मागच्या काही पोस्ट मध्ये आपण MPSC आणि UPSC या सर्वात कठीण असणाऱ्या परीक्षांबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या मधील केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC हि परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला IAS अधिकारी होता येते.
आता पाहायला गेले तर बऱ्याच तरुणांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न असते. मात्र आय.ए.एस अधिकारी होण्यासाठी लागणारी मेहनत व कष्ट किती असतात याबद्दल मात्र लोकांना ठाऊक नसते.
म्हणून आपण आजच्या ह्या लेखात आपण प्रशासकीय अधिकारी म्हणजेच IAS अधिकारी होण्यासाठी काय करावे, (IAS Meaning in Marathi) कोणती परीक्षा द्यावी, तसेच त्याचा अभ्यासक्रम व IAS म्हणजे काय? ही सर्व माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
IAS फुल्ल फॉर्म काय आहे? | IAS full form in Marathi
आयएएस चा फुल्ल फॉर्म Indian Administrative Service हा होय, मराठी मध्ये याला भारतीय प्रशासकीय सेवा असे म्हटले जाते. IAS अधिकारी होण्यासाठी ज्या प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या जातात त्या सर्व परीक्षा संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC द्वारे आयोजित केल्या जातात.
IAS फुल्ल फॉर्म | भारतीय प्रशासकीय सेवा | Indian Administrative Service |
UPSC फुल्ल फॉर्म | संघ लोकसेवा आयोग | Union Public Service Commission |
तसेच IAS अधिकारी हि सेवा भारतातील IPS, IFS अश्या इतर सेवांपैकी सर्वात महत्वाची आणि उत्कृष्ट सेवा समजली जाते. तुम्हाला जर आयएएस अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला सिविल सर्विस एक्झाम म्हणजेच नागरी सेवा परीक्षा मध्ये उत्तीर्ण होणे अतिशय आवश्यक आहे. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएस हा भारतातील बऱ्यशा लोकांसाठी एक अत्यंत प्रतिष्ठित करिअरचा पर्याय आहे.
IAS परीक्षा पात्रता | IAS Exam Eligibility
- उमेदवार हा भारतीय नागरिक असणे सर्वात महत्वाचे आहे.
- उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले होते आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहे ते उमेदवार देखील पात्र आहेत.
- IAS परीक्षेला बसण्यासाठी किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे, तसेच IAS परीक्षेसाठी कमाल वयोमार्याद ही १ ऑगस्ट २०२१ ला निघालेल्या परिपत्राका नुसार पुढील प्रमाणे असेल.
- सामान्य श्रेणीसाठी (General category) कमाल वयोमर्यादा हि 32 वर्षे आहे.
- OBC साठी वयोमर्यादा 35 वर्षे.
- SC/ST साठी उच्च वयोमर्यादा 37 वर्षे.
आणखी माहिती वाचा – NSDL चा फुल्ल फॉर्म काय आहे? संपूर्ण माहिती
IAS अधिकाऱ्याचे मुख्य काम काय असते?
IAS अधिकारी यांची कामे त्यांच्या पोस्टिंग आणि विभागनुसार वेगवेगळी असतात. म्हणजेच जिल्हा क्षेत्र, किंवा विभागाचा प्रशासकीय प्रभार, तसेच धोरण तयार करणे त्यानंतर त्या धोरणाची अंमलबाजावणी करणे आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स यांचे प्रमुख इत्यादी कार्यांचा समावेश असतो.
तसेच या अधिकाऱ्याला विविध मिशन वर देखील पाठवले जाऊ शकते, यांना खासगी संस्थांमध्ये देखील नियुक्त करण्याची तरतूद केलेली असते. आय ए एस अधिकारी ही सिविल सर्वंट म्हणून त्याच्या कामांच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रातील कायदा तसेच सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतात.
निष्कर्ष | IAS Information in Marathi
अश्या प्रकारे आपण सदर लेखामध्ये IAS फुल्ल फॉर्म, IAS म्हणजे काय? आणि इतरही IAS बद्दल सविस्तर माहिती मराठी मधून जाणून घेतली आहे. तरी तुम्हाला वरील लेखाबद्दल काही प्रश्न किंवा आणखी माहिती हवी असल्यास नक्की कंमेंट करा. आणि त्याचप्रमाणे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना हा लेख शेअर करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ
IAS परीक्षा कितीदा देता येते?
IAS हि परीक्षा OBC साठी वयाच्या ३५ वर्षापर्यंत ९ वेळा देता येते, General Category साठी वयाच्या 32 वर्षापर्यंत 6 वेळा देता येते आणि SC/ST उमेदवारांना वयाच्या 37 वर्षेपर्यंत आणि कितीही वेळा हि परीक्षा देता येते.
IAS परीक्षेद्वारे कोणकोणत्या पदांवर नियुक्ती होते?
IAS परीक्षा पास केल्या नंतर IAS अधिकाऱ्याला वेग-वेगळ्या पदांवर नियुक्त केले जाऊ शकते ते पदे पुढील प्रमाणे आहेत.
आयुक्त
मुख्य सचिव
कॅबिनेट सचिव
निवडणूक आयुक्त
जिल्हा अधिकारी (DM)
सार्वजनिक क्षेत्र सचिव इत्यादी.
IAS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?
IAS अधिकारी होण्यासाठी संघ लोकसेवा आयोग या द्वारे परीक्षा आयोजित केल्या जातात. आणि त्याची निवड प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होते ते पुढीलप्रमाणे पाहूया.
पूर्व परीक्षा (Prelims Exam)
मुख्य परीक्षा (Mains Exam)
मुलाखत (Interview)
अश्या प्रकारे वरील दिलेल्या तीन टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात, हीच IAS परीक्षेसाठीची निवड प्रक्रिया असते.
धन्यवाद! 😎 😎
Great job
🙏धन्यवाद!🙏