How to Earn Money from Facebook in Marathi | फेसबुक मधून पैसे कसे कमवायचे

फेसबुक मधून पैसे कमवण्याचे महत्वाचे मार्ग

नमस्कार मित्रांनो, आजचा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे. तुम्ही social media वर खूप टाईमपास करता, म्हणजे तुम्ही खूप वेळ Facebook, Whatsapp, Instagram या सोशल मीडिया वर खूप वेळ वाया घालवता.

तुमचा किमती वेळ वाया जाऊ नये म्हणून आज तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलो आहे. तुम्ही सोशल मीडिया सुद्धा वापरा आणि पैसे सुद्धा कमवा. या लेखामध्ये तुम्हाला फेसबुक मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (Learn How to Earn Money from Facebook in Marathi Language)

Facebook हे सोशल नेटवर्क खूप लोकप्रिय बनले आहे. जगातील जास्तीत जास्त वापरल्या जाणारे सोशल नेटवर्क Facebook हे आहे. काही लोक मनोरंजनासाठी Facebook चा वापर करतात, तर काही लोक यातून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. पण मी आज तुम्हाला Facebook मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल काही महत्वपूर्ण मार्ग सांगणार आहे. जर तुम्हाला सुद्धा Facebook मधून पैसे कमवायचे आहेत तर हा लेखामध्ये दिलेले मार्ग तुमच्या खूप उपयोगी पडतील.

तसेच तुम्ही Facebook वर वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही हा लेख वाचायलाच हवा म्हणजेच तुमचा किमती वेळ वाया जाऊ नये आणि तुम्ही काही पैसे सुद्धा कमवाल. 

 जर तुम्हाला इंस्टाग्राम मधून पैसे कमवायचे असतील तर आम्ही तुमच्या साठी इंस्टाग्राम बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

फेसबुक नक्की काय आहे | What is Facebook in Marathi 

तुम्हाला माहीतच असेल कि फेसबुक काय आहे. फेसबुक हा जगातील सर्वात लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लैटफॉर्म आहे. सोशल मीडिया प्लैटफॉर्म मध्ये आपण नवनवीन मित्र जोडू शकतो, त्या मित्रांशी गप्पा मारू शकतो. तसेच आपले फोटो, विडिओ अपलोड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण Facebook मधून देश विदेशातील बातम्या पाहू शकतो. 

फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे

तसेच या मीडिया मधून आपल्याला नवनवीन तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्र, क्रीडा क्षेत्र शिक्षण क्षेत्र अशा प्रकारच्या विविध क्षेत्रातील ज्ञान अवगत होत असते. Facebook या सोशल नेटवर्क च्या माध्यमातून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. अशा प्रकारे या सोशल मीडिया चे खूप फायदे आहे.

फेसबुक हि एक सोशल नेटवर्किंग साईट आहे, जी आपल्याला व आपल्या कुटुंबातील व्यक्तीला या ऑनलाईन जगाशी कनेक्ट करते. फेसबुक हे मार्क झुकरबर्ग यांनी २००४ साली तयार केले. मार्क झुकरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेत असताना केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फेसबुक बनवले होते.

पण आज फेसबुक जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क आहे. जगभरात Facebook या सोशल नेटवर्कचा वापर करणारे १ अब्जाहून अधिक वापरकर्ते उपलब्ध आहेत.

वरील माहिती वरून तुम्हाला फेसबुक म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेलच. तर चला आता आपण फेसबुक मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल महत्वाचे काही मार्ग बघूया.


फेसबुक मधून पैसे कसे कमवायचे? | Earn Money from Facebook in Marathi

फेसबुक मधून पैसे मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत आम्ही त्यातील काही सर्वोत्तम 6 मार्गाबद्दल मराठी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयुक्त पडेल. (Top 6 Ways to Make Money On Facebook Page In Marathi – 2021)

1) फेसबुक मार्केटप्लेस | Facebook Marketplace

मराठीमध्ये फेसबुक वरून पैसे कमविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग समजला जातो. या मध्ये फेसबुक च्या साहाय्याने आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची विक्री करता येते. फेसबुक मार्केटप्लेस हे एक नवीन फेसबुक चे फिचर आहे ज्या मध्ये आपण आपल्या प्रॉडक्ट ला स्वतः तयार करून त्याची विक्री करू शकतो. तसेच बरेच लोक आज या फेसबुक मार्केटप्लेस च्या माध्यमातून स्वतःच्या प्रॉडक्ट ची विक्री करून पैसे कमवीत आहेत. 

फेसबुक ने आपल्या ग्राहकांच्या उत्पादनाची खरेदी विक्री करण्यासाठी फेसबुक मार्केटप्लेस हे नवीन फिचर उपलब्ध करून दिले आहे. या फिचर च्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती फेसबुक मार्केटप्लेस वर आपल्या उत्पादनाची म्हणजेच वस्तूची किंमत आणि फोटो अपलोड करून वस्तूची विक्री करू शकते. तसेच फेसबुक मार्केटप्लेस मध्ये विक्रीसाठी अपलोड केलेले प्रॉडक्ट जागतिक स्तरावरील लोकांपर्यंत पोहोचते. 

आणखी वाचा – युट्युब मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन मराठीमध्ये


2) फेसबुक फॅन पेज | Facebook Fan Page

फेसबुक फॅन पेज मधून पैसे कमविण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम एक फेसबुक पेज तयार करावे लागेल. तसेच तुम्ही फेसबुक पेज च्या माध्यमातून लोकांना कश्या संदर्भात माहिती देणार आहेत याबद्दल एक टॉपिक निवडून घ्यावा. नंतर त्या टॉपिक बद्दल विविध प्रकारची माहिती या पेज च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावी. जर तुम्ही या पेज मधून योग्य आणि महत्वाची माहिती लोकांना दिली तर तुमच्या पेज ला मोठ्या प्रमाणात लाईक आणि फोल्लोवर्स मिळतील. 

जर तुमच्या Facebook Page वर मोठ्या प्रमाणात फोल्लोवर्स आणि लाईक असतील तर तुम्हाला विविध कंपन्यांकडून स्पॉन्सरपोस्ट मिळतील तसेच मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे मिळतील. 


3) फेसबुक ग्रुप | Facebook Group

ज्याप्रमाणे तुम्ही व्हाट्सअँप वर विविध प्रकारचे ग्रुप तयार करीत असता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला फेसबुक वर ग्रुप बनवायचा असतो. या ग्रुप च्या माध्यमातून तुम्ही विविध शहरातील, गावातील लोक एकत्र येतात आणि त्याच्या जवळ असलेली विविध प्रकारची उपयुक्त माहिती या ग्रुप मध्ये शेयर करीत असतात. आणि काही लोक या ग्रुप मध्ये त्यांना असलेल्या समस्या सुद्धा सांगतात. आणि त्यावर उपाय सुद्धा शोधले जातात.  

तसेच या फेसबुक ग्रुप मधून मोठया प्रमाणात पैसे मिळवू शकता, यामधून पैसे कमविण्यासाठी तुमच्या फेसबुक ग्रुप वर मोठ्या प्रमाणात लोक असायला हवेत. तसेच या ग्रुप मध्ये एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची मार्केटिंग, स्पॉन्सर पोस्ट, इत्यादी मार्गाच्या साहाय्याने फेसबुक ग्रुप मधून पैसे कमवू शकता.  


4) प्रॉडक्ट ची विक्री | Sell Your Product

जर तुम्हाला फेसबुक च्या माध्यमातून प्रॉडक्ट्स विकून पैसे कमवायचे असतील तर त्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती आणि त्या प्रॉडक्ट चे विविध फोटोस किंवा व्हिडीओ फेसबुक अकाउंट किंवा फेसबुक पेज वर अपलोड करायला हवे. त्याचप्रमाणे तुम्ही फेसबुक मार्केटप्लेस वर सुद्धा तुमच्या प्रॉडक्ट ला सेल करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची लिंक फेसबुक अकाउंट च्या प्रोफाइल मध्ये ऍड करावी. अश्या प्रकारे तुम्ही प्रॉडक्ट ची विक्री करून मोठ्या प्रमाणात online पैसे कमवू शकता. 

आणखी वाचा – ऑनलाईन इंटरनेट च्या साहाय्याने पैसे कसे कमवायचे


5) फेसबुक फॅन पेज विक्री करणे | Selling Facebook Page

जर आपण तयार केलेल्या Facebook Page वर लाईक आणि फोल्लोवर्स संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर आपण पेज सेल म्हणजे विकून खूप पैसे कमवू शकतो. मोठं मोठ्या कंपन्यांना किंवा वेबसाईट ला त्यांच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ला प्रमोट करण्यासाठी जास्त फोल्लोवर्स असलेल्या फेसबुक पेज ची गरज असते म्हणूनच ह्या कंपन्या फॅन पेज खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देत असतात.

फेसबुक पेज बद्दल माहिती साठी आमच्या मराठी स्पिरिट फेसबुक फॅन पेज ला भेट द्या.

फेसबुक पेज वरून पैसे कसे कमवायचे

6) फेसबुक ऍड्स | Facebook Ads

आपल्या फेसबुक पेज ला प्रमोट करण्यासाठी ऍड्स चा वापर केला जातो पण आपण फेसबुक ऍड्स पार्टनर झालात तर आपल्याला विविध फेसबुक पेज प्रमोट करावे लागतील त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. म्हणजेच आपण आपल्या Facebook Page च्या माध्यमातून इतर पेज प्रमोट करून पैसे कमवू शकतो.  


FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

फेसबुक वरून पैसे कसे मिळवायचे?

फेसबुक मार्केटप्लेस किंवा विविध प्रकारच्या फेसबुक ग्रुप च्या माध्यमातून प्रॉडक्ट ची विक्री 
फेसबुक फॅन पेज ची विक्री 
फेसबुक द्वारे इन्फ्लुएन्सर विपणन (Influencer Marketing) 

फेसबुक बद्दल संपूर्ण माहिती 

या लेखामधून तुम्हाला फेसबुक म्हणजे काय? आणि फेसबुक मधून पैसे कसे कमवायचे (Earn Money on Facebook in Marathi) याबद्दल काही सोपे मार्ग सांगितले आहेत. तसेच या पोस्ट बद्दल तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर खालील कमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा. 

जर तुम्हाला लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना फेसबुक इंस्टाग्राम लिंक्डइन अश्या विविध सोशल मीडिया वर शेयर करा. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. Raksha

    तुमची information नी मला एक नवा मार्ग दिला शिकण्याचा Thank you so much 🙏🙏

  2. Sandeep Mastakar

    Very useful information on Facebook and you tube channel in simple language

    Kindly give information on how to reach max people using Facebook , Twitter Insta and Whatsapp ,

    What are hashtags and how it can be used .

  3. Pooja pandhare

    Feacebook mule mala anek mitr v नॉलेज भेटले
    मी feacebook ची आभारी आहे.