Anchor Text म्हणजे काय? What is Anchor Text Meaning in Marathi

Anchor Text म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो,  

मागील लेखामध्ये आपण SEO म्हणजे काय? SEO चे विविध फॅक्टर याबाबत माहिती बघितली च आहे. पण आज आपण या लेखामध्ये SEO मधील सर्वात महत्वाचा फॅक्टर Anchor Text याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

जेव्हा पण SEO मध्ये लिंक बिल्डिंग आपण करतो तेव्हा Anchor Text खूप महत्वाचे  असते. 

म्हणूनच आपण या पोस्ट मध्ये Anchor Text म्हणजे काय? विविध प्रकार कोणकोणते आहेत अश्या प्रकारची अँकर टेक्स्ट बद्दलची संपूर्ण आणि विस्तृत माहिती समजून घेऊया. (What is Anchor Text in Marathi and Anchor Text Type)

Anchor Text म्हणजे काय?  | What is Anchor Text in Marathi

Anchor text म्हणजे एका वेब पेज वरून दुसऱ्या वेब पेज वर जाण्यासाठी ज्या क्लिक करण्यायोग्य संदर्भ देऊन लिंक दिल्या जाते त्यालाच Anchor Text असे म्हणतात. Anchor text हे क्लिक करण्यायोग्य म्हणजेच Clickable text असते आणि हे टेक्स्ट सर्व टेक्स्ट पेक्षा वेगळे दिसते म्हणजेच या टेक्स्ट ला Hyperlink (हायपरलिंक) आणि Highlight केलेले असते. 

Anchor Text हे एक Clickable Text असून त्याला ब्लॉग मध्ये Internal आणि External Link दिल्या जातात. याच अंतर्गत आणि बहिर्गत लिंक ला आपण Anchor Text म्हणू शकतो. तसेच या Text वर क्लिक केले असता आपण दुसऱ्या वेबसाईट किंवा वेब पेजेस वर Redirect होतो.  वेबसाईट मध्ये क्लिक करण्यायोग्य जे काही शब्द असतात त्याचं शब्दाला अँकर शब्द म्हणून संबोधले जाते.

Anchor Text काय असते आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत

सर्च इंजिन ओप्टीमायझेशन मध्ये Anchor Text हे खूप महत्त्वाचे असते. एका SEO च्या सर्वे मध्ये हे सिद्ध झाले आहे की ब्लॉग व वेबसाईट ला रँकिंग मिळवून देण्यास Anchor Text हे खूप महत्वाची कार्य करते.

पुढील प्रमाणे आम्ही अँकर टेक्स्ट कोड चे उदाहरण दिले आहे । Anchor Text HTML Featuring Code Sample in Marathi.

<a href=”https://www.marathispirit.com/”>मराठी ब्लॉग</a>

Anchor Text कोणकोणते प्रकार आहेत | Anchor Text Type in Marathi

Exact Match Anchor Text

या अँकर टेक्स्ट ला सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण या अँकर टेक्स्ट मुळे आपल्या वेबसाईट ची रँकिंग वाढण्यास खूप मदत होते. उदा. जर आपला मुख्य कीवर्ड Digital Marketing असेल आणि आपण अँकर टेक्स्ट म्हणून Digital Marketing याच टेक्स्ट चा वापर करत असाल तर हा तुमचा Exact Match Anchor Text होईल.

Anchor Text चे प्रकार विस्तृतपणे जाणून घेतले आहेत, या Anchor Text चा आपल्या ब्लॉग मध्ये योग्य वापर केला तर नक्कीच आपल्या ब्लॉग ची रँकिंग वाढेल. तसेच अँकर टेक्स्ट चा वापर केल्यामुळे आपल्या वेबसाईट चा Bounce Rate कमी होतो त्याचप्रमाणे आपल्या ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळते त्यामुळे ब्लॉग वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येते.

Generic Anchor Text

या अँकर टेक्स्ट मध्ये Generic म्हणजेच सामान्य सर्वसाधारण शब्द वापरल्या जातात. जसे की, येथे 

  • क्लिक करा (Click Here)
  • आणखी माहिती वाचा (Read More)
  • या साईट वर क्लिक करा (Click this website)

इत्यादी…

Generic Anchor Text याच्या साहाय्याने आपण लिंक केलेले वेबपेजेस कोणत्या संदर्भात आहे हे स्पष्ट होत नाही. तसेच या अँकर टेक्स्ट चा आपल्या वेब पेजेस च्या रँकिंग साठी काहीही फायदा होत नाही.

Branded Anchor Text

जेव्हा पण टेक्स्ट मध्ये ब्रँड चे नावाने लिंक दिली जाते किंवा टेक्स्ट मध्ये एखाद्या ब्रँडेड वेबसाईट नाव असते. 

उदा. फ्लिपकार्ट, अमेझॉन इत्यादी वेबसाईट ला लिंक प्रदान केली असेल तर त्याला Branded Anchor Text असे म्हटले जाईल. तसेच या अँकर टेक्स्ट चा सुद्धा वेब पेजेस च्या रँकिंग वर जास्त फायदा होत नाही.

Naked Anchor Text

जेव्हा पण आपण एखाद्या वेबसाईट पोस्ट किंवा वेब पेजेस च्या नावानुसार डीरेक्टली लिंक दिली जाते यालाच Naked link anchors असे म्हणतात. 

किंवा 

एखादी URL जी Anchor Text म्हणून वापरण्यात येते. जसे की, MarathiSpirit.com या URL ला लिंक दिली तर Naked Anchor Text म्हणून संबोधले जाईल.

Image Anchor

जेव्हा एखाद्या प्रतीमे वर क्लिक केल्यास आपण दुसऱ्या वेबसाईट मध्ये जातो तेव्हा त्या इमेज ला लिंक दिलेली असते त्यालाच इमेज अँकर असे म्हणतात. तसेच इमेज ल ALT Tag देताना योग्य आणि अचूक द्यावा.

<img src="Anchor-Text" alt="Anchor Text Marathi" width="128" height="128">

Partial Match Anchor Text

या अँकर टेक्स्ट मध्ये मुख्य कीवर्ड ला लिंक न देता त्या कीवर्ड च्या Partial Match कीवर्ड ला लिंक दिली जाते. जसे की आपला मुख्य कीवर्ड Digital Marketing असा आहे तर या मुख्य कीवर्ड ला लिंक न देता Digital Marketing in Marathi 2021 या Partial Match कीवर्ड ला लिंक दिल्या जाते आणि यालाच Partial Match Anchor Text असे म्हणतात. तसेच हे अँकर टेक्स्ट रँकिंग वाढवण्यासाठी महत्वाचे असतात.

निष्कर्ष : Anchor Text बद्दल संपूर्ण माहिती 

Anchor Text म्हणजे काय? आणि Anchor Text चे विविध प्रकार याबाबत महत्वाची व संपूर्ण माहिती मराठी मधून जाणून घेतली. आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली सर्व माहिती चांगल्या तऱ्हेने कळली असेलच.

जर तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा.

🙏धन्यवाद!!!🙏

Leave a Reply