, CMAT इत्यादी परीक्षा समाविष्ट असतात.


आणखी पोस्ट वाचा

BCA फुल्ल फॉर्म बद्दल संपूर्ण माहिती
PHD बद्दल संपूर्ण मराठी माहिती


MBA स्पेशलायझेशन विषय । Types of MBA in Marathi

MBA करण्यासाठी खालील प्रमाणे सर्वोत्तम विषय दिलेले आहेत या विषयाची निवड करून तुम्ही MBA अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आणि उज्वल भविष्य घडवू शकता. 

  • MBA in Finance । फायनान्स एमबीए
  • MBA in Human Resources । मानव संसाधन एमबीए
  • Media Management MBA । मीडिया मॅनेजमेंट एमबीए
  • International Business MBA । आंतरराष्ट्रीय व्यवसाय एमबीए
  • MBA in Information Technology । माहिती तंत्रज्ञानात एमबीए
  • Supply Chain Management MBA । सप्लाय चेन मॅनेजमेंट एमबीए
  • MBA in Agri Business Management । कृषी व्यवसाय व्यवस्थापन एमबीए
  • MBA in Hospital Administration । हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमबीए

अश्या प्रकारे वरील काही लोकप्रिय MBA स्पेशलायझेशन विषय आहेत. 


MBA केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या नोकरीच्या संधी

एमबीए नंतर आपण एमबीए इन एच आर मॅनेजमेंट तसेच बॅकिग फायनान्स इत्यादी क्षेत्रात नोकरी करू शकतो. याचसोबत एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीत एमबीए प्रोफेशनल म्हणून देखील काम करता येईल. 

पण समजा आपल्याला कामाचा तीन चार वर्षे इतका अनुभव असेल तसेच आपल्या अंगी चांगले कला कौशल्य असेल तर उत्कृष्ट सॅलरी पॅकेज मिळू शकते. 

हे पण वाचा – टॉप Business आयडिया बद्दल जाणून घ्या


एमबीएची फी किती असते?

एमबीएची फी साधारणत किती लागेल हे आपण कोणत्या काॅलेजमध्ये अॅडमिशन घेतो यावर अवलंबून असते. आपण जर एखाद्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर आपणास जास्त फी भरावी लागेल, आणि एखादे सरकारी काॅलेज मध्ये प्रवेश मिळाला तर खाजगी काॅलेजच्या तुलनेत कमी फी लागेल. 

एमबीए करण्यासाठी दोन वर्षांसाठी खाजगी महाविद्यालयात प्रति वर्ष ६० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत फी लागु शकते.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

MBA चा फुल्ल फॉर्म काय आहे? 

MBA चे संक्षिप्त रूप म्हणजे मास्टर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Master of Business Administration) असा होतो

MBA कोर्स पूर्ण झाल्यानंतर काय करू शकता?

MBA हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही फायनान्स, कन्सल्टिंग, ई-कॉमर्स तसेच स्वतःचा स्टार्टअप देखील सुरू करू शकता आणि त्याचप्रमाणे एखाद्या कंपणी मध्ये  चांगली नोकरी मिळवू शकता.


निष्कर्ष । MBA Information in Marathi  

अश्या प्रकारे आपण मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या कोर्स बद्दल संपूर्ण मराठी माहिती जाणून घेतली आहे, तरी सदर माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कंमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. 

धन्यवाद !!  

Leave a Reply

This Post Has 2 Comments