आजच्या बदलत्या आधुनिक युगात बॅंक ही एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बॅंक ही एक आर्थिक संस्था असून ती ग्राहकांच्या वित्ताची सुरक्षित व्यवहार करणारी अर्थव्यवस्थेतील एक सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे. जी ग्राहकांचे पैशांचे व्यवहार सुरक्षितपणे पार पाडत असते. बँकेला ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचा आणि गरजूंना कर्जाऊ रक्कम देण्याचा परवाना मिळाला आहे. बॅंक ही अनेक वित्तीय सेवा देण्याचे कार्य करीत असते,
तुम्हाला बँक काय आहे? हे माहितीच असेल कारण अशी कोणतीही व्यक्ती नसेल की त्याचे बँकेत व्यवहार नसतील. तरी पण आज या लेखामधून आपण बँक बद्दल संपूर्ण माहिती पाहूया. (What is Bank in Marathi and Bank information in Marathi)
बॅंक म्हणजे काय? Bank Meaning in Marathi
बँक ही अशी संस्था आहे जी जनतेकडून ठेवी स्वीकारते आणि गरजू लोकांना कर्जाऊ रक्कम देते त्याचप्रमाणे बचतीला प्रोत्साहन देऊन त्याचे गुंतवणुकीत रूपांतर करते.
पैशाचे व्यवहार करणारी संस्था म्हणजे बँक होय.
ठेवी स्वीकारणे, त्या ठेवीत रक्षण करणे, मागता क्षणी ठेवी परत करणे, कर्जे देणे आणि बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला बँक असे म्हणतात.
बॅंक प्रणाली ही प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा आहे. विकसित, अविकसित,विकसनशील अश्या प्रत्येक देशाच्या अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी बॅंक ही महत्त्वाची असते. तसेच अर्थव्यवस्था सक्षमपणे चालवण्यासाठी बँकेला सर्वात महत्वाचे मानले जाते.
हे पण वाचा >> Share Market म्हणजे काय?
बँकेचा इतिहास | Bank History in Marathi
आधुनिक बँकिंग चे जनक म्हणून ओळखले जाणारे ‘ अलेक्झांडर हॅमिल्टन ‘ यांच्या अथक प्रयत्नाने अमेरिकेत प्रथम मध्यवर्ती बँकेचे स्थापना केली गेली. भारतातील सर्वात जुन्या बँकेचा विचार केल्यास भारतातील सर्वात जुनी व्यावसायिक बॅंक SBI उत्पत्ती ही १८०६ मध्ये bank of kolkata म्हणून झाली.
भारतातील मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाणारी ‘ रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ‘ ची स्थापना ही १९३५ मध्ये झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबई मध्ये आहे. देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवून चलन विषयक धोरण ठरवण्याचे व अर्थव्यवस्थेतील आर्थिक समतोल सुरळीत ठेवण्याचे काम RBI करत आहे.
बँकेची कार्य | How Bank in Work
बँक हे एक असे ठिकाण आहे जेथे पैशाचे सर्व व्यवहार केले जातात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा असेल तर ती व्यक्ती बँकेमध्ये ठेवी ठेवीत असते, आणि जर पैसा नसेल तर त्या बँकेकडून कर्ज सुद्धा घेऊ शकते. अशा प्रकारे बँका जी कार्य करतात त्याला दोन विभागात विभागले जाते.
>> UPI म्हणजे काय संपूर्ण माहिती
बँकांचे प्राथमिक कार्य (Primary Function)
बँकांचे प्राथमिक कार्याचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते.
I) ठेवी स्वीकारणे
बँकांमध्ये ठेवलेली रक्कम जी खातेदार बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात जमा करतात. तर बँकांच्या त्या देणी लागतात. बँका लोकांकडून ठेवी स्वीकारण्याचे कार्य करत असतात या ठेवी मध्ये विशिष्ट प्रमाणात व्याज सुद्धा दिले जाते. बँकेमध्ये पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जातात.
- मागणी ठेवी | Demand Liabilities
मागणी ठेव खात्यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या खात्यातील रक्कम मिळते त्याला च मागणी ठेवी असे म्हणतात. जमाकर्त्याच्या इच्छेनुसार धनादेश किंवा रोख रक्कम परत करणे.
- बचत ठेवी
या ठेवीचा मुख्य उद्देश लोकांना बचतीची सवय लावणे हा असतो. सामान्यतः मजुरी, पगार किंवा ठराविक उत्पन्न असलेल्या लोकांकडून बचत खाती काढल्या जातात. बँका बचत ठेवीच्या स्वरूपात लोकांचा पैसा स्वीकारतात आणि या ठेवीवर व्याजदर कमी दिला जातो. तसेच या ठेवीतील रक्कम काही अटीच्या आधीन राहून काढता येते. बचतीची सवय लागावी म्हणून ही सुविधा चांगली भूमिका बजावते.
- चालू ठेवी
या ठेवी मध्ये दिवसातून कितीही वेळा बँकेत पैसे टाकणें किंवा काढले जाऊ शकतात यावर काहीही मर्यादा नसते. ह्या ठेवी सहसा उद्योग कर्ते, प्रमंडळ, सार्वजनिक संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था किंवा औद्योगिक प्रतिष्ठाने इत्यादी द्यारे चालवल्या जातात. तसेच या ठेवीवर बँकेकडून कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जात नाही.
- मुदत ठेवी
बँक मध्ये एका विशिष्ट वेळे साठी किंवा मुदतीसाठी जी रक्कम ठेवली जाते तिला मुदती ठेवी म्हणतात. तसेच यामध्ये ज्या ठेवी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी स्वीकारल्या जातात त्याला मुदत ठेवी असे म्हणतात. या ठेवी मध्ये असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधी नंतर काढता येते. या ठेवीवर दिला जाणारा व्याजदर सर्वात जास्त असतो.
>> बँकेचा IFSC Code काय असतो सविस्तर माहिती
II) कर्जे देने
उद्योग, व्यापार किंवा वाणिज्य या क्षेत्रा मध्ये जेव्हा ही पैशाची गरज भासते तेव्हा ह्यांना योग्य कर्जाचा पुरवठा बँक करत असते. तसेच बँक त्याच्या ग्राहकांना सुद्धा पैसा पुरवीत असतात. बँकांनी ग्राहकांना पुरवलेली ही कर्जे बँकांची संपत्ती असतात. तर ग्राहकांची देणी असतात. बँका कर्ज पुरवठा करून त्या कर्जावर योग्य व्याज सुद्धा आकारीत असतात.
बँकांचे दुय्यम कार्य (SECONDARY FUNCTION)
I) रोख रकमा जमा करणे
बँका ग्राहकांच्या वतीने येणाऱ्या रोख रकमा, धनादेश, वाचन चिठ्या आणि बिले सांभाळण्याचे कार्य करतात.
II) देणी देणे
दोन व्यक्तींमध्ये रकमेची देवाण घेवाण करणे बँकांच्या माध्यमातून शक्य होते. समजा गणेश राधाला रक्कम देऊ इच्छितो तर तो बँकच्या माध्यमातून ही देणी देऊ शकतो. बँकेच्या माध्यमातून payment करण्याचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
उदा : ऑनलाईन दूरध्वनी बिले, वीजबिले भरणे आणि चेक देण्याचे काम बँका करतात.
III) ई बँकिंग सुविधा
ई बँकिंग म्हणजे च इलेक्ट्रॉनिक बँकिंग. ई बँकिंग म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक घटकाच्या साहाय्याने केली जाणारी बँकिंग म्हणजेच ई बँकिंग होय. तसेच ई बँकिंग मध्ये बँकेची सर्व कामे संगणकाच्या मदतीने केल्या जातात. या बँकिंग ला VIRTUAL BANKING असे सुद्धा म्हणतात. आज ई बँकिंग चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामध्ये ऑनलाईन पैसे पाठवणे काढणे इत्यादी कामे सुलभ झाली आहेत.
IV) ATM, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सेवा
ATM म्हणजे Automated Teller Machine होय. याचा वापर बँकेमधून पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी केला जातो, क्रेडिट कार्ड यालाच payment Card सुद्धा म्हणतात.
या कार्ड चा वापर विविध प्रकारचे पेमेंट देण्यासाठी केला जातो. तसेच हे कार्ड असणाऱ्या ग्राहकांना बँक पैसे वापरण्याची सुविधा उपलब्ध होते. बँकेच्या डेबिट कार्ड द्वारे कार्डधारकाच्या खात्यातील रक्कम ताबडतोब दिली जाते.
V) नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग
नेट आणि मोबाईल बँकिंग ची सुविधा ग्राहकांना उपलब्ध झाल्यामुळे ग्राहक त्यांच्या मोबाईल, laptop आणि कॉम्प्युटर च्या मदतीने घरबसल्या बँकेचे व्यवहार करण्यास सक्षम झाले आहेत.
या व्यतिरिक्त सुद्धा बँका खूप कार्य करत असतात आणि विविध प्रकारच्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
हे पण वाचा >> इंटरनेट म्हणजे काय?
बँकांचे प्रकार | Bank Type in Marathi
बँक एक प्रकारची आर्थिक व्यवहार करणारी संस्था आहे जी ठेवी आणि इतर ग्राहकांच्या आवश्यतेनुसार विविध प्रकारच्या सेवा प्रदान करते.
मध्यवर्ती बँक
मध्यवर्ती बँकेला केंद्रीय बँक सुद्धा म्हटले जाते. ही बँक देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून ओळखल्या जाते. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही केंद्रीय मध्यवर्ती बँक आहे.
व्यावसायिक बँक
व्यापारी बँका म्हणजेच वाणिज्य बँका होय. ह्या बँका देशाच्या विकासामध्ये खूप महत्वपूर्ण असतात. भारतामध्ये व्यावसायिक बँक तीन भागात विभागल्या जातात.
1) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
ज्या बँकेचे जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या जवळ असते त्या बँकेला सार्वजनिक क्षेत्रातील बँका असे म्हणतात. उदा : स्टेट बँक ऑफ इंडिया.
2) खाजगी क्षेत्रातील बँका
ज्या बँकेचे जास्तीत जास्त भांडवल एका खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असते त्याला खाजगी क्षेत्रातील बँक असे म्हणतात. उदा : Axix Bank, HDFC Bank इत्यादी.
3) परदेशी बँका
भारताबाहेर स्थापन झालेल्या पण भारतामध्ये शाखा असलेल्या बँका म्हणजे परदेशी बँका होय. उदा : CITI Bank, HSBC Bank, Standard Chartered Bank इत्यादी.
सहकारी बँक
भारतामध्ये सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कायद्या अंतर्गत 1904 साली सहकारी बँक स्थापन झाली. या बँकेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील लोकांना, शेतकरी आणि लघुउद्योगांना पतपुरवठा करणे हे आहे. ह्या बँका तीन विविध स्तरावर कार्यरत असतात.
1) प्राथमिक पतसंस्था बँक
ही पतसंस्था ग्रामीण भागामध्ये कार्यरत असतात. या बँका लोकांकडून ठेवी गोळा करतात आणि गरजूंना कर्ज देतात.
2) जिल्हा मधयवर्ती सहकारी बँक
ही बँक जिल्हा स्तरावर कार्यरत असते. तसेच ग्रामीण बँकेला निधी पुरवणे व देखरेख करणे ही कार्य जिल्हा बँक करते.
3) राज्य सहकारी बँक
ही बँक राज्य स्तरावर कार्य करत आहे. तसेच जिल्हा व ग्रामीण बँकेला निधी पुरवण्याचे कार्य सुद्धा ही बँक करते.
औद्योगिक विकास बँक
औद्योगिक विकास बँक विविध व्यावसायिक संस्थांना पतपुरवठा करून त्यांचा विकास करण्याचे कार्य करत असते. उदा : IFCI, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी.
विनिमय बँक
विनिमय बँकेच्या मदतीने विदेशी व्यापार व्यवहारांना सुलभ वित्तपुरवठा करता येतो. तसेच विनिमय बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करणे, पतपत्र देणे, इत्यादी कार्य या बँक करतात.
प्रादेशिक ग्रामीण बँक
प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना 1975 मध्ये झाली. या बँका ग्रामीण भागातील ठेवी जमा करतात आणि शेतकरी मजूर यांना कर्ज देण्याचे कार्य करतात.
बचत बँक
बचत बँक चा मुख्य हेतू ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने बँका स्थापन झालेल्या आहेत. उदा : टपाल बचत बँक, व्यावसायिक बँक आणि सहकारी बँक इत्यादी.
निष्कर्ष :
अशा प्रकारे आपण बँक म्हणजे काय? आणि बँकेचे विविध प्रकार कोणते आहेत याबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती बघितली आहे.
तरी पण तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न किंवा प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच आमच्या सोबत शेअर करा आणि आमचा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका.
🙏धन्यवाद🙏
Very nice 👍 💯
🙏धन्यवाद!🙏
Thanks
Very nice👍
🙏धन्यवाद!🙏
Khup easy words madhe information ahe. Samjayla easy ahe. Thanks for information 🙏😊
🙏धन्यवाद!🙏
Good very well
🙏धन्यवाद!🙏
Pingback: मोबाईल फोनवर निबंध | Essay on Mobile Phone in Marathi