मित्रांनो आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी Advance झाल्याचे आपण पाहतो.
भविष्यामध्ये येणारे २१ वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर करून भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे विकसित होऊ शकते. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स याची उदाहरणे म्हणजेच गुगल मॅप्स, गुगल लेन्स, अलेक्सा किंवा सिरी या सर्वांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सर्वात जास्त होत असतो.
बऱ्याचशा लोकांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय याची माहिती नसते, व आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर कुठे कुठे व कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो व याचा नक्की उपयोग काय या सर्व विषयांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते म्हणूनच आज आपण Artificial Intelligence म्हणजे काय व AI याबद्दल संपूर्ण माहिती मराठी भाषे मधून जाणून घेणार आहोत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? | Artificial Intelligence Meaning in Marathi
AI म्हणजे काय याचा शब्दाप्रमाणे अर्थ घेतला तर Artificial म्हणजे “कृत्रिम“ आणि Intelligent म्हणजे “बुद्धिमत्ता“. आणि या शब्दांना जोडले तर कृत्रिम बुद्धिमत्ता असा शब्दशः अर्थ होतो. म्हणजेच मानवाने तयार केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता होय.
तसेच विविध यंत्रांद्वारे दर्शविली गेलेली बुद्धिमत्ता यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हटले जाते. ज्या काळापासून मशीन अस्तित्वात आल्या तेव्हापासून आर्टिफिशल इंटेलिजन्स यामुळे लोकांच्या जीवनावर एक महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे.
आणखी माहिती वाचा – OS म्हणजे काय संपूर्ण व सविस्तर माहिती
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतिहास | History Of Artificial Intelligence
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा टेक्नॉलॉजी किंवा शास्त्रज्ञांसाठी काही नवीन शब्द नाही. आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान बरेच जुने आहे. जुन्या ग्रीक किंवा इजिप्शियन संस्कृतीमध्ये ‘मेकॅनिकल मॅन’ म्हणजेच यांत्रिक पुरुष यांच्या बद्दल उल्लेख देखील आढळतो.
आर्टिफिशल इंटेलिजन्स याच्या इतिहासाबद्दल किंवा प्रगती बद्दल काही टप्पे खालील प्रमाणे दिलेले आहेत, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या संशोधना पासून ते आजच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे असलेले सर्वात जास्त महत्त्व याची माहिती देत आहेत.
Warren McCulloch आणि Walter pits यांनी १९४३ साली एक AI वर आधारित प्रोजेक्ट सादर केला, व त्यानंतर १९४९ साली Donald यांनी या प्रोजेक्ट मध्ये आणखी संशोधन केले आणि या प्रोजेक्ट ला ‘हेबियन लर्निंग’ (Hebbian learning) हे नाव दिले.
नंतर १९५० मध्ये Alan Turing यांनी ‘कम्प्युटर मशिनरी आणि इंटेलिजन्स’ या नावाने प्रशिक्षण सुरू केले. ते प्रसिद्ध इंग्लिश गणितज्ञ व मशीन लर्निंग या क्षेत्रामध्ये त्याचे सर्वात जास्त वर्चस्व होते.
त्याच काळामध्ये बऱ्याचश्या हाय लेवल कम्प्युटर लँग्वेजेस जसे की फोरटन (FORTON), लिस्प (LISP) आणि कोबोल (COBOL) या सर्व भाषांचे संशोधन झाले होते. त्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी बऱ्याचशा लोकांनी पाठिंबा दिला होता. व त्यानंतर आर्टिफिशल इंटेलिजन्स जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पोहोचले गेले होते.
याच तंत्रज्ञानाचा वापर करून १९७२ साली जपानमध्ये पहिला रोबोट बनवण्यात आला होता व त्याचे नाव “वॉबोट 1 (WABOT-1)” असे ठेवण्यात आले होते. मात्र काही काळानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा प्रादुर्भाव कमी होत गेला व या प्रोग्राम साठी गव्हर्मेंट फंडिंग देखील कमी करण्यात आली होती.
मात्र १९८० मध्ये एक्सपर्ट सिस्टम मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्राने पुन्हा एकदा प्रगतीची वाटचाल कण्यास सुरुवात केली होती. १९८० मध्ये पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स ही स्टॅन्डफोर्ड युनिव्हर्सिटी येथे झाली होती.
यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने बरीचशी प्रगती केली आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स यामुळे डीप लर्निंग, बिग डेटा, डेटा सायन्स या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती आपल्याला पाहायला मिळते. बर्याचश्या मोठ्या कंपन्या म्हणजेच गुगल, फेसबुक, आयबीएम आणि ॲमेझॉन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून बरीचशी नवीन उपकरण बनवत आहेत.
हे पण वाचा – मेटॉवर्स म्हणजे नक्की काय? संपूर्ण माहिती वाचा
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वैशिष्ट्ये | Features of AI
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा टेक टिप्स मधील कम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये इंटेलिजंट मशीन बनवल्या जातात ज्या माणसासारख्या बुद्धिमान असतात म्हणजेच मानवासारखे बोलणे चालणे किंवा मानवासारखी सर्व कार्य करणे या मशीनला जमते.
या मशीनला मनुष्यासारखी विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील असते. जसे की कम्प्युटरचा वापर करताना आपण कम्प्युटरला कमांड देतो व त्यानंतर ते कार्य पूर्ण होते. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने बनवलेल्या मशीनला कमांड देण्याची गरज पडत नाही त्या स्वतःच निर्णय घेऊन स्वतःच कमांड घेतात व पुढचे कार्य पूर्ण करतात.
AI चा वापर | How to Use Artificial Intelligence
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर हा छोट्या छोट्या कामांमध्ये केला जाऊ शकतो. तसेच आगामी काळामध्ये माहिती तंत्रज्ञान प्रमाणेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग नक्कीच बनणार आहे.
सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलो तर बऱ्याचशा मोठ्या व लोकप्रिय कंपन्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. संपूर्ण जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे विविध रिसर्च सेंटर देखील उपलब्ध झालेले आहेत व या रिसर्च सेंटरमध्ये बरेचसे नवनवीन प्रयोग होत असतात. बऱ्याचशा Institutes किंवा Colleges देखील आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत.
AI ही एक चांगली कल्पना आहे, आता काही दिवसापूर्वी चालक नसलेली कार ही बऱ्याच कंपन्यांनी लॉन्च केली आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला गेला ही कार स्वतः चालते, म्हणजेच कार चालवण्यासाठी ड्राइवर ची गरज भासत नाही. तसेच या कार मध्ये GPS सिस्टिम आणि बरेच नवनवीन फीचर्स उपलब्ध आहेत.
AI मदतीने पर्यावरण आणि हवामान बदलाचा अंदाज देखील आपल्याला मिळवता येतो, व त्यामुळे बरीच मोठी आपत्ती टाळू शकतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने दळणवळण संरक्षण तसेच आरोग्य व अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी होत आहे.
आणखी माहिती वाचा – नॉन फंजिबल टोकन (NFT) म्हणजे काय?
AI चा वापर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो?
जसे की आपण पाहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर हा अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो व यामुळे कोणतेही काम हे काही सेकंदांमध्ये देखील पूर्ण करता येते. त्यामुळे याचा वापर करून बरीचशी क्षेत्र विकसित केली गेली आहेत. एआय चा वापर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो याबद्दल खालील माहिती पाहूया.
- रिटेल शॉपिंग | Retail Shopping
- फॅशन | Fashion
- सिक्युरिटी अँड सर्विलन्स | Security & Surveillance
- स्पोर्ट्स | Sports
- लिटिक्स अँड ऍक्टिव्हिटीज
- मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन | Manufacturing & Production
आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे प्रकार | Type of Artificial Intelligence
- Strong AI – या सिस्टम मध्ये सामान्य व्यक्तीची बुद्धिमत्ता असते जर या सिस्टमला कठीण काम दिले तरी त्या कठीण कामाचे सहजपणे निराकरण करू शकेल.
- Limited Memory – हि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम अशा प्रकारे डिझाईन केली गेली आहे ज्यामध्ये फक्त एकच विशिष्ट कार्य करण्याची क्षमता असते.
- Reactive Machines – या AI सिस्टम मध्ये कुठलेही मेमरी स्टोरेज नसते, म्हणजेच भविष्यात करायचे काम किंवा भूतकाळात केलेले काम याचा कुठलाही पुरावा या सिस्टम मध्ये राहत नाही.
अश्या पद्धतीने AI चे खूप प्रकार पडतात पण आपण त्यामधील काही महत्वाच्या प्रकाराबद्दल माहिती बघितली आहे.
FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Artificial Intelligence चे मुख्य प्रकार कोणते आहेत?
Reactive Machines.
Limited Memory.
Theory of Mind.
Self-Aware
Artificial Narrow Intelligence (ANI).
Artificial General Intelligence (AGI)
Artificial Super Intelligence (ASI)
Theory of Mind (Theory AI)
निष्कर्ष | Artificial Intelligence full Information in Marathi
अश्या प्रकारे आपण वरील लेखामध्ये Artificial Intelligence म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तसेच तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की कंमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.
तसेच तुम्हाला या लेखाबद्दल काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कळवा आम्ही तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद!
Very important and information very nice information
🙏धन्यवाद!🙏