ॲनिमेशन म्हणजे काय? | Animation Information in Marathi

ॲनिमेशन म्हणजे काय

मित्रांनो आपल्याला लहानपणापासूनच कार्टून बघायची खूप आवड असते. अगदी पंचतंत्र, रामायण, महाभारत, लिटिल गणेशा, यांसारखी प्रसिद्ध कार्टून निर्मिती असो, किंवा टॉम अँड जेरी, छोटा भीम आणि डोरेमॉन इत्यादी कार्टून्स असो हे कार्टून्स खूप प्रसिद्ध आहेत व आपल्या खूप आवडीचे देखील आहेत. 

त्याचप्रमाणे ॲनिमेशन चित्रपट म्हणाल तर अवतार, अवेंजर्स इत्यादी काही प्रसिद्ध चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे काय कि या सर्व कार्टून पात्रांची निर्मिती कशी केली जाते आणि त्याचा कश्या प्रकारे वापर केला जातो. 

तर चला या आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन म्हणजे काय? याच विषयाबद्दल सविस्तर आणि विस्तृत पणे सर्व माहिती जाणून घेऊया. 


Animation म्हणजे काय? | Animation Meaning in Marathi

Animation हे रेखाचित्रे, छायाचित्रे आणि खऱ्या भासणाऱ्या गोष्टी व व्हिज्युअल गोष्टींचे एकत्रीकरण करून भ्रम निर्माण करण्याची एक पद्धत आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास स्थिर चित्राचे जलद गतीने सादरीकरण करणे म्हणजेच ॲनिमेशन होय.

Animation ही एक दृश्य तयार करण्याची प्रक्रिया आहे, यामध्ये एका व्यक्तीची प्रतिमा ही विविध प्रकारच्या मोशन मध्ये किंवा एका विशिष्ट पद्धतीने ठेवली जाते व ती प्रतिमा मोशन मध्ये असल्याचं भासवलं जातं यालाच तर ॲनिमेशन असे म्हणतात. सुरुवातीला व्यंगचित्रे हे सुद्धा अनिमेशन चे एक उदाहरण आहे, पण सध्या अनिमेशन तयार करण्यासाठी संगणक, लॅपटॉप आणि इतरही नवनवीन टेकनॉलॉजि चा वापर केला जातो.

शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजेच पहिली ते पाचवी पर्यंतच्या शिक्षणामध्ये शिक्षण अधिक रममान बनवण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे ॲनिमेशन होय. ऍनिमेशन या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात चित्रपट ,जाहिराती व पाठ्यपुस्तकांमध्ये वापर केला जातो. ऍनिमेशन या प्रक्रियेमध्ये प्रतिमा डिझाईनिंग, चित्रे तयार करणे, फोटोग्राफिक क्रम लावणे तसेच लेआऊट बनविणे आणि नंतर या सर्व चित्रांना एकत्रित करणे अश्या सर्व प्रक्रियेचा समावेश होतो.

आणखी माहिती वाचा – आर्टीफिसिअल इंटेलिजन्स बद्दल सविस्तर माहिती


ॲनिमेटर म्हणजे काय ? | Animator in Marathi

आता आपल्याला कळले असेल की ॲनिमेशन करणे ही काही सोपी गोष्ट नाही, याला प्रचंड मेहनत व कष्ट लागतात. जो व्यक्ती ऍनिमेशन बनवत असतो त्या व्यक्तीला ॲनिमेटर असे म्हणतात. आपण लहान असताना तासंतास जी कार्टून्स पाहायचो, त्या मागचा खरा निर्माता हा ॲनिमेटर असतो.

ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत जसे की ब्रम्हांड किंवा ज्या गोष्टी फक्त आपण कल्पनेतच पाहतो जसे की पाण्याखालील जीवन, घनदाट जंगलातील धोकादायक प्राण्यांची दृश्य ही ॲनिमेशन द्वारे सहज रेखाटली जातात.

एक उत्कृष्ट ॲनिमेटर होण्यासाठी खूप मेहनत करून अनेक कुशल गुण आत्मसात करावे लागतील, जसे की चांगले निरीक्षण कौशल्य, सर्जनशीलता, चित्रकला कौशल्य जसे की रेखाचित्र व स्केचिंग रेखाटने. त्याच बरोबर संयम व एकाग्रतेचे कौशल्य, संप्रेषण कौशल्य, चांगले संगणकीय ज्ञान ज्यामध्ये सॉफ्टवेअर वापरण्याचे कौशल्य, टीमवर्क इत्यादी… 

मेटॉवर्स या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.


ॲनिमेशन या क्षेत्रात करिअरचे काय पर्याय आहेत?

ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला तुमचे करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला क्रिएटिव्ह अर्थातच नेहमीच नवनवीन कल्पनांचा शोध घ्यायला हवा. जगापेक्षा काहीतरी वेगळं करायची इच्छा बाळगायला हवी. ऍनिमेशन शिकत असताना तुम्हाला यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरची चांगल्या प्रकारे माहिती असणे खूप गरजेचे आहे .त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला डिझाईन बनवता आले पाहिजे व त्या ड्रॉइंग्सचे व्यवस्थित लेआउट काढता आले पाहिजेत .योग्य प्रकारे रंगांचा वापर देखील करता आला पाहिजे. 

त्याचप्रमाणे ग्राफिक डिझाईन, फोटो एडिटिंग इत्यादी बाबत देखील तुम्हाला ज्ञान असले पाहिजे. हे क्षेत्र इतके विस्तारलेले आहे की चांगल्या प्रकारे ॲनिमेशनचा कोर्स करून चांगल्या पगाराची नोकरी देखील आपण मिळवू शकतो. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवू पाहत आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये करियर साठी खूप संधी उपलब्ध आहेत.

हे पण पहा ChatGpt बद्दल संपूर्ण माहिती वाचा


ॲनिमेशन कोर्सचे प्रकार | Type of Animation Courses in Marathi

  1. Animation Degree Courses

जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये डिग्री करायची असेल तर तुम्हाला ॲनिमेशन कोर्सची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. हा कोर्स पूर्ण तीन ते चार वर्षांचा असतो. या कोर्ससाठी महत्त्वपूर्ण पात्रता म्हणजे तुम्ही दहावी व बारावी हे 50% गुणांनी उत्तीर्ण असायला हवे. या क्षेत्रामध्ये तुम्ही खालील अभ्यासक्रमांमध्ये डिग्री संपादन करू शकता. 

  • BA in Animation & Multimedia
  • BA in Animation and CG Arts
  • B.Sc. in Animation
  • B.Sc. in Animation and Gaming
  • Bachelor of Visual Arts (Animation)
  • B.Sc. in Animation and VFX
  • Bachelor of Visual Arts (Animation)
  • BA in Digital Filmmaking and Animation
  • Bachelor of Fine Arts in Animation, Graphics, and Web Design

तर मित्रांनो तुम्ही तीन-चार वर्ष घालवू इच्छित नसाल पण तुम्हाला ॲनिमेशन शिकायचे असेल तर तुम्ही यामध्ये फक्त डिप्लोमा देखील करू शकता.

  1. Animation Diploma Courses

डिप्लोमा कोर्स हा फक्त एक वर्षाचा असून यासाठी महत्त्वपूर्ण पात्रता निकष म्हणजे तुम्ही दहावी व बारावी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ॲनिमेशन मध्ये डिप्लोमा करत असताना तुम्ही खालील अभ्यासक्रमां मध्ये प्रवेश घेऊ शकता.

  • Diploma in 2D Animation
  • Diploma in 3D Animation
  • Diploma in CG Animation
  • Diploma in Animation and VFX
  • Diploma in Animation and Filmmaking
  • Diploma in Animation, Video Editing, and Post Production work
  • Diploma in Digital Animation etc…
  1. Animation Certification Courses

अनिमेशन सर्टिफिकेशन कोर्स करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. खालील प्रमाणे आपण सर्टिफिकेशन कोर्से कोणते आहेत याबद्दल माहिती पाहूया. 

  • Certificate in VFX
  • Certificate in 2D Animation
  • Certificate in CG Arts
  • Certificate in 3D Animation
  • Certificate in Editing, Mixing, and Post Production Works

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

ॲनिमेशन चे प्रकार कोणकोणते आहेत?

ॲनिमेशन चे तीन मुख्य प्रकार पडतात ते म्हणजे 2D Animation, 3D Animation आणि VFX Animation हे आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक Animation चे प्रकार आढळून येतात. 

सर्वोत्तम ॲनिमेशन सॉफ्टवेअर कोणते आहेत? | Best Animation Software

आता आपण ॲनिमेशन साठी कोणकोणती सॉफ्टवेअर वापरल्या जातात या बद्दल माहिती पाहूयात. 
ऍडोब फोटोशोप । Adobe Photoshop
ऍडोब अफ्टर इफेक्ट्स । Adobe After Effects
ऑटोडेस्क मोशनबिल्डर । MotionBuilder
ऑटोडेस्क मुडबॉक्स | Autodesk Mudbox 
अनिमेशन डेस्क । Animation Desk
ऍनिमेकर । Animaker


निष्कर्ष | Animation Information in Marathi

अश्या प्रकारे आम्ही तुम्हाला ॲनिमेशन म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती प्रदान केली आहे, त्याचप्रकारे तुम्हाला ॲनिमेशन कोर्सेस कसे कार्याचे यासंदर्भात देखील महत्वाची माहिती सादर लेखामध्ये दिलेली आहे. तरी तुम्हाला सदर माहिती कशी वाटली याबद्दल नक्की कंमेंट करा. 

आणि आमचा लेख हा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा नवनवीन विषयाबद्दल मराठी माहिती मिळेल.   

धन्यवाद!

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Lamkhade siddesh pravin

    Animation dimloma complete