HTTP HTTPS आणि SSL म्हणजे काय? (Full Guide in Marathi)

http https आणि ssl web security म्हणजे काय

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आणि वेबसाईट साठी सर्वात उपयोगी असणारा टॉपिक निवडला आहे. या लेखामध्ये आपण पाहणार आहो, HTTP HTTPS आणि  SSL म्हणजे काय? या बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहे. 

कुठली पण वेबसाईट ला Secure असणे  खूप महत्वाचे असते कारण जेव्हा पण तुम्ही Unsecure वेबसाईट वरून Online Transaction करता आणि त्यासाठी तुमच्या कार्ड ची माहिती देता तेव्हा तुमच्या कार्ड ची Information Leak होण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये हॅकिंग Attack होऊ शकतो. 

वेबसाईट च्या सेक्युरिटी साठी कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे यासाठीच आम्ही HTTP, HTTPS and SSL Meaning in Marathi बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

What is HTTP HTTPS and SSL Web Security in Marathi

तर चला बघूया मराठीमध्ये संपूर्ण माहिती !! 

HTTP म्हणजे काय? | What is HTTP in Marathi

Hypertext transfer protocol चा वापर वेब ब्राउसर मधून वेब सर्वर पर्यंत डेटा ट्रांसफ़र करण्यासाठी केला जातो. HTTP वेबसाईट मधील डेटा सुरक्षित म्हणजेच सेक्युर नसतो. जर एखाद्या वेबसाईट वरून ऑनलाईन Transaction करत असू तर आपली Information Leak होण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच अशा प्रकारच्या वेबसाईट मधून डेटा सहजतेने चोरी होऊ शकतो. 

what is http in marathi

HTTP या प्रोटोकॉल मधून डेटा ट्रांसफ़र होताना ज्याप्रमाणे डेटा Enter केलेला असतो त्याप्रमाणेच ट्रांसफ़र केला जातो. जसे की आपण एखाद्या Unsecured वेबसाईट वरून ऑनलाईन Transaction केले असता पेयमेन्ट आपल्या कार्ड च्या साहाय्याने दिले तर आपल्या कार्ड ची Detailed एका टेक्स्ट फॉर्म मध्ये असते. आणि हा टेक्स्ट फॉर्म सहजतेने चोरल्या जाऊ शकतो. 


HTTPS म्हणजे काय?  | What is HTTPS in Marathi 

HTTPS आणि HTTP मध्ये फक्त S चा फरक असतो, S चा अर्थ Secure असा होतो. HTTPS असलेल्या वेबसाईट सुरक्षित (Secure) असतात, आणि या वेबसाईट मधील डेटा हा Leak होऊ शकत नाही. 

what is https in marathi

HTTPS या मधून जो डेटा ट्रांसफ़र केला जातो तो डेटा पूर्णपणे सुरक्षित असतो. कारण या प्रोटोकॉल मध्ये Strong Security चे वैशिष्ट्ये उपलब्ध असतात. त्याच प्रमाणे डेटा ट्रान्सफर करताना डेटा Encrypt केल्या जातो आणि नंतर ट्रान्सफर होतो. म्हणूनच या प्रोटोकॉल मधील डेटा हा हॅक केल्या जाऊ शकत नाही किंवा चोरी होऊ शकत नाही.  

जर आपण एखाद्या HTTPS असलेल्या वेबसाईट वरून ऑनलाईन Transaction केले असता आपल्या कार्डची सर्व माहिती Encrypt केल्या जाते, आणि हा Encrypted डेटा सुरक्षित असतो. म्हणून अशा साईट मधून Transaction केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. परंतु HTTPS हे आपल्या वेबसाईट च्या URL च्या सुरुवातीला आणण्यासाठी आपल्याला त्याआधी SSL सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.

उदाहरण  : बरेच लोक Amazon, Flipkart अशा शॉपिंग साईट वरून Transaction करतात. ह्या साईट्स सुरक्षित असतात. 


HTTP आणि HTTPS फरक | Difference Between HTTP and HTTPS

HTTPHTTPS
डेटा हा टेक्स्ट फॉरमॅट मध्ये ट्रान्सफर केल्या जातो, त्यामुळे डेटा सुरक्षित नसतो.Data Encrypted स्वरूपात असतो, त्यामुळे डेटा सुरक्षित असतो.
Hypertext Transfer Protocol with UnsecureHypertext Transfer Protocol with Secure
URL च्या सुरुवातीला http:// असते.URL च्या सुरुवातीला https:// असते.
HTTP वेबसाईट मधील डेटा हॅकर आणि चोरांपासून सुरक्षित नसतो म्हणजेच तो केव्हाही चोरल्या जाऊ शकतो. HTTPS च्या साहाय्याने वेबसाईट मधील डेटा हॅकर आणि चोरांपासून सुरक्षित केल्या जातो. 
वेबसाइट सुरक्षित नसल्यामुळे विश्वास संपादन करता येत नाही.ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो.

SSL म्हणजे काय? | What is SSL in Marathi

SSL म्हणजे सेक्युर सॉकेट लेयर (Secure Socket Layer) होय. SSL चा वापर डेटा ट्रांसफ़र करताना त्या डेटा ला Encrypt करण्यासाठी केला जातो. HTTPS मध्ये वेब ब्राउसर मधून सर्वर पर्यंत डेटा ट्रांसफ़र केला जातो पण हाच डेटा हॅकर्स पासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेब ब्राउसर व वेब सर्वर च्या मध्ये डेटा हा Encrypted केला जातो, डेटा Encrypt करण्यासाठी SSL वेब सेक्युरिटी चा वापर केल्या जातो. वेबसाईट चा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी HTTPS आणि SSL वेब सेक्युरिटी असणे आवश्यक आहे.  

what-is-ssl-in-marathi

जर तुम्हाला वेबसाईट साठी SSL Web Certificate ची आवश्यकता असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च केले तर तुम्हाला खूप SSL वेब सेक्युरिटी सर्टिफिकेट प्रोव्हायडर कंपन्या मिळतील. तुमच्या आवश्यकतेनुसार कंपनी कडून SSL Certificate विकत घेऊ शकता. 

तसेच काही कंपन्या तुम्हाला वेब होस्टिंग सर्व्हर सोबतच SSL Web Security Certificate फ्री मध्ये प्रोव्हाइड करतात. जेव्हा तुम्ही वेबसाईट साठी होस्टिंग सर्व्हर विकत घेता, तेव्हा च त्या होस्टिंग सर्वर सोबत एसएसएल वेब सेक्युरिटी सर्टिफिकेट फ्री मध्ये प्रोव्हाइड केल्या जाते. 

तुमच्या ईच्छेनुसार तुम्ही होस्टिंग सर्वर सोबत सुद्धा SSL वेब सर्टिफिकेट प्रोव्हायडर Free मध्ये घेऊ शकता, किंवा एखाद्या SSL सर्टिफिकेट प्रोव्हायडर कंपनीकडून विकत घेऊ शकता.

अश्या प्रकारे तुम्हाला http, https and ssl in Marathi याबद्दल माहिती मिळालीच आहे त्याचप्रमाणे SSL Certificate म्हणजे काय? हे सुद्धा बघितलेच आहे. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला सर्व माहिती चांगल्या तऱ्हेने समजलीच असेल. 


FAQ :

HTTP चा फुल्ल फॉर्म काय आहे?

HTTP चा फुल्ल फॉर्म Hypertext Transfer Protocol आहे.

HTTPS चा फुल्ल फॉर्म काय आहे?

HTTPS चा फुल्ल फॉर्म Hypertext Transfer Protocol Secure असा होतो. 

SSL चा फुल्ल फॉर्म काय आहे?

SSL चा फुल्ल फॉर्म Secure Socket Layer असा होतो. 

निकर्ष

या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही HTTP HTTPS आणि SSL Web Security काय आहे? याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला हि माहिती समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल. आपल्या ब्लॉग ला सुरक्षित करण्यासाठी हि माहिती खूप महत्वाची आहे. म्हणूनच HTTP, HTTPS आणि  SSL Web Security in Marathi हा लेख नक्की वाचायला हवा. 

जर तुम्हाला या पोस्ट मधून उपयुक्त आणि महत्वाची माहिती मिळाली असेल तर ब्लॉग पोस्ट कशी वाटली याबद्दल कंमेंट करा आणि आणि मित्रांना शेयर करा. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply