MBBS Full Form in Marathi | MBBS म्हणजे काय?

MBBS चा फुल्ल फॉर्म

MBBS म्हणजे काय? | MBBS Meaning in Marathi

MBBS ही वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टरची पदवी आहे ज्यांना डाॅक्टर बनुन लोकांना आजारातुन बरे करून त्यांची सेवा करण्याची ईच्छा आहे असे सर्व विद्यार्थी एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
MBBS हि डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील एक उत्कृष्ट आणि मोठी पदवी आहे, या पदवीला भारतात तसेच परदेशात देखील नोकरीच्या विपुल प्रमाणात संधी आणि मागणी आहे.


MBBS फुल्ल फॉर्म । MBBS Full Form in Marathi

MBBS चा फुलफाॅम बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) असा होतो.


MBBS पदवी अभ्यासक्रम

एमबीबीएस हा एक वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम आहे ज्याचा कालावधी ५.५ वर्ष आहे. यात ४.५ वर्षाचा कालावधी एमबीए कोर्स पुर्ण करण्यासाठी लागतो अणि एक वर्ष इंटर्नशिपसाठी करावी लागते. या अभ्यासक्रमामध्ये एकुण ९ सेमीस्टर असतात ज्यात एक सेमीस्टर सहा महिने इतक्या कालावधीचे असते.

एमबीबीएस चे शिक्षण केलेला उमेदवार स्वताचे हाॅस्पिटल, क्लिनिक वगैरे सुरू करू शकतात किंवा दुसऱ्या एखाद्या हाॅस्पिटल मध्ये रूग्णांवर उपचार करण्याचे काम करू शकतो.


MBBS अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता 

  • एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमा करीता प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपण बारावी मध्ये सायन्स या शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे बारावी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. बारावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलाॅजी हे तीन विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SC, ST आणि OBC कॅटॅगरी मधील विध्यार्थ्यांना बारावी सायन्स मध्ये ४० % गुण असणे अणि पी डब्लू डी कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी ४५ % गुणासह बारावी सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे आपल्याला एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमासाठी एक उत्तम कॉलेज हवे असेल तर आपल्याला NEET हि परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण करणे खूप महत्वाचे असते. म्हणुन एमबीबीएस अभ्यासक्रमाला आपल्या आवडीच्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी सर्व विद्यार्थी नीट परीक्षेत जास्तीत जास्त चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.
  • MBA चा फुल्ल फॉर्म आणि सविस्तर माहिती वाचा
  • NEET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतातील कुठल्याही सरकारी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबी बीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त होतो. तसेच एमबी बीएस परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराचे वय १७ अणि कमाल वय २५ असणे आवश्यक असते.

NEET चा फुलफॉर्म काय आहे? । NEET Full Form in Marathi

NEET या शब्दाचा लॉन्ग फॉर्म National Eligibility Entrance Test असा आहे, यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा असे म्हणतात.  

ही एक प्रकारची एंट्रन्स परीक्षा असते ज्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या काॅलेजात एमबीबीएस करीता प्रवेश प्राप्त होतो.


MBBS मधील नोकरी च्या संधी 

  • हेल्थ सेंटर
  • हाॅस्पिटल
  • प्रायव्हेट क्लिनिक 
  • मेडिकल कॉलेज
  • लॅबोरेटरी 
  • रिसर्च सेंटर
  • नर्सिंग होम 
  • सामाजिक संस्था
  • मेडिकल फाउंडेशन

MBBS ला किती खर्च लागतो?

सरकारी काॅलेज मध्ये खाजगी काॅलेजच्या तुलनेत एमबीबीएस करीता कमी खर्च लागतो. खाजगी महाविद्यालया मधून MBBS चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वर्षाला ८ ते १० लाख इतका खर्च येऊ शकतो.

अणि सरकारी महाविद्यालयातुन MBBS चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वर्षाला १ ते २ लाख इतका खर्च लागु शकतो. तसेच MBBS ला किती फी लागेल हे आपण प्रवेश घेत असलेल्या काॅलेज वर अवलंबून असते.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न । FAQ 

MBBS चा फुल्ल फॉर्म काय आहे? 

MBBS चे संक्षिप्त रूप म्हणजेच फुल्ल फॉर्म  Bachelor of Medicine and Bachelor of Surgery असा आहे. 

NEET चा लॉन्ग फॉर्म काय आहे?

NEET या शब्दाचा फुल्ल फॉर्म National Eligibility Entrance Test म्हणजेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा असा होतो.   


अश्या प्रकारे आपण MBBS या पदवी अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती (MBBS Information in Marathi) बघितली आहे, तरी तुम्हाला सदर माहिती च्या संदर्भात काही प्रश्न असल्यास नक्की विचारा आणि या ब्लॉग पोस्ट ला तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद!!  

Leave a Reply