BA चा फुल्ल फॉर्म काय । BA full form in Marathi
BA चे संक्षिप्त रूप “Bachelor of Arts” असे होते, यालाच मराठी मध्ये आपण “कला शाखेतील पदवीधर” असे म्हणत असतो.
कला पदवी म्हणजेच BA हा एक डिग्री कोर्स आहे ज्याचा कालावधी तीन वर्षे इतका असतो, ह्या तीन वर्षात एकुण सहा सत्र असतात आणि एका वर्षामध्ये एकुण दोन सत्रांचा समावेश असतो.
BA म्हणजे काय? | Bachelor of Arts Meaning in Marathi
ज्या विद्यार्थ्यांनी बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे बीएचे शिक्षण घेण्याकरीता महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर ग्रॅज्युएट व्हायचे आहे आणि MPSC आणि UPSC अश्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे असे सर्व विद्यार्थी बीए या पदवी अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य देतात.
हा पदवी अभ्यासक्रम आपल्याला कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन घेऊन करता येतो, तसेच बीए करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या खाली असल्यास शिष्यवृत्ती देखील प्राप्त होते.
BA पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता | BA Course Information in Marathi
BA ला प्रवेश घेण्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान इत्यादी कुठल्याही एका शाखेतुन बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बीए ला प्रवेश घेण्यासाठी आपणास किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
SC, ST आणि OBC कॅटॅगरी मधील विद्यार्थ्यांना कॅटॅगरी नुसार टक्केवारी मध्ये विशेष सवलत दिली जात असते.
>> IAS फुल्ल फॉर्म काय आहे संपूर्ण माहिती वाचा
BA कसे करता येईल आणि BA करण्यासाठी फी किती लागेल?
बॅचलर ऑफ आर्टस् हा पदवी अभ्यासक्रम आपल्याला नियमित कॉलेज ला जाऊन प्राध्यापकांचे व्याख्याने पूर्ण करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. तसेच मुक्त विद्यापीठ मार्फत आणि ऑनलाईन पद्धतीने देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवू शकता.
या पदवी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपणास कुठलाही अधिक खर्च करण्याची आवश्यकता नसते अगदी कमी खर्चात तुम्ही हि पदवी मिळवू शकता. तसेच आपण कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहोत सरकारी किंवा खाजगी या वरून कॉलेज फी ठरत असते.
कला शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या संधी
बॅचलर ऑफ आर्टस् पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्राथमिक माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागता येते. याचसोबत आपण एखाद्या न्युज चॅनल साठी रिपोर्टर, पत्रकार म्हणून देखील काम करू शकतो.
>> BSC फुल्ल फॉर्म आणि या पदवी अभ्यासक्रमाबद्दल माहिती वाचा
वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रात जसे की रेल्वे, बॅक, पोस्ट ऑफिस इत्यादी सरकारी क्षेत्रामध्ये आपणास नोकरीच्या संधी प्राप्त होत असतात. बीए नंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी देखील बनू शकतात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ
BA हा पदवी अभ्यासक्रम किती वर्षाचा असतो?
कला पदवी अभ्यासक्रम हा सामान्यतः ३ वर्षाचा असतो पण काही विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम ४ वर्षाचा देखील असू शकतो.
अश्या प्रकारे कला शाखेबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली, तरी सदर माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कंमेंट करा.
धन्यवाद!!