UPSC चा फुल्ल फॉर्म | UPSC full form in Marathi

UPSC चा फुल्ल फॉर्म काय आहे

नमस्कार मित्रांनो, मागील पोस्ट आपण MPSC फुल्ल फॉर्म आणि MPSC परीक्षा म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे.

त्याचप्रमाणे आजच्या या पोस्ट मध्ये आपण UPSC चा फुल्ल फॉर्म काय आहे? आणि UPSC परीक्षा म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. 

UPSC चा फुल्ल फॉर्म । UPSC full form in Marathi 

UPSC चा फुल्ल फॉर्म “Union Public Service Commission” असा होतो आणि मराठी मध्ये याला “केंद्रीय लोकसेवा आयोग” किंवा “संघ लोक सेवा आयोग” असे म्हणतात. आता देखील आपण पाहायला गेलो तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेचशे विद्यार्थी यूपीएससी या परीक्षेची तयारी करत आहेत. 

UPSC Full FormUnion Public Service Commission | केंद्रीय लोकसेवा आयोग

यूपीएससी ही एक राष्ट्रीय स्तरावरील सिविल सर्विस परीक्षा आहे व या परीक्षेद्वारे केंद्रीय स्तरावरील गट अ आणि गट ब अश्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. तसेच या परीक्षेद्वारे दरवर्षी केंद्रीय स्तरावरील 24 सर्वात उच्च सिविल सर्विसेस पदांसाठी भरती केली जाते.


UPSC परीक्षा म्हणजे काय? । UPSC Meaning in Marathi

UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग होय, ही एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वोकृष्ट सिविल सर्व्हिसेस परीक्षे पैकी एक आहे. यूपीएससी चे मुख्यालय हे नवी दिल्ली मध्ये स्थित आहे, तसेच या संस्थेची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. व नंतर यूपीएससी ला भारतीय संविधानानुसार मान्यता देखील देण्यात आली. UPSC ची संस्था पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असते तसेच राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही.

यूपीएससी ही परीक्षा पास झाल्यानंतर पुढील प्रमाणे दिलेल्या काही पदांसाठी निवड केली जाते. 

भारतीय प्रशासकीय सेवा । Indian Administrative Service (IAS)

भारतीय पोलिस सेवा । Indian Police Service (IPS)

भारतीय परराष्ट्र सेवा । Indian Foreign Service (IFS)

भारतीय महसूल सेवा । Indian Revenue Service (IRS)


UPSC परीक्षेसाठी पात्रता | UPSC Exam Eligibility

  • UPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी एखाद्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून पदवीधर असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही मुक्त विद्यापीठातील पदवी देखील येथे ग्राह्य मानले जाते.
  • तसेच फक्त भारतीय नागरिक ही यूपीएससी परीक्षेसाठी पात्र असतात.
  • पदवीधर असण्यासोबतच विद्यार्थ्यांचे वय सुद्धा या पात्रता टप्प्यामध्ये असावे लागते, विद्यार्थ्यांच्या जातीनुसार वयोमर्यादा मध्ये विविधता असतात 
  • तुम्ही जर जनरल कॅटेगरी मधून असाल तर परीक्षेसाठी वयोमर्यादा ही 32 वर्ष एवढी असते, तसेच जर तुम्ही इकॉनोमिकल विकर सेक्शन म्हणजेच ईडब्ल्यूएस या जातीचे असाल तर तुमच्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 42 एवढी असते, एससी एसटी यांच्यासाठी वयोमर्यादा ही 37 एवढी असते आणि तसेच ओबीसी यांच्यासाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे एवढे असते.

यूपीएससी परीक्षेचे स्वरूप | UPSC Exam Pattern

यूपीएससी भरती प्रक्रिया ही सर्व ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये विभागली गेलेली असते व या तीन टप्प्यांमध्येच ती पार पाडली जाते

  1. पूर्व परीक्षा | Pre-examination

UPSC मुख्य परीक्षा याची पात्रता ठरवण्यासाठी युपीएससी पूर्व परीक्षा ही घेतली जाते. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास होतात फक्त तेच उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात. तुम्हाला जर यूपीएससी पूर्व परीक्षा मध्ये पास व्हायचे असेल तर तुम्हाला 33% गुण असणे आवश्यक आहे व या परीक्षेचे मार्क हे फक्त मुख्य परीक्षेची पात्रता ठरविण्यासाठी वापरले जातात. 

2. मुख्य परीक्षा | Main Exam

जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झालेले असतात त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी बसण्यास पात्र असतात. मुख्य परीक्षेचे मार्क हे पद देताना ग्राह्य धरले जात नाहीत, मात्र मुख्य परीक्षेचे मार्क्स यावरच तुम्ही इंटरव्यू साठी पात्र आहात का नाही हे ठरवले जाते. यूपीएससी मुख्य परीक्षेचे स्वरूप- मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक भारतीय भाषा ,इंग्रजी, निबंध जनरल स्टडीज चे चार विभाग आणि दोन ऑप्शनल विषय असतात व हा पेपर एकूण 1750 गुणांचा असतो.

3. मुलाखत | Interview

यूपीएससी या परीक्षेतील सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्यू चा असतो यूपीएससी ची मुलाखत ही एकूण 275 गुणांची असते व यूपीएससी मुख्य परीक्षा पास होऊन जा आलेल्या उमेदवारांची मुलाखत ही घेतली जाते.


निष्कर्ष | UPSC Information in Marathi

अश्या प्रकारे आपण UPSC परीक्षेबद्दल संपूर्ण मराठी माहिती वरील लेखामध्ये बघितली आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला UPSC वरील माहिती समजली असेलच. तरी तुम्हाला सदर लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास आम्हाला नक्की कळवा. 

तसेच तुम्हाला आणखी काही विषयाबद्दल मराठी माहिती हवी असल्यास नक्की कंमेंट करा आणि त्याचप्रमाणे वरील लेखाला सोशल मीडिया वर तुमच्या मित्रांना शेअर करा. 


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

UPSC परीक्षा म्हणजे काय?

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि सर्वोकृष्ट सिविल सर्व्हिसेस परीक्षेपैकी एक परीक्षा आहे. या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारसाठी योग्य आणि पात्र उमेदवारांची भरती केली जाते. ही परीक्षा UPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अश्या तीन मुख्य टप्प्यांत घेतली जाते. तसेच या आयोगामध्ये IAS, IFS, IPS यांसारख्या विविध पदांसाठी विविध परीक्षा आयोजित केल्या जातात. 

UPSC चा फुल्ल फॉर्म काय?

UPSC चा फुल्ल फॉर्म “Union Public Service Commission” असा होतो, आणि UPSC ला मराठी मध्ये “केंद्रीय लोकसेवा आयोग” असे म्हणतात. 

धन्यवाद!

Leave a Reply