नमस्कार मित्रांनो आज आपण “इंटरनेट ऑफ थिंग्ज” म्हणजे काय? (IOT – Internet Of Things in Marathi) आणि याचा वापर कुठे केला जातो ह्या बद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याचदा आपली एखादी वस्तु हरवते तेव्हा आपल्याला असे वाटते की गूगल सर्च च्या मदतीने जर ती वस्तु शोधता आली तर किती बरे होईल? असा विचार एकदा का होईना आपल्या मनामध्ये नक्कीच आला असेल. सगळ्या वस्तु ह्या एका नेटवर्क सोबत जोडल्या गेलेल्या असतात आणि त्या नेटवर्क वर जर आपल्याला काही माहिती ही मिळू शकली तर ही नक्कीच शक्य आहे.
आताच्या टेक्निकल युगा मध्ये मागील काही वर्षांपासून नवीन तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवन मध्ये येत आहेत, व त्याचा वापर देखील आपण पुरेपूर करत आहोत. ह्या टेक्नॉलजी मुळे आपली कामे ही नक्कीच काही टक्के हलकी झालेली आहेत. मग आता अजून एका नवीन टेक्नॉलजी चा शोध लावण्यासाठी देखील आपल्याला जास्त वेळ लागणार नाही.
इंटरनेट मुळे जग हे फार जवळ आले आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये नेटवर्किंग, फेसबुक, व्हाट्सअप, इमेल, इंस्टाग्राम आणि इतर बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या सर्वांचा आपल्या आयुष्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन देखील इंटरनेट हे आपल्यासाठी किती तरी विविध वेगळ्या गोष्टी करू शकते व ह्या सर्व गोष्टींमध्ये आय. ओ. टी (IOT – Internet Of Things Meaning in Marathi) एक महत्त्वाचा भाग आहे.
मागील काही वर्षांमध्ये आणि गोष्टींचा आयोटायझेशन (Iotization) झालेल्या आहे आणि आता पेक्षा कितीतरी वेगळं आणि स्मार्ट जग हे आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे या मध्ये शंका राहिलेली नाही. कारण सध्या ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ हा सर्वच स्तरांवर संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय झालेला आपण पाहतो. इंटरनेट ऑफ थिंग्स यामुळे कित्येक गोष्टी या आपण पूर्वी वापरू शकत नव्हतो व याच कारणाने आता ते वापरणे आपल्याला शक्य होणार आहे.
Internet of Things म्हणजे काय? । IoT Meaning in Marathi
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे कनेक्ट केलेल्या एक एकत्रित नेटवर्क आहे जे उपकरणे आणि क्लाऊड यांच्यातील संवाद सुलभ करते. इंटरनेट ऑफ थिंग्स हि एक सिस्टम आहे, जी संगणकीय उपकरणे, यांत्रिक तसेच डिजिटल मशीन, वस्तू, प्राणी किंवा लोकांची या सर्वांशी संबंधित एक प्रणाली आहे.
येत्या मागील काही वर्षांमध्ये बरेच ऑर्गनायझेशन आणि इंडस्ट्रीज इंटरनेट ऑफ थिंग्स चा वापर अधिक क्षमतेने कार्य करण्यासाठी, तसेच ग्राहकांना सुधारित सुविधा देण्यासाठी क्षमता, यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि व्यवसायाचे मूल्य किंवा विस्तार वाढवण्यासाठी IOT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स याचा वापर करत आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज कसे कार्य करते?
इंटरनेट ऑफ थिंग्ज ह्या ईकोसिस्टम मध्ये Web Enable Smart उपकरणांचा वापर हा Embedded Systems जसे की प्रॉसेसर, सेन्सर आणि कम्युनिकेशन हार्डवेअर डेटा कलेक्शन, डेटा पाठविणे आणि त्या डेटा वर प्रयोग करणे यासाठी केला जातो.
इंटरनेट ऑफ थिंग्स उपकरणे ही सेन्सर डेटा आपापल्यामध्ये शेअर करतात व IOT Gateway याद्वारे ते कनेक्ट करतात आणि इतर डिवाइसेस ला हा डेटा पाठविला जातो ,किंवा लोकल ऍनालिटिक यांच्यामार्फत तो डेटा Analysis केला जातो आणि काही वेळेस ही उपकरणे इतर कनेक्टेड डिवाइस (Connect Device) सोबत संवाद साधतात आणि एकमेकांमध्ये शेअर केलेल्या डाटा वर कार्य करतात.
इंटरनेट ऑफ थिंग्स याच्यामध्ये बहुतेक कामे ही मानवी हस्तक्षेपा शिवाय करतात मात्र, काही प्रोसेस साठी मानवाचा हस्तक्षेप असणे फार महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ त्यांना डिसेट करण्यासाठी, त्यांना सूचना देण्यासाठी आणि डेटा ॲक्सेस करण्यासाठी.
आणखी माहिती वाचा – Data Science बद्दल संपूर्ण माहिती
उदारहरण द्यायचे झाल्यास, जसे की घरच्या सीसीटीव्ही चा व्हिडिओ हा कायम आपल्या मोबाईल वर येत असल्यामुळे आपण ऑफिसमध्ये असो किंवा कुठेही असलो तरी आपल्या घरी काय चालले आहे हे आपल्याला कळते. इंटरनेट ऑफ थिंग्स अनेक उदाहरणे आहेत जसे की डिजिटल लाइटिंग, फिंगरप्रिंट, फेस रेकॉग्निशन आणि स्मार्ट लॉक.
इंटरनेट ऑफ थिंग्ज ही संकल्पना कोणी मांडली?
सायंटिस्ट केविन अस्टोन (Kevin Ashton) यांनी १९९९ मध्ये प्रथमच इंटरनेट ऑफ थिंग्स ही संकल्पना मांडली होती. भविष्यामध्ये होणाऱ्या विस्तृत टेक्नॉलॉजीच्या मदतीमुळे इंटरनेट क्रांतीमुळे व मायक्रोसेसर यांच्या प्रगतीमुळे संगणकाला माहिती गोळ्या करण्यासाठी मानवाची आवश्यकता भासणार नाही, तसेच संगणक आपापसातच माहितीचे आदान-प्रदान करू शकतील ज्यामुळे मानवी जीवन हे नक्कीच सोपे होईल.
इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर?
साधारणतः पाहायला गेलो तर इंटरनेट ऑफ थिंग्स याचा सर्वात जास्त वापर हा मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing), ट्रान्सपोर्टेशन (Transportation) आणि युटिलायझेशन (Utilization) ऑर्गनायझेशन यांच्याद्वारे सेन्सर्स बनवण्यामध्ये तसेच विविध इनफ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये सर्वात जास्त वापर केला जातो. इंटरनेट ऑफ थिंग्स चा वापर हा कृषी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि होम ऑटोमेशन इंडस्ट्रीज यांच्याद्वारे काही ऑर्गनायझेशन हे डिजिटल ट्रान्सफॉर्म करण्यासाठी सर्वात जास्त केला जात आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्या मदतीने शेतकऱ्यांचे काम हे नक्कीच सोपे होऊ शकते. कृषी क्षेत्रामध्ये याचा नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. सेन्सर्सच्या मदतीने पाऊस, आद्रता, तापमान तसेच मातीची सामग्री या इतर सर्व घटकांवरील डेटा गोळा करून शकतात. तसेच स्वयंचलित शेती तंत्र देखील याची फार मोठी मदत होईल.
आणखी माहिती वाचा – Cloud Computing म्हणजे काय? संपूर्ण माहिती
पायाभूत सुविधा तसेच सभोवतांचे ऑपरेशन्स याचे निरीक्षण करण्याची क्षमता देखील आहे. उदाहरणार्थ सेन्सरच्या मदतीने स्ट्रक्चरल बिल्डिंग तसेच इव्हेंट्स मध्ये बदल केले जाऊ शकतात. तसेच ब्रिज आणि विविध इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या डिझाईन मध्ये बदल करण्यासाठी आय.ओ.टी चा वापर केला जाऊ शकतो.
IoT मुळे बरेच फायदे होऊ शकतात जसे की खर्च कमी होऊ शकतो, वेळ वाचू शकतो,दर्जेदार वर्क फ्लो मिळू शकतो आणि पेपरलेस वर्कशॉप यासारखे फायदे हे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर ला नक्कीच होऊ शकतात.
व या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सर्वात जास्त प्राधान्य दिले जाणारे क्षेत्र म्हणजेच होम ऑटोमेशन बिझनेस. ह्या द्वारे इमारतींमध्ये यांत्रिक तसेच विद्युत प्रणाली यांचा वापर करण्यासाठी आणि ते हाताळण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर केला जातो. आणि सर्वात जास्त व्यापक स्तरावर स्मार्ट सिटी नागरिकांना कचरा नियंत्रण तसेच विजेचा कमी वापर ह्या बद्दल नक्कीच प्रोत्साहन देतील.
इंटरनेट ऑफ थिंग्स चे फायदे | Advantage of IoT in Marathi
Internet of Things (IoT) चे इंटरनेट वापरकरताना अनेक फायदे आहेत यातील काही फायदे उद्योग-विशिष्ट आणि अनेक उद्योगांवर लागू आहे तसेच काही फायदे व्यवसायांना सक्षम करण्यासाठी खूप उपयोगी आहेत. खालील प्रमाणे काही महत्वाचे फायदे दिलेले आहे.
- व्यवसाय आणि एकूण प्रक्रियेचे निरीक्षण करणे.
- IoT च्या माध्यमातुन कोणत्याही डिव्हाइसवर कोणत्याही वेळी कोठूनही माहिती ऍक्सेस करता येते.
- कनेक्टेड इलेक्ट्रॉनिक उपकरण त्याची काँनेक्टिव्हिटी सुधारित करते.
- कनेक्ट केलेल्या नेटवर्कवर डेटा पॅकेट हस्तांतरित करण्यासाठी वेळ आणि पैशाची बचत करते.
- व्यवसायाच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच स्वयंचलित करण्यासाठी करण्यात मदत करते.
काही उत्कृष्ट Internet of Things (IoT) Standard आणि Frameworks
- आयपीवी सिक्स | IPv6
- झिक बी | ZigBee
- लाईट ओ.एस | LiteOS
- वन एम.टू.एम | OneM2M
- डाटा डिस्ट्रीब्यूशन सर्विसेस डी.डी.एस | Data Distribution Service (DDS)
- ॲडव्हान्स मेसेज क्यूइंग प्रोटोकॉल | Advanced Messaging Queuing Protocol
- कॉनस्ट्रेन्ड एप्लीकेशन प्रोटोकॉल | Constrained Application Protocol (CoAP)
- लॉंग रेंज वाईड एरिया नेटवर्क | Long Range Wide Area Network (LoRaWAN)
ही काही महत्वाची आय. ओ. टी स्टँडर्ड आणि फ्रेमवर्क आहेत.
FAQ । नेहमी विचारले जाणारे प्रश्न
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय?
इंटरनेट ऑफ थिंग्स हि एक नेटवर्क सिस्टम आहे, जी संगणकीय उपकरणे, यांत्रिक तसेच डिजिटल मशीन इत्यादी शी संबंधित एक प्रणाली आहे. याच्या माध्यमातून संगणकीय उपकरणामधील संवाद साधने सुलभ होते.
IOT चा फुल्ल फॉर्म काय आहे?
IOT चा Full form Internet of Things असा होतो.
निष्कर्ष | Internet of Things Information in Marathi
अश्या प्रकारे आपण इंटरनेट ऑफ थिंग्स याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती मराठी भाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतली. आम्हाला आशा आहे कि नक्कीच तुम्हाला IOT या बद्दल माहिती कळली असेल.
तरी तुम्हाला वरील लेखाबद्दल काही प्रश्न आणि समस्या असेल तर नक्की कंमेंट करा. तसेच हि ब्लॉग पोस्ट तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचा अभिप्राय कळवा, आणि वरील माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!!