नमस्कार मित्रांनो…आपल्या आजच्या या लेखात आपण संगणकाबद्दलची संपुर्ण माहिती, जसे की संगणक म्हणजे काय?, संगणक कसे काम करते?, संगणकाचा इतिहास, संगणकाचे वैशिष्ट्य तसेच संगणकाचे वेगवेगळे प्रकार? या सर्वांबद्दल सविस्तरपणे संगणकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (What is Computer and Computer Information in Marathi).
कम्प्युटर म्हणेजच संगणक हा आजच्या डिजिटल मार्केटिंग च्या दुनियेत सर्वांच्या परिचयाचा आहे. संगणक म्हटल्याबरोबरच एका टेबलावर मॉनिटर, सीपियु, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि ईतर बरीचशी उपकरणे एकमेकांना जोडून तयार झालेली काहीशी प्रतिकृती डोळ्यासमोर दिसून येते.
तयार झालेली ही प्रतिकृती दिसायला जेवढी साधारण असते, तेवढीच असामान्य आहे तिची कार्यप्रणाली. मात्र हि साधारण गोष्ट नेमकी कुठून जन्माला आली आणि काळानुरूप त्यात कोणकोणते बदल घडून आले हे सर्व जाणून घेण्याची थोडी जरी उत्सुकता तुम्हाला असेल तर कम्प्युटर म्हणजे काय? हा संपुर्ण लेख तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे.
संगणक म्हणजे काय? | What is Computer Meaning in Marathi
संगणक म्हणेजच काय तर कम्प्युटर, हे मानवाने तयार केलेले एक विद्युत स्वयंचलित यंत्र असून ते माहिती घेते, त्यावर प्रक्रिया करते, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने जलद आणि अचूक उत्तरे देते, तसेच माहिती साठवून ठेवते आणि पाहिजे त्या वेळी माहिती उपलब्ध करून देते. संगणक मध्ये विविध प्रकारचे ऑपरेशन घडवून आणले जातात. संगणका मधील ही कार्य घडवून आणताना त्यामधे प्रत्येक प्रक्रिया व्यवस्थित रित्या आणि क्रमानुसार पार पाडली जाते.
त्या प्रक्रियांचा थोडक्यात आढावा खालील प्रमाणे
- वापरकर्त्या द्वारे दिलेली कोणतीही सूचना ही इनपुट डिव्हाइस च्या माध्यमातुन सीपियु कडे एकत्रित केल्या जातात.
- एकत्रित केलेला सूचनांच्या आधारे समोरचा प्रक्रिया पार पाडली जाते.
- संपुर्ण प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पडल्यानंतर मिळालेला आऊटपुट योग्य रित्या आऊटपुट डिव्हाईस च्या माध्यमातुन वापरकर्त्याला प्राप्त होतो.
>> हे पण वाचा – इंटरनेट म्हणजे काय संपूर्ण माहिती
कॉम्प्युटर चा फुल फॉर्म काय आहे? | Full Form Of Computer in Marathi
Computer चा फुल्ल फॉर्म पुढील प्रमाणे असेल.
C :- Commonly
O :- Operated
M :- Machine
P :- Particularly
U :- Used for
T :- Teaching
E :- Education
R :- Research
अश्या प्रकारे कॉम्पुटर म्हणजे Commonly Operated Machine Particularly Used for Teaching Education होय.
संगणक कसे काम करते? | How Does a Computer work?
आजच्या काळात कम्प्युटर हे दैनंदिन व्यवहारातील एक अत्यावश्याक गरज होऊन बसले आहे. विविध क्षेत्रांतील जवळपास 95% कार्ये ही संगणकावर अवलंबून आहेत.
वापरकर्त्या व्दारे दिलेल्या सूचना एकत्रित केल्यानंतर संगणक हा अत्यंत पद्धतशीर मार्गाने त्या सूचनांवर अंबालबजावणी करतो.
जसे की आपल्याला माहीत आहे की संगणकाद्वारे घडवून आणलेल्या कोणत्याही कार्यात संगणकाला जोडलेल्या इतर उपकरणांचाही महत्वाचा वाटा असतो. संगणकाला जोडलेली ही उपकरणे दोन भागात विभागले गेले आहेत.
(Total Basic to Advanced Computer Knowledge in Marathi and Also you can mail us to get complete computer information and learning pdf)
- इनपुट डिवाइस
वापरकर्त्या व्दारे दिलेल्या सर्व सूचना ह्या इनपुट डीव्हाइस च्या माध्यमातुन एकत्रित केले जातात. कीबोर्ड, माऊस, जॉय स्टिक, ट्रॅक बॉल, स्कॅनर ही सर्व इनपुट डीव्हाइस चि उदाहरणे आहेत.
- आउटपुट डिवाइस
दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी केल्यावर प्राप्त झालेल्या परिणामांचा आउटपुट डिव्हाइस च्या साहाय्याने वापरकर्त्याजवळ सुरक्षित रित्या पोहचवले जातात.
प्रिंटर,हेडफोन, कम्प्युटर स्पीकर्स, प्रोजेक्टर, जीपीएस, ध्वनी कार्ड, व्हिडिओ कार्ड ही सर्व आउटपुट डीव्हाइस ची उदाहरणे आहेत.
जेव्हा संगणकामध्ये कोणतेही कार्य केले जाते तेव्हा सूचनांच्या अनुरूप त्यामधे क्रियाकलाप घडवून आणले जातात.
- सूचना एकत्रित करणे :- इनपुट डीव्हाइस च्या माध्यमातुन सर्व सूचनांना एकत्रित केल्या जाते.
- साठवणूक :- एकत्रित केलेल्या सर्व सूचना प्रायमरी मेमरी मध्ये संग्रहित केल्या जातात.
- सूचनांवर अंमलबजावणी करणे :- वापरकर्त्याने दिलेल्या प्रत्येक सूचनेनुसार कार्य केले जाते.
- आलेला आउटपुट सुरक्षित रित्या पोहचवणे :- सर्व सूचनांवर योग्य रित्या प्रक्रिया पार पडल्यानंतर प्राप्त झालेला परीणाम व्यवस्थित पणे वापरकर्त्याला परत दिला जातो.
- नियंत्रण :- ह्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडल्या जाव्यात, त्यात कसली च चूक होऊ नये म्हणून या सर्वांवर CPU व्दारे नियंत्रण ठेवले जाते.
संगणकाचे गुणधर्म | Properties of Computer
आजच्या काळात जवळजवळ सर्वच क्षेत्रात संगणकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. कारण संगणकाची स्वतः ची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ती पुढीलप्रमाणे पाहूया.
गती | Speed
कोणत्याही संगणकाची काम करण्याची गती ही विलक्षणीय आहे. एखादा साधक बाधक विचार किंवा गणना करण्यासाठी मानवी मेंदूला साधारणतः एक तास किंवा त्यापेक्षाही अधिक काळ लागतो. याच उलट संगणकाला ते कार्य पार पाडण्यासाठी मात्र काही सेकंदाचा अवधी लागतो.
कम्प्युटर एका सेकंदात किती कार्ये पार पडतो यावरून त्याच्या गतीचा अंदाज लावला जातो. अभ्यासावरुन शास्त्रज्ञांच्या निदर्शनास असे दिसून आले की संगणक हा एका सेकंदात (1,000,000,000= 10⁹) येवढ्या सूचना अंमलात आणू शकतो.
स्वयंचलित आणि उत्स्फूर्त | Automatic and Spontaneous
संगणक अर्थ ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे. म्हणजेच, एकदा का संगणकाला कोणते कार्य करायचे हे सांगितले की नंतर मानवी हस्तक्षेप केल्या विना तो त्याचे कार्य आरामात पार पाडतो.
अचूकता आणि सत्यता | Accuracy and Truthfulness
वापरकर्ता द्वारे दिलेल्या कोणत्याही सूचनांवर अचूकपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता संगणकाकडे आहे. वापरकर्त्यांच्या हातून झालेल्या चुका च्या तुलनेत संगणकाद्वारे झालेल्या चुकांचे प्रमाण हे खूप कमी असते. आणि त्या बाबतीत कम्प्युटर हा परिपूर्ण असतो.
अष्टपैलुत्व | Versatility
अष्टपैलुत्व म्हणजेच अनेक भिन्न भिन्न कार्य किंवा क्रियाकलाप यांशी स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता.
आळशीपणा हा मानवाच्या स्वभावात ठासून-ठासून भरलेला आहे. याच स्वभावामुळे कोणतेही काम करण्यास विलंब करतो. मात्र संगणकाच्या बाबतीत हे खूप वेगळं आहे. कारण, संगणकाकडे कुठल्या च प्रकारची भावना नसते. आणि या मुळेच तो कितीही किचकट आणि मोठे कार्य असले तरीही तो सहजरीत्या पार पाडतो.
मेहनती | Hardworking
मानवी शरीरा प्रमाणे कम्प्युटर हा भावनिक त्रासांपासून मुक्त आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कार्य न चुकता आणि गती मध्ये शेवटपर्यंत सातत्य राखून पार पाडतो.
संगणकात आपण कुठल्याही प्रकारची माहिती वेळेच्या मर्यादेत न राहता साठवून ठेऊ शकतो. वापरकर्त्याच्या इच्छेनुसार जोपर्यंत एखादी माहिती पुनर्प्राप्त केल्या जात नाही तोपर्यंत संगणकाच्या द्वितीय मेमोरी मध्ये ती सुरक्षित राहते.
संगणक हे एक यांत्रिक उपकरण असल्यामुळे ते भावना विरहित असते. कुठल्याही प्रकारची भावना संगणकामधे दर्शविली जात नाही.
संगणकाच्या या गुणवत्तेमुळे तास-तास भर काम करूनही तो कधीच थकत नाही. तसेच कुठलाही निर्णय स्वतःहून घेण्याची क्षमता संगणकाकडे नसते. कोणतेही कार्य करण्यासाठी त्याला आधी सूचना द्याव्या लागतात ज्या त्याला वापरकर्त्या द्वारे दिल्या जातात.
संगणकाचा इतिहास | History of Computer in Marathi
आजच्या काळात जे कम्प्युटर आपण पाहतो ते सुरुवातीपासूनच तसे नव्हते. विज्ञानाने केलेल्या प्रगतीनुसार आणि बदलत्या काळानुसार संगणकाच्या रचनेत आणि त्यांच्या गुणांत बदल झालेला आपल्याला दिसून येतो.
संगणकात झालेला हा बदल एकदमच झालेला नाही, यामधे बऱ्याच वर्षाचा कालावधी लागला. संगणकाचा हा इतिहास अभ्यासाला सोप्पा जावा याकरिता तो वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये विभागला गेला.
संगणकाच्या पिढ्या
संगणकाच्या पाच पिढ्या आहेत ते पुढीलप्रमाणे :-
संगणकाची पहीली पिढी (१९४२-१९५५)
ENIAC, EDUAC, EDSAC, UNIVAC 1 आणि IBM 701 या सर्वांचा समावेश संगणकाच्या पहिल्या पिढीत केला जातो.
संगणकाची ही पहीली पिढी 1942 मध्ये जन्माला आली. या पिढीतील संगणकामध्ये एका सेकंदात बरीचशी कार्य पार पाडली जात. आणि त्याच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हॅक्यूम ट्यूब चा वापर केला जात असे.
संगणकाच्या या पिढीत ऑपरेटिंग सिस्टिम अस्तित्वात नव्हती, त्यामुळे त्या काळचे संगणक हे केवळ अभियंता व्दारे हाताळले जात असत.
या काळातील संगणक हे आकाराने खूप मोठे होते, तसेच त्यामधे वापरल्या जाणाऱ्या व्हॅक्यूम ट्यूब चा कालावधी सुद्धा मर्यादीत होता.
संगणकाची दुसरी पिढी (१९५५-१९६४)
संगणकाच्या दुसऱ्या पिढीत व्हॅक्यूम ट्यूब ऐवजी ट्रान्झिस्टर चा वापर केला गेला. John Bardeen, Willin Shockley आणि Walter Rattain यांनी 1948 मध्ये ट्रान्झिस्टर ची निर्मिती केली. व्हॅक्यूम ट्यूब च्या तुलनेत ट्रान्झिस्टर ची गुणवत्ता ही अधिक प्रभावशाली होती.
संगणकाची तिसरी पिढी (१९६४-१९७५)
संगणकाच्या या तिसऱ्या पिढीत एकात्मिक सर्किट चा समावेश होतो. 1958 मध्ये Jackst. Clair Kilby आणि Robert Noyce यांनी मिळून एकात्मिक सर्किट सारखी एक अद्भुत संकल्पना जगासमोर मांडली
एकात्मिक सर्किट हे ट्रान्झिस्टर च्या मानाने आधीक स्वस्त आणि उत्तम गुणवत्तेचे होते.
संगणकाची ही पिढी एकाच सेकंदात एक दशलक्ष सूचना अंमलात आणू शकत होती. तसेच या काळातील संगणकांमधे मोठी प्राथमिक मेमरी आणि दुय्यम स्टोरेज डिव्हाइस सारखी वैशिष्ट्ये होती.
संगणकाची चौथी पिढी (१९७५-१९८९)
मायक्रो प्रोसेसर हे संगणकाच्या चौथ्या पिढीचे मुख्य वैशिष्ट्य होते. संगणकाची ही पिढी आधीच्या तुलनेत अधिक वेगवान, शक्तिशाली, संक्षिप्त, विश्वसनीय आणि परवडणारे होते. मायक्रो प्रोसेसर च्या पायाभूत संकल्पनेवर ही पिढी आधारीत होती.
याच काळात वेगवान संगणक नेटवर्किंग ची जगाला ओळख झाली. ज्यामधे जगभरातील संगणक वायरलेस कनेक्शन व्दारे एकमेकांना जोडले गेले.
संगणकाची पाचवी पिढी (१९८९-सध्या)
आज जी आपल्या डोळ्यासमोर आहे, तीच आहे संगणकाची पाचवी पिढी.
संगणकाची ही पाचवी पिढी अजूनही विकासाच्या मार्गावर कार्यरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तसेच नैसर्गिक आवाजाला स्वतःहून प्रतिसाद देऊ शकेल असा संगणक निर्माण करणे हा पाचव्या पिढीच्या हेतू आहे, या पिढीत उच्च स्तरीय प्रोग्रामिंग भाषेचा वापर केला जातो.
आकाराने लहान, कमी खर्चिक, भव्य साठवणूक क्षमता, ऊर्जेचा कमी वापर करणारे, अधिक पोर्टेबल, अनुकूल इंटरफेस अशी भरपूर वैशिष्ट्ये या पाचव्या पिढीतील संगणकाची आहेत.
बदलत्या काळानुसार जस-जश्या मानवाच्या गरजा बदलू लागल्या तसतशी संगणकाच्या रचनेतही बदल होऊ लागला आणि गरजेनुसार संगणकाचे वेगवेगळे मॉडेल तयार करण्यात आले.
उदा :- डेस्कटॉप पीसी, पोर्टेबल पीसी ( नोटबुक, अल्ट्राबुक, लॅपटॉप, टॅबलेट), हॅण्डलेट पीसी, PDA आणि स्मार्टफोन. इत्यादी.
संगणकाचे वर्गीकरण | Classification of Computer
संगणकाच्या कार्यक्षमतेनुसार वेगवेगळ्या विभागांत संगणकाचे वर्गीकरण केले गेले आहे.
सुपर कॉम्प्युटर | Super Computer
मोठमोठ्या वैज्ञानिक प्रयोग शाळेत तसेच सरकारी संस्थांमध्ये जे संगणक वापरले जातात त्यांची प्रक्रियेची गती ही प्रचंड वेगवान असते. सोबत च त्याची डेटा साठवणुकीची क्षमता सुध्दा विलक्षणिय आहे. त्याच्या याच गुणवत्ते मुळे त्यांना सुपर कॉम्प्युटर असे म्हणतात.
सुपर कम्प्यूटर हे एवढे वेगवान आहेत की एका सेकंदात कोट्यवधी सूचना अंमलात आणू शकते.
पारंपारिक संगणकाप्रमानेच सुपर कंप्युटर मध्ये सुध्दा एका पेक्षा जास्त CPU आहेत. त्याच प्रमाणे त्याची इनपुट/आऊटपुट क्षमता देखिल खूप छान आहे.
मेनफ्रेम कॉम्पुटर | Mainframe Computer
सुपर कॉम्प्युटर नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो मेनफ्रेम कॉम्पुटर. सुपर कम्प्यूटर सारखीच यांची देखिल गती, साठवणूक क्षमता ही खूप मोठी आहे. मेनफ्रेम कंप्युटर प्रति सेकंदात शेकडो दशलक्ष सूचना पार पाडू शकतो.
बँकिंग, एअरलाईन आणि रेल्वे इत्यादी क्षेत्रांत मेनफ्रेम कॉम्पुटर चा वापर केला जातो.
या संगणकाची एक त्रुटी म्हणजे च याला ठेवण्यासाठी भरमसाठ जागेची आवश्यकता असते, कार्य करत्यावेळी सुध्दा मोठ्या प्रमाणात विजेचा वापर यांच्याद्वारे केला जातो, आणि साधारण संगणकाच्या तुलनेत हे अधिक महागडे पडते.
मिनी कॉम्प्युटर | Mini Computer
मिनी कॉम्प्युटर चा आकार हा मेनफ्रेम कॉम्पुटर च्या तुलनेत लहान असतो. तसेच त्याची कार्यक्षमता, गती, साठवणूक क्षमता आणि ईतर सेवा ह्या मेनफ्रेम कॉम्पुटर च्या मानाने कमी आहेत. मिनी कॉम्प्युटर ही एकाधिक प्रोसेसींग सिस्टीम आहे. म्हणजेच हे एकाच वेळी 200 वापरकर्त्यांना समर्थन करण्यास सक्षम आहे.
1960 च्या दशकात मिनी कॉम्प्युटर अस्तित्वात आले होते. त्या वेळी हे कॉम्पुटर मेनफ्रेम कॉम्प्युटर च्या तुलनेत अधिक स्वस्त होते. त्यामुळे वापरकर्त्यांनी या संगणकाला अधिक पसंती दर्शविली.
मायक्रो कॉम्प्युटर | Micro Computer
मायक्रो कंप्यूटर हे आजच्या काळात सर्वात जास्त वापरले जाणारे संगणक आहे. मायक्रो कंप्यूटर चे दुसरे नाव म्हणजेच पर्सनल कॉम्प्युटर.
आजच्या काळातील हे संगणक आकाराने लहान आहेत. तसेच त्यांच्यातील इतर सुविधा देखील मेनफ्रेम कंप्युटर आणि मिनी कंप्युटर च्या तुलनेत खूप कमी आहेत. परंतू एखादयाच्या वैयक्तिक गरजेपुरत्या ह्या सुविधा पुरेशा आहेत.
पर्सनल डिजिटल कम्प्यूटर, टॅब्लेट पीसी, नोटबुक पीसी, लॅपटॉप, हॅण्डहेल्ड कॉम्पुटर इत्यादी मायक्रो कॉम्पुटर ची उदाहरणे आहेत.
संगणकाचे फायदे | Advantages of computer
आजच्या डिजिटल दुनियेत संगणक हे एक महत्वाची भूमिका बजावते.
- औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विज्ञान, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
- संगणकामुळे ऑनलाईन सेवेचा मार्ग मोकळा झाला, ज्यामुळे आपण दैनंदिन जीवनातील निम्मे काम घरबसल्या करू शकतो.
- डिजिटल मार्केटिंग व्दारे आपण बाहेर कुठे न जाता घरबसल्या पैसे कमवू शकतो.
- मोठमोठे गणितीय सूत्र जे कितीही अवघड असले तरीही संगणकाच्या मदतीने आपण ते काही सेकंदात सोडवू शकतो.
- एखादी माहिती जी खूप महत्वाची असेल आणि वर्षानुवर्षे लिखित स्वरूपात ती जशीच्या तशी नसेल राहत तर ती माहिती आपण संगणक मधे साठवून ठेऊन शकतो. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ती महीती आपल्या समोर संगणक प्रस्थापित करतो.
संगणकाचे तोटे | Disadvantages of Computer
ज्या ठिकाणी चांगली गोष्ट असते, त्या ठिकाणी वाईट गोष्टींचेही असणे साहजिकच आहे. म्हणुनच संगणकाचे काहीं तोटे सुध्दा आहेत आणि ते खालीलप्रमाणे.
- डिव्हाइस मध्ये एखादा व्हायरस घुसने :-
संगणकीय व्हायरस हा एक प्रकरचा दुर्भावनायुक्त कोड किंवा प्रोग्राम आहे. या व्हायरस ने जर आपल्या संगणकात प्रवेश केला तर तो आपल्या संगणकाची कार्य प्रणाली बदलण्यास जबाबदार राहू शकतो.
2. हॅकिंग चे हल्ले :-
आपल्या संगणकात आपली वैयक्तिक माहिती किंवा असे बरेचशे प्रोग्राम असतात जे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. मात्र काहीं वेळा अनोळखी लोकं कोडींग च्या माध्यमातुन आपल्या डिव्हाइस मधील ती सर्व खाजगी माहिती चोरून घेतो आणि नंतर त्याचा दुरुपयोग करतो.
3. सायबर गुन्हे :-
ऑनलाईन व्यवहार करताना बहुतेक वेळा सायबर गुन्ह्यासारखे प्रकार आढळून येतात, ज्यामधे वापरकर्त्यांची फसवणूक केली जाते. परंतू अशा प्रकारचे गुन्हे वन टाईम पासवर्ड (OTP) च्या साहाय्याने टाळता येतात.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Computer म्हणजे काय आहे?
Computer हे एक विद्युत स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे माहिती घेते, माहितीवर प्रक्रिया करते, तसेच आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने जलद आणि अचूक उत्तरे देते, तसेच माहिती साठवून ठेवते आणि पाहिजे त्या वेळी माहिती उपलब्ध करून देते.
कॉम्प्युटर चे मुख्य प्रकार कोणते?
संगणकाचा आकार आणि गतीच्या आधारावर चार प्रकार पडतात.
सुपर कॉम्प्युटर
मेनफ्रेम कॉम्पुटर
मिनी कॉम्प्युटर
मायक्रो कॉम्प्युटर
निष्कर्ष
संगणका बद्दलची संपुर्ण माहिती ही साध्या आणि सोप्या भाषेत तुमच्या समोर आम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे.
आजच्या या लेखात तुम्ही संगणक म्हणजे काय? संगणक कसे काम करते? संगणकाची वैशिष्ट्ये, संगणकाचे प्रकार तसेच संगणकाचे फायदे आणि तोटे (Computer Importance) यांबद्दल इतंभुत आणि सविस्तर माहिती पाहिली.
आम्हाला आशा आहे की आजचा संगणकांबद्दलचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि जर खरोखर ही माहिती तुम्हाला मदतगार ठरली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा.
आणि सोबतच अशा प्रकारची इंटरनेट, संगणक आणि नवनवीन टेकनॉलॉजि बद्दल च्या माहितीसाठी आमच्या मराठी स्पिरिट वेबसाईट ला भेट द्या.
छान माहिती सर
संगणक बेसिक माहिती आणि तंत्रज्ञान माहिती नक्की बघा.
🙏धन्यवाद!🙏