भारतीय कर प्रणालीमध्ये मुख्यतः प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर ह्या दोन कर प्रणालीचा समावेश होतो. पूर्वी Excise Duty, VAT, Entry Tax, Service Tax, Entertainment Tax आणि इतरही प्रकारचे अप्रत्यक्ष कर होते.
सरकारने या सर्व टॅक्स ला काढून टाकून या सर्वांचे मिश्रण म्हणून एकच टॅक्स अस्तित्वात आणला तो म्हणजे GST होय. आणि या कर प्रणालीला संसदेत 29 मार्च 2017 रोजी पारित करण्यात आले आणि १ जुलै २०१७ रोजी वस्तू आणि सेवा कर कायदा लागू करण्यात आला. या अप्रत्यक्ष कर प्रणालीला सरकारने वर्तमान कर संरचना सुधारण्यासाठी लागू केले आहे.
GST हा (गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स) वस्तू व सेवा कर आहे, म्हणूनच आज या पोस्ट मध्ये GST म्हणजे काय? हा कर कोणत्या वस्तू व सेवांवर लागू केला जातो किती प्रमाणात लागू केला जातो आणि गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
GST म्हणजे काय? | What is GST in Marathi
GST चा फुल्ल फॉर्म Goods and Services Tax म्हणजेच वस्तू आणि सेवा कर असा होतो. GST हा एक अप्रत्यक्ष कर आहे म्हणजेच तो प्रत्यक्ष पणे आकारला जात नाही. म्हणजेच एखाद्या वस्तू किंवा सेवेची खरेदी केल्यानंतर जो कर द्यावा लागतो त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. उदा. मोबाईल ची खरेदी. इत्यादी…
वस्तू आणि सेवा कर हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जातो. केंद्र सरकारने जीएसटी आकारण्याचे दर आणि धोरणे ठरवलेले आहेत. याचा फायदा म्हणजे एकच प्रकारचा टॅक्स असल्यामुळे प्रत्येक राज्य विविध वस्तू किंवा सेवेसाठी एकच दर आकारते आणि करदात्यांना सुद्धा याचा मोठा फायदा झाला तो असा कि एकच प्रकारचा टॅक्स असल्यामुळे त्यांना योग्य वेळेवर रिटर्न भरणे सोपे होते.
भारतामध्ये वस्तू व सेवा कर GST लागू होण्यापूर्वी अनेक प्रकारचे टॅक्स अस्तित्वात होते –
Central Excise Duty
Duties of Excise
State Vat
Central Sales Tax
Purchase Tax
Service Tax
Additional Duties of Customs
Special Additional Duty of Customs Cess
इत्यादी प्रकारचे सर्व कर अस्तित्वात होते. हे सर्व कर राज्यानुसार वेगवेगळे आणि कर आकारणी दर सुद्धा वेगवेगळे होते.
त्यामुळे देशातील कर प्रणालीमध्ये स्थिरता नव्हती. त्यामुळे कमी कर असणाऱ्या राज्यात उद्योगांचा विस्तार जास्त व जास्त कर असणाऱ्या राज्यात उद्योगांचा विस्तार कमी होत होता. उद्योग, कंपन्या कमी कर असणाऱ्या राज्यात उत्पादन घेऊन इतर राज्यात विकत असत. त्यामुळे संपूर्ण देशाच्या विकासासाठी व एक देश एक कर प्रणाली ची आवश्यकता भासू लागली.
GST लागू करण्यासाठी ३० जून २०१७ च्या रात्री संसदेचे अधिवेशन झाले. त्यामध्ये राष्ट्रपतींनी GST लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली व १ जुलै २०१७ पासून Goods and Service Tax लागू करण्यात आला. Goods and Services Tax Council हि मध्यवर्ती वैधानिक संस्था वस्तू व सेवा कर चे नियमन करते. केंद्रीय अर्थमंत्री हे या कॉउंसिल चे प्रमुख असतात.
>> हे पण वाचा : इंटरनेट म्हणजे काय संपूर्ण माहिती
जीएसटी चे घटक | GST Factor in Marathi
GST या कर प्रणाली अंतर्गत खालील प्रमाणे तीन कर लागू केले जातात.
CGST | Central Goods and Services Tax
CGST म्हणजेच (Central Goods and Services Tax) राज्यांतर्गत होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर केंद्र सरकार सीजीएसटी आकारत असते. केंद्र सरकार द्वारे जो कर आकारण्यात येतो त्याला सेंट्रल गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स असे म्हणतात. जर महाराष्ट्रा मध्ये एखाद्या वस्तूची खरेदी आणि विक्री होत असेल तर अश्या व्यवहारावर CGST लागतो.
SGST | State Goods and Services Tax
SGST म्हणजेच (State Goods and Services Tax) राज्यांतर्गत होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर राज्य सरकार SGST आकारात असते. यामध्ये व्यवहार हा एकाच राज्यामध्ये पूर्ण होणार असेल त्यावेळेस SGST आकारण्यात येतो. उदा. एखादी वस्तू महाराष्ट्र मध्ये खरेदी केली आणि महाराष्ट्रा तच त्या वस्तूची विक्री केली तर या व्यवहारावर एसजीएसटी लागू होतो.
IGST | Integrated Goods and Services Tax
IGST म्हणजे Integrated Goods and Services Tax हा कर वस्तू सेवांच्या आंतरराज्या मध्ये होणाऱ्या विक्रीवर आकारला जातो म्हणजेच जर एखादा महाराष्ट्रातील व्यक्ती जर कर्नाटक राज्यात राहणाऱ्या व्यक्तीला १०००० चा माल विकत असेल आणि GST चा दर १८% असेल तर या व्यवहारावर IGST १८०० रुपये लागू केला जातो. केंद्र व राज्य सरकार मिळून IGST आकारला जातो.
गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स फायदे | Benefits of GST in Marathi
GST या कर प्रणालीला सरकारने वर्तमान कर संरचना सुधारण्यासाठी लागू केले आहे. या कर प्रणालीचे काही महत्वाचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे पाहूया.
- उपभोगावर कर
जेव्हा वस्तू आणि सेवेची खरेदी आणि विक्री केली जाते तेव्हा त्या वस्तू किंवा सेवेवर GST आकारण्यात येतो. वस्तूंची विक्री करणारा ग्राहका जवळून GST वसूल करतो आणि सरकारला GST कर देतो. तसेच GST हा कर ग्राहकांकडून वसूल केला जातो म्हणून याला उपभोगावरील टॅक्स असे म्हटले जाते.
- इनपुट क्रेडिट सिस्टिम
इनपुट क्रेडिट सिस्टिम (ITC) हे जीएसटी चे मुख्य वैशिष्ट्ये आहे. वस्तू व सेवेच्या खरेदी आणि विक्री वर टॅक्स भरावा लागतो. इनपुट क्रेडिट सिस्टिम मध्ये विक्रीवर जीएसटी टॅक्स भरण्याच्या वेळी Purchase वर आधीच भरलेला टॅक्स कमी करता येतो आणि जेवढी हि रक्कम शिल्लक असेल तेवढा टॅक्स भरावा लागतो यालाच इनपुट क्रेडिट सिस्टिम म्हणतात. GST या कर प्रणालीमध्ये इनपुट क्रेडिट सिस्टिम असल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढत नाहीत.
- करावर कर लावला जाणार नाही
पूर्वी च्या कर प्रणाली मध्ये करावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लावण्यात येत होते त्यामुळे वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होत होती. पण आता GST लागू झाल्यापासून करावर कर लावले जात नाहीत. केवळ वस्तूंच्या किमतीवर एकच गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स हा कर आकारला जातो.
- ऑनलाईन अद्ययावत प्रणाली
GST प्रणाली हि पूर्णपणे ऑनलाईन आणि अद्ययावत आहे. जर तुम्हाला GST चे रेजिस्ट्रेशन घ्यायचे असेल, किंवा दरमहा GST रिटर्न भरायचा असेल किंवा तुमची काही Query असेल अश्या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला GST पोर्टल च्या या https://services.gst.gov.in/ वेबसाईट वर मिळून जाईल.
- कर दरावर कोणतीही मनमानी नाही
GST या कर प्रणाली मध्ये कर दरावर मनमानी करता येत नाही कारण सरकारने GST कर आकारण्याचे दर ठरवलेले आहेत आणि या दराच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही दर लागू करता येत नाही. GST मध्ये ५%, १२%, १८%, आणि सर्वात जास्त २८% असे दर ठरविलेले आहेत, जर GST Registration Composition मध्ये घेतले असेल तर विक्रीच्या 1% GST भरावा लागतो. आणि सोन, चांदी यावर 3% अशा प्रकारे GST दर वस्तू नुसार ठरवले जातात.
महाराष्ट्रा मध्ये राहणारी एखादी व्यक्ती केवळ सर्व्हिस प्रदान करत असेल तर त्यासाठी GST Registration Limit २० लाख रुपये आहे आणि जर वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जात असेल तर GST Registration Limit 40 लाख रुपये असते. आणि राज्यानुसार GST Registration Limit वेगवेगळे असते हे ठरवण्याचे अधिकार त्या त्या राज्याच्या सरकार कडे असते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ
GST चा फुल्ल फॉर्म काय आहे?
GST चा फुल्ल फॉर्म Goods and Services Tax म्हणजेच वस्तू आणि सेवा कर असा होतो.
GST केव्हा लागू करण्यात आला?
भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर १ जुलै २०१७ रोजी लागू करण्यात आला.
निष्कर्ष | GST Meaning in Marathi
GST म्हणजे काय? (GST Meaning in Marathi) आणि या बद्दल संपुर्ण माहिती ही साध्या आणि सोप्या भाषेत या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच GST चे प्रकार आणि GST चे फायदे आणि GST फॉर्म कोणकोणते असतात यांबद्दल सविस्तर माहिती बघितली.
वस्तू आणि सेवा कर याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती झाली असेल तसेच तुमच्या मित्रांसोबत हा लेख नक्कीच शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स बद्दल माहिती मिळणार.
धन्यवाद!