स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा | How to Start Blog In Marathi

स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा संपूर्ण माहिती

जेव्हा एखादा लेखक आपले विचार व ज्ञान पुस्तका द्वारे किंवा एखाद्या लेखा द्वारा जगासमोर मांडतो, त्याच प्रकारे डिजिटल मार्केटिंग किंवा इंटरनेट च्या माध्यमातून आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्याचे ब्लॉगिंग हे उत्तम माध्यम आहे.

विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल तर इंटरनेट सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे हि आहेत. यात एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे वेळ. नक्कीच तुम्ही हि वेळेसाठी बांधील असाल, आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटत ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो. 

या करताच तुमचा वेळ वाचवण्या साठी ब्लॉग लेखन सुरु करणे हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हि नक्की आवडेल, आपल्याला कमी वेळात मौल्यवान माहिती मिळते आणि राहिलेल्या वेळात दुसरी कामे होतात. याला म्हणायचं झालं तर प्रत्येक Second हा Productive बनवत आहोत. 

आणि जर यातून पैसाही मिळत असेल तर , करायची ना ब्लॉगिंग चालू…

how to start a blog in marathi
अनुक्रमणिका show

ब्लॉग कसा सुरु करावा? | How to Create Marathi Blog

👨‍💻 स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याची अनेक कारणे असू शकतात जसे कि आपल्या जवळ एखादे कौशल्य असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट उत्तमरित्या जमत असेल तर किंवा आपल्या ला एखाद्या गोष्टी बद्दल लोकांना सांगायचे असेल तर आपण मायक्रो ब्लॉग च्या मदतीने ब्लॉग सुरु करू शकतो आणि सहज लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकतो. 

अशाच प्रकारे काही लोक त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी सुद्धा ब्लॉगिंग चा वापर करतात. ब्लॉगिंग मधून ते त्यांच्या व्यवसायाचा प्रचार करत असतात. तसेच ज्यांच्या कडे वेळ आहे त्यांच्यासाठी सुद्धा ब्लॉगिंग हा पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग होऊ शकतो.

असे खूप मायक्रो ब्लॉग चे उदाहरण आहेत त्या मधून बरेच लोक आज ब्लॉगिंग करून लाखो रुपये कमवत आहेत.

तर पहा, आज आपण मराठी ब्लॉग सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक पुढील प्रमाणे दिले आहेत त्या Steps वापर करून आपण ब्लॉग रायटिंग सुरु करू शकतो.


स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन

1.  ब्लॉग चा विषय निवडणे

ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात आधी ब्लॉग चा विषय निवडणे महत्वाचे आहे, आपल्याला एखाद्या विषयाची आवड असेल तर आपण ब्लॉगचा विषय निवडून लेखन केले तर नक्कीच आपल्या ब्लॉगवर वाचक आकर्षित होतील. 

ब्लॉग चा विषय निवडणे

ब्लॉगचा विषय निवडताना आपल्याला जर एखादी कृती उत्तम तर्हेने जमत असली तर आपण आपण त्या कृतीबद्दल ब्लॉग लिहून माहीती वाचकांपर्यंत पोहचवू शकतो. अशा प्रकारे आपल्या आवडी संदर्भात, कृती संदर्भात किंवा एखाद्या ठिकाण संदर्भात ब्लॉगचा विषय निवडावा.


2. Blogging Platform | ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणे

ब्लॉगिंग प्लैटफॉर्म हे विविध प्रकारचे आहेत, पण योग्य Blogging Platform निवडणे हे अतिशय महत्वाचे आहे. आजच्या 2021 च्या सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग प्लैटफॉर्म मध्ये वर्डप्रेस (WordPress) हा प्रथम क्रमांकावर येतो कारण हे विनामूल्य वापरता येते, तसेच इतर कोणत्याही प्लैटफॉर्म पेक्षा वर्डप्रेस हे  User Friendly व Easy to Use होणारे सॉफ्टवेअर आहे.

select blog platform in marathi

वर्डप्रेस म्हणजे काय व कसे वापरायचे, तसेच या मध्ये शेकडो Plugins व WordPress Themes उपलब्ध आहेत, व या थिम्स चा वापर करून आपण आकर्षक वेबसाइट तयार करू शकतो. तसेच वर्डप्रेस मध्ये ब्लॉग डिझाईन साठी कोडिंग नॉलेज ची आवश्यकता नसते. तसेच वर्डप्रेस हे बदलत्या काळानुसार अपडेट्स सुधारित केले जाते.

तसेच वर्डप्रेस प्रमाणेच अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की

1) Wix 

2) Weebly

3) Squarespace

अशा प्रकारच्या विविध प्लैटफॉर्म वर ब्लॉग सुरू करता येतो.

मुख्यतः ब्लॉगिंग ही दोन प्रकारे केल्या जाते.

  • विनामूल्य ब्लॉगिंग
  • सशुल्क ब्लॉगिंग

1) सशुल्क ब्लॉगिंग (Paid Blogging Platform)

ब्लॉग तयार करताना विनामूल्य Free सुद्धा ब्लॉग तयार करता येतो आणि सशुल्क Paid सुद्धा ब्लॉग तयार करता येतो. जर विनामूल्य ब्लॉग तयार केला असेल तर तुम्हाला वर्डप्रेस आणि ब्लॉगर ची काहीच वैशिष्ट्ये वापरायला मिळतात पण जर तुम्ही सशुल्क Paid Platform ब्लॉग सुरु केला तर तुम्हाला सर्वच वैशिष्ट्ये मिळतील. आणि तुम्ही तुमच्या ईच्छेनुसार ब्लॉग बनवू शकतो.


2) विनामूल्य ब्लॉगिंग (Free Blogging Platform)

आपण ब्लॉग तयार करताना विनामूल्य सुद्धा सुरु करू शकतो. जर तुम्हाला विनामूल्य ब्लॉग तयार करायचा असेल तर तुम्हाला WordPress आणि Blogger हे दोन उत्तम प्लैटफॉर्म आहेत. वर्डप्रेस आणि ब्लॉगर या प्लैटफॉर्म वर तुम्ही विनामूल्य ब्लॉग तयार करू शकता. या मध्ये आपल्याला ब्लॉगर आणि वर्डप्रेस चे काही Features विनामुल्य वापरायला मिळतात. तसेच या प्लैटफॉर्म वर  तुम्हाला लिमिटेड रिसोर्सेस मिळतात त्यामुळे पेड ब्लॉगिंग हे ऑप्शन बेस्ट राहील. 

3. Domain Name | डोमेन चे नाव निवडणे

डोमेन नेम वेबसाईटचा पत्ता (Address) आहे, जो लोक आपल्या वेब साइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात. डोमेन निवडताना आपला ब्लॉग कशा संदर्भात आहे त्या संदर्भात डोमेन निवडावेत, डोमेन नाव निवडताना ते लांबलचक नसावे, आणि उच्चार करण्यास सोपे असावे. डोमेन नाव चांगल्या डोमेन कंपनीकडून खरेदी करावे.

find domain name

जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसे असतात आणि त्या माणसांना ओळखण्यासाठी एक नाव असते. त्या नावाच्या मदतीने माणसे ओळख ल्या जातात. त्याचप्रमाणे जगामध्ये वेबसाईट देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि त्या वेबसाईट ला ओळखण्यासाठी domain name चा वापर केल्या जातो. 

आमच्या दुसऱ्या पोस्ट मध्ये तुम्हाला डोमेन नेम काय आहे त्याचे कोण कोणते प्रकार आहेत आणि वेबसाइट साठी कोणत्या प्रकारचे डोमेन नाव घावे या बद्दल माहिती दिली आहे

डोमेन नाव कसे असायला पाहिजे हे आपण पुढीलप्रमाणे पाहूया. 

  • डोमेन नाव हे उच्चार करण्यास अगदी सोपे असायला हवे. 
  • डोमेन नाव हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे असावे. 
  • किमान डोमेन नाव हि कमीत कमी वर्ड चे असायला हवे. 
  • आपल्या ब्लॉगचा  वर्ल्ड वाईड विस्तार करण्यासाठी .com हे डोमेन नाव महत्वाचे आहे. 
  • डोमेन नाव असे असावे कि त्यामुळे आपला ब्लॉग कशासंदर्भात आहे हे समजेल.  
domain name in marathi

तुम्हाला मराठीमध्ये नवीन ब्लॉग कसा तयार करायाचा असेल तर डोमेन नाव आणि होस्टिंग ची आवश्यकता असते. आम्ही तुम्हाला खालील काही डोमेन नाव ची उदाहरणे देत आहोत.

Eg. Facebook.com, Instagram.com, Pinterest.com, Youtube.com

Marathi Blogs करिता डोमेन नाव कसे खरेदी करावे.  

आपण मराठी ब्लॉग साठी डोमेन नाव खरेदी कसे करावे याबद्दल बोलूया. तर आपण कोणत्याही डोमेन नाव सेवा देणार्या वेबसाईट वरून डोमेन नाव खरेदी करू शकता. आपण कोणत्याही डोमेन नाव विकणाऱ्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आवडते डोमेन नाव खरेदी करू शकता. 

डोमेन

स्पेशल ऑफर

NameCheap Logo 1 scaled स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा | How to Start Blog In Marathi

एकदा आपल्या नावावर डोमेन नाव रजिस्टर झाले कि कोणीही आपण घेतलेले डोमेन नाव परत विकत घेऊ शकत नाही. जर तुम्हाला डोमेन नाव विकत घ्यायचे असेल तर तुम्ही डोमेन नाव सेवा प्रदात्याच्या वेबसाईटवर जाऊन योग्य डोमेन नाव घेऊ शकता. 


4. Web Hosting | होस्टिंग निवडणे

जेथे आपण आपल्या ब्लॉग च्या फायली साठवून ठेवतो त्यास वेब होस्टिंग म्हणतात. डोमेन नेम सोबत होस्टिंग घेणे अनिवार्य आहे. डोमेन नेम सोबत वेब होस्टिंग घेतले नाही तर आपला ब्लॉग सुरू होणारच नाही.

right web hosting

वेब होस्टिंग हा आपल्या ब्लॉग चा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, बरेच लोक वेब होस्टिंग स्वस्त आहे म्हणून लवकर घेतले, आणि नंतर नंतर कळले कि त्या वेब होस्टिंग मध्ये प्रॉब्लेम येत होता, तर आपली वेबसाईट व ब्लॉग लोड होईल व बराच वेळ घेणार म्हणून वेब होस्टिंग प्लॅन घेताना विचारपूर्वक निर्णय करून घ्या. 

होस्टिंग

स्पेशल ऑफर

hostinger स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा | How to Start Blog In Marathi
bluehost स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा | How to Start Blog In Marathi
होस्टिंग चे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी आम्ही काही महत्वाचे प्रकार घेत आहोत. 
  • सामायिक वेब होस्टिंग (Shared Hosting)
  • आभासी खाजगी वेब होस्टिंग (VPS Hosting)
  • समर्पित वेब होस्टिंग (Dedicated Server)

जेव्हा तुमच्या वेबसाईट वर भरपूर प्रमाणात ट्रॅफिक वाढेल, तेव्हा ही वेब होस्टिंग वापरणे योग्य होणार नाही कारण ही वेब होस्टिंग जास्त रहदारी हाताळू शकत नाही.तेव्हा तुम्हाला VPS Hosting किंवा Dedicated Server यापैकी योग्य पर्याय निवडावा लागेल. 


5.  Web Design | वेबसाईट डिसाईन

Marathi Website Design हे ब्लॉगचे स्वरूप ठरविते, ब्लॉग किती प्रोफेशनल आहे ते Web Design वरुन कळते. मी विविध मराठी ब्लॉग बघीतले परंतु काहीच मराठी ब्लॉग प्रोफेशनल दिसतात याचे कारण Web Design आहे. जेवढी आकर्षक वेबसाईट डिझाईन असेल तेवढी लोक जास्त प्रतिसाद देतील, म्हणून वेब डिझाइन सुंदर व आकर्षक असायला हवी. 

marathi blog design

जर तुम्ही वर्डप्रेस मध्ये वेबसाईट डेव्हलप केली तर तुम्हाला खूप सारे फ्री थिम्स (Themes) आणि टेम्प्लेट्स (Templates) त्यामध्ये मिळतील.


6. Unique Content | कन्टेन्ट

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करत असताना कन्टेन्ट अतिशय महत्वाचा भाग आहे. आपल्या ब्लॉग समजायला सोपा असावा, जास्त किचकट लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. 

>> आणखी माहिती वाचा – कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय?

marathi unique content

इतर कोणत्याही Website वरून किंवा ब्लॉग वरून कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू नये. जर कॉपी पेस्ट केल्यास ते Google CopyRight चा प्रॉब्लेम येऊ शकतो.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ब्लॉग सुरू करण्यासाठी पैसे लागतात का?

नाही, ब्लॉग सुरु करायचा असेल तर तुम्ही फ्री आणि पेड या दोन्ही माध्यमातून ब्लॉग सुरु करू शकता. जर तुम्हाला फ्री मध्ये म्हणजेच विनामूल्य ब्लॉग सुरु करायचा असेल तर तुम्हाला ब्लॉगर आणि वर्डप्रेस या साईट च्या साहाय्याने फ्री ब्लॉग बनवू शकता. जर पेड ब्लॉग सुरु करायचे असल्यास तुम्हाला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करावी लागेल.  

ब्लॉग का सुरू करावा?

ब्लॉग सुरु करण्याची अनेक करणे असू शकतात त्यामध्ये लोकांना माहिती देण्यास, शिक्षित करण्यास, प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची विक्री करण्यासाठी ब्लॉग सुरु करू शकतो. तसेच काही लोक व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ब्लॉग मधून पैसे कमविण्यासाठी सुद्धा ब्लॉग सुरु करतात. 

मोबाइल वरून ब्लॉग कसा सुरू करायचा?

ज्याप्रमाणे आपण कॉम्पुटर किंवा लॅपटॉप चा वापर करून ब्लॉग तयार करू शकतो अगदी त्याच प्रकारे आपण मोबाईल चा वापर करून ब्लॉग बनवू शकतो. मोबाईल वरून ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम या वेबसाईट चा वापर करू शकता.


निष्कर्ष | Complete Guide on How to Start Marathi Blog

मला आशा आहे कि ब्लॉग कसा बनवायचा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला समजलीच असेल, तसेच या ब्लॉग ला आणखी उपयुक्त करण्यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की च सांगा. म्हणजेच आम्ही भविष्यात या ब्लॉगला आपण दिलेल्या सूचनांनुसार अद्ययावत करू शकेल.  

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 19 Comments

  1. SD

    ब्लॉग कसा तयार करावा? | How to make a blog in Marathi ?
    समजून घ्या अगदी सोप्या भाषेत !

  2. v mahadik

    छान व समर्पक माहिती बद्दल धन्यवाद

    1. Shreya

      ही माहिती खुप छान आहे. But आपला blog कोठे व कासा प्रमोट करायचा?

  3. Suruchee

    Barich Chna mahiti bhetali , agdi mast lihal aahe keep it up thank you

  4. sonali

    thank you, it is best

    1. Shrikant

      Thank you sir माहिती खूप छान आहे! यामुळे मला माझा ब्लॉग बनवायला मदत मिळाली..

  5. Swapnil

    भाऊ जर आपलयाला दुसऱ्या चा blog वाचायचा असेल तर नेमकं काय करायचे plz सांगा कारण की प्रत्येकाचे प्लब्लॉग हे एक वेब असते आपल्या ला ती प्रचलित नसते मग माहिती करता आपण ते कसे शोधायचे

    1. Sweta

      एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे.

    2. तुम्हाला ज्या विषयाविषयी माहिती हवी आहे, ती तुम्ही गुगल करू शकता! जर माहिती मराठीत हवी असल्यास keyword च्या समोर in marathi अस पण टाकू शकता. जेणे करून तुम्हाला अशेच अनेक लेख इंटरनेट वर वाचायला भेटतील.

  6. shri

    खूप छान माहिती दिली आहे.

  7. प्रकाश कुंभार

    वेगवेगळ्या वेबसाईट ला वेगवेगळ्या होस्टिंग सेवा घ्याव्या लागतात का, अडसेन्स फ्री ब्लॉगला होते का

    1. Marathi Spirit

      सुरवातीला कमी ट्रॅफिक असेल तर एकाच होस्टिंग मध्ये तुम्ही सर्व वेबसाईट होस्ट करू शकता.

  8. Raghunandan patil

    आदरणीय सर , तुमच्या मार्गदर्शनामुळे माझ्या चित्त्मंथान या ब्लॉग वर ट्रॅफिक यायला सुरुवात झाली.