ATM म्हणजे काय? | What is ATM in Marathi?

ATM म्हणजे काय

आपल्याला बँकिंग सेवा अधिकाधिक सुरळीत होण्यासाठी सुरू झालेली ही सेवा जणू वरदान च आहे. एक छोटेसे पाकिटात बसणारे कार्ड म्हणजे आपल्यासाठी आपली पैसे देणारी बँक बनलेली आहे. पैसे काढण्यासाठी आपल्याला आधी बँकेत जावे लागत असे मात्र आता हे एटीएम कार्ड आणि एटीएम मशीन आपले काम सोपे करत आहे.

हे सर्व आपल्याला माहीत जरी असले तरी देखील Atm म्हणजे काय? एटीएम चा फुल फॉर्म काय आहे? आपण आजपर्यंत जो फुल फॉर्म समजत होतो तो फॉर्म एटीएम चा नाहीये त्यामुळे एकदा लेखात योग्य फुल फॉर्म काय आहे याविषयी देखील वाचा. 

मागील पोस्ट मध्ये आपण बँक बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे तसेच ATM हि सुद्धा बँकेमार्फत ग्राहकांना दिली जाणारी एक सुविधा आहे. तर चला आज एटीएम मशीन आणि एटीएम कार्ड यांच्याविषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून वाचायला मिळेल.

ATM म्हणजे काय? | What is ATM Meaning in Marathi

ATM ज्याला ऑटोमेटेड टेलर मशीन असे सुद्धा म्हटले जाते. हे एक प्रकारचे कार्ड असते जे बँकेच्या मार्फत खातेधारकांना प्रोव्हाइड केले जाते. या कार्ड च्या साहाय्याने खातेधारकांच्या बँक खात्यामध्ये असलेले रक्कम तपासण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी किंवा खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी त्याचप्रमाणे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. 

त्याचप्रमाणे झालेल्या व्यवहारांचे विवरण / पावती सुद्धा ATM मशीन द्यारे मिळवल्या जाते. आणि या सर्व व्यवहारांसाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज पडत नाही. केवळ ज्या शॉप मध्ये ठिकाणी मशीन असेल तेथे जावे लागते. तसेच बँकेच्या खातेधारकांना पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकेच्या लाईन मध्ये लागण्याची काहीही आवश्यकता नसते. म्हणून ATM चा वापर करावा यामुळे आपला किमती वेळ वाचतो.


ATM फुल फॉर्म – Full Form of ATM in Marathi

आपल्याला परीक्षेत पर्याय असायचे आणि आपल्याला त्यात एटीएम चा फुल फॉर्म विचारला जायचा. त्यातील एक हमखास अनेक जण निवडायचे तो पर्याय म्हणजे Any Time Money! जे कार्य आहे त्यानुसार हा फुल फॉर्म आहे असेच अनेकांना वाटते मात्र त्याचा खरा फुल फॉर्म हा ऑटोमेटेड टेलर मशिन (Automated Teller Machine) आहे.


ATM चा वापर कसा करतात? | How to Use ATM

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेला एटीएम कार्ड साठी मागणी करावी लागेल आणि पोस्टाच्या माध्यमातून किंवा बँकेत जाऊन तुम्हाला एटीएम कार्ड दिले जाईल.

कार्ड मिळाल्यानंतर त्याचा पहिला पिन एका कागदाच्या लिफाफ्यात तुम्हाला मिळेल. तुम्ही हा पिन बँकेच्या एटीएम मशिन मध्ये जाऊन बदलून घेऊ शकता. काही बँका सध्या असा पिन न पाठविता तुमच्या मोबाईल वरून त्यांना मेसेज टाकून पिन प्राप्त करायला सांगतात.

बँकेच्या जवळच किंवा तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला एटीएम मशीन बघायला मिळेल. हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन असते. यामध्ये तुम्हाला कार्ड टाकण्यासाठी एक जागा दिलेली असते. यामध्ये कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला समोर असलेल्या स्क्रीन वर भाषा निवडण्यास सांगितले जाऊ शकते. त्यानंतर पुढील स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा 4 अंकी पिन टाकावा लागेल.

तुम्हाला तुमच्या खात्याचा प्रकार देखील निवडण्यासाठी पर्याय असतो. शक्यतो आपले खाते हे सेव्हिंग (बचत) खाते असते. याशिवाय करंट (चालू) खाते देखील असते. पुढे क्लीक केल्यानंतर तुम्हाला Balance (खाते शिल्लक रक्कम), Withdrawal (पैसे काढणे), Pin Change (पिन बदलणे) यासारखे काही पर्याय दिसतात. 

शिल्लक रक्कम | Balance 

या टॅब वर क्लीक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात असलेली शिल्लक रक्कम दिसेल. 

पैसे काढणे | Withdrawal 

तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन निवडावे लागेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रक्कम विचारली जाईल. ती रक्कम तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला एटीएम मशिनच्या कॅश आऊट ठिकाणावरून पैसे बाहेर काढता येतील. मशीन मधून काही काळ पैसे मोजत आहेत असा आवाज तुम्हाला येईल आणि मग नंतर कॅश आऊट जागेवरील झाकण उघडून त्यातून तुमची रक्कम बाहेर येईल.

पिन बदल | Pin Change

तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डचा पिन बदलण्यासाठी या ऑप्शनला क्लीक करावे लागेल.

व्यवहार | Transactions 

या टॅब वर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यावर झालेले मागील 5 व्यवहार बघू शकता. जेव्हा कधी तुम्ही एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करता तेव्हा त्या व्यवहाराची एक पावती तुम्हाला एटीएम मशीन मधून मिळते. कधी त्या मशीन मध्ये पावती देण्यासाठी पेपर शिल्लक नसेल तर तसा मेसेज ते तुम्हाला व्यवहार करण्याच्या आधीच स्क्रीनवर दाखवते.

या ऑप्शन्स शिवाय अनेक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतील परंतु मुख्य ऑप्शन्स विषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. काही एटीएम मशीन मध्ये ही प्रक्रिया पुढे मागे असू शकते मात्र यात जास्त बदल नसतात.


ATM कार्ड वरील माहिती – ATM Card Information in Marathi

भारतातील जवळपास सर्व बँकांच्या एटीएम कार्डवर 16 अंकी नंबर लिहिलेला असतो. भारताबाहेरील काही देशांमध्ये हा नंबर 13 अंकी किंवा 19 अंकी देखील असतो. 

16 अंकांपैकी पहिला अंक हा कार्ड च्या सिस्टम विषयी माहिती देत असतो. तुमच्याकडे मास्टरकार्ड असेल तर त्याचा सुरुवातीचा अंक हा 5 आणि व्हिसा कार्ड असेल तर हा अंक 5 असतो. वेगवेगळ्या कार्ड सिस्टम सध्या बाजारात आहेत त्यात मास्टरकार्ड, व्हिसा, रूपे या काही मुख्य सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या आहेत.

पुढील 5 अंक हे बँकेच्या विषयी माहिती देत असतात. म्हणजे तुमच्या बँकेची माहिती या अंकांमधून होते. पुढील 9 अंक हे प्रत्येक व्यक्तीच्या खाता क्रमांक सांगतात आणि शेवटचा अंक हा चेक डिजिट म्हणून ओळखला जातो.

Valid From

काही एटीएम कार्ड वर ही तारीख नसते मात्र ज्यावर असते त्यात महिना आणि वर्ष दिलेले असते. या महिन्यापासून तुमचे कार्ड सुरू झालेले असते.

Expires End

तुमचे कार्ड किती दिवसांसाठी सुरू राहील याची माहिती या Expires End वरून कळते. यात तुम्हाला महिना आणि वर्ष दिलेले असते. त्या महिन्यानंतर तुम्ही कार्ड वापरु शकत नाही. बँक तुम्हाला त्यानंतर एक नवीन एटीएम कार्ड पाठवते.

ATM कार्ड धारकाचे नाव | Card Holder Name

काही बँक तुम्हाला कार्डवर खातेधारकाचे नाव टाकण्याची परवानगी देतात. आता जवळपास सर्व बँका एटीएम कार्डवर कार्ड होल्डरचे नाव देतात.

CVV म्हणजे काय? | What is CVV in Marathi

CVV म्हणजे Card Security Value होय. हा तीन अंकी ATM पिन सारखा एक सिक्युरिटी कोड असतो. एटीएम कार्डच्या पाठीमागील बाजूस हा कोड दिलेला असतो.  


ATM पिन विषयी मजेदार गोष्ट

तुम्ही कधी विचार केला आहे का की एटीएम पिन हा 4 अंकीच का असतो? याविषयी एक खूप मजेदार गोष्ट आहे. जॉन यांनी जेव्हा एटीएमचा शोध लावला तेव्हा त्यांनी पिन हा 6 अंकी ठेवला होता. त्यांना तेव्हा वाटले की जास्त अंक असल्याने जास्त सिक्युरिटी असेल आणि त्यावेळी त्यांना अस देखील वाटले की 6 अंकी कोड कोणीही लक्षात ठेवू शकतो. 

मात्र जेव्हा त्यांच्या पत्नीने हे एटीएम वापरायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्यांना हा 6 अंकी पिन लक्षात ठेवणे कठीण झाले. त्यांना 4 अंकी पिन लक्षात ठेवणे सोपे वाटू लागले. याच्या पाठीमागे जर मनोवैज्ञानिक कारण बघितले तर मनुष्याला एखादा 4 अंकी कोड लक्षात ठेवायला 6 अंकी कोड पेक्षा जास्त सोयीस्कर जाते. 

त्यामुळे ATM Pin हा 6 अंकी न ठेवता त्याला 4 अंकी बनविले गेले.


ATM वापरताना घ्यावयाची काळजी – Tips While using ATM card

  1. ATM मशीन वापरत असताना त्या एटीएम रूम मध्ये तुम्ही सोडता कोणी नसावे याची खात्री करून घ्यावी.
  1. कार्डचा 4 अंकी पिन शक्यतो कुठे लिहून ठेवू नये किंवा कोणाला सांगू देखील नये.
  1. एटीएम कार्ड वापरत असताना आपल्या पाठीमागून कोणी आपला पिन बघत नाहीये ना याची खात्री करावी.
  1. अनोळखी व्यक्तीवर एटीएम वापरत असताना विश्वास ठेवू नये. कोणालाही तुमचे कार्ड वापरायला किंवा पैसे काढायला मदत करण्यासाठी देऊ नये.
  1. एटीएम कार्ड हरवले तर लगेच बँकेशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी. एटीएम कार्ड ब्लॉक करून घ्यावे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

ATM चा शोध कोणी लावला?

एटीएम चा शोध जॉन शेफर्ड बैरन (John Shepherd-Barron) यांनी लावला होता. जॉन हे स्कॉटलंड मध्ये जरी असले तरी देखील त्यांचा जन्म हा भारतातील शिलॉंग या शहरात झाला होता. 

ATM च्या माध्यमातून कोणकोणते व्यवहार केले जातात? 

Atm च्या साहाय्याने ऑटोमेटेड टेलर मशीन मधून पैसे काढणे, पैसे जमा करणे त्याचप्रमाणे आपल्या बँक खात्याची स्टेटमेंट काढणे तसेच बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत हे तपासणे अश्या प्रकारची कामे या कार्ड द्वारे केल्या जातात. तसेच हे सर्व कार्य करायला कोणत्याही बँकमध्ये जाण्याची गरज भासत नाही.

एटीएम मधून पैसे कसे काढायचे? | How to withdraw money from an ATM?

ATM मधून पैसे काढण्यासाठी पुढील स्टेप फोल्लो कराव्या लागतील. 
1. सर्वात प्रथम एटीएम कार्ड मशीन मध्ये इन्सर्ट करा. 
2. नंतर ATM मशीन च्या स्क्रीन वर सिलेक्ट भाषा असे पर्याय असतील त्यामधून भाषा सिलेक्ट करून घ्यावी. 
3. आता स्क्रीन वर दिल्या प्रमाणे कोणतेही दोन अंक टाईप करावे आणि नंतर ATM कार्ड पिन एंटर करावा. 
4. पिन एंटर केल्यानंतर WITHDRAW या पर्यायावर क्लिक करा. 
5. त्यानंतर तुमचे बँक खाते कोणत्या प्रकारचे आहे म्हणजेच SAVING ACCOUNT, CURRENT ACCOUNT, KCC ते सिलेक्ट करावे.  
6. आता तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ते टाईप करा, एंटर प्रेस करा. आता तुम्हाला एटीएम मशीन मधून पैसे मिळतील, आणि तुमचा व्यवहार झाला म्हणून तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट सुद्धा मिळून जाईल.


निष्कर्ष | ATM बद्दल संपूर्ण माहिती

आपण वरील प्रमाणे ATM म्हणजे काय? (Atm Meaning in Marathi) त्याचा वापर कसा करावा? आणि मराठीमध्ये एटीएम संबंधित संपूर्ण आणि विस्तृत माहिती या लेखाच्या माध्यमातून बघितली आहे. 

जर तुम्हाला ही Atm बद्दल ची हि पोस्ट महत्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेयर करा. त्यांना सुद्धा महत्वाच्या आणि उपयुक्त माहितीचा लाभ घेता येईल. आणि तुम्हाला लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कळवा.

🙏तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!🙏

Leave a Reply