जर तुम्ही इंटरनेट जगाशी थोडेसेही संबंधित असाल तर, तर तुम्ही आयपी एड्रेसचे नाव नक्कीच ऐकले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का IP Address म्हणजे काय? आणि त्याचे कार्य काय आहे? नसेल तर हरकत नाही.
कारण आज आपण याबद्दल संक्षिप्त मध्ये बोलणार आहोत. तर चला IP Address Meaning in Marathi याबद्दल सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही उचित ठिकाणी आला आहात हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे.
IP Address म्हणजे काय? | What is IP Address in Marathi
आयपी ऍड्रेस (IP Address) चे संक्षिप्त रूप इंटरनेट प्रोटोकॉल एड्रेस म्हणजेच (Internet Protocol Address) असं आहे. सामान्यपणे आयपी एड्रेस ही इंटरनेटवरील वापरकर्त्याची ओळख आहे.
ज्याप्रमाणे या डिजिटल युगामध्ये आज कितीतरी लोक इंटरनेट चा दैनंदिन वापर करत असतात, म्हणून या सर्व लोकांना इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच एक IP Address प्रदान केला जात असतो त्याला आपण इंटरनेट वरील ओळख असे देखील म्हणू शकतो.
त्याचप्रमाणे हा IP Address विशिष्ट अशा अंकांचा असतो, या ऍड्रेस मध्ये ० ते २५५ या दरम्यानच्या संख्या असतात. ज्याप्रमाणे आपल्या ऑफिस चा किंवा घराचा पत्ता असतो अगदी त्याच प्रमाणे IP Address हा इंटरनेट चा वापर करणाऱ्या वापरकर्त्याचा पत्ता असतो यालाच आपण आयपी एड्रेस म्हणतो.
म्हणजेच IP ॲड्रेस तुमच्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतरही स्मार्ट डिव्हाइस मध्ये असतो, याचा उपयोग संगणक नेटवर्कवरील उपकरणे ओळखण्यास आणि डेटा हस्तांतरित करण्यास होतो.
आणखी माहिती वाचा – इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) काय आहे? संपूर्ण माहिती
आईपी ऍड्रेस चे प्रकार | Type of IP Address in Marathi
आईपी ऍड्रेस चे मुख्यतः चार प्रकार पडतात त्याबद्दल पुढील प्रमाणे माहिती पाहूया.
1. Private IP Address
जे आय पी ऍड्रेस आपल्या घरातील मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्पुटर मध्ये वापरले जातात त्याला आपण Private आयपी एड्रेस म्हणतो. तसेच आपल्या घरातील इंटरनेट नेटवर्क शी कनेक्ट होणाऱ्या प्रत्येक डिव्हाईस चा एक वेगळा IP नंबर असतो. तसेच यामध्ये इतरही डिव्हाईस चा समावेश होतो जसे कि प्रिंटर, स्मार्ट टीव्ही इत्यादी.
2. Public IP Address
Public IP Address अश्या प्रकारचा पत्ता असतो ज्याला ISP म्हणजेच इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर च्या माध्यमातून प्रदान केले जाते आणि याचा वापर हा सार्वजनिक IP नेटवर्कच्या बाहेर केला जातो. तसेच पब्लिक आय पी ऍड्रेस हा युनिक असतो, या ऍड्रेस च्या मदतीने आपण कोणत्याही नेटवर्क डिवाइस ला रिमोटली ऍक्सेस करू शकतो.
3. Dynamic IP Address
या प्रकारचे IP Address हे सतत बदलत असतात, कारण ते एक विशिष्ट काळासाठी सक्रिय होतात आणि नंतर कालबाह्य होऊन जातात म्हणून त्यांना Dynamic IP Address असे म्हटले जाते.
4. Static IP Address
या प्रकारचे IP ॲड्रेस हे बदलत नाहीत ते स्थिर असतात, तसेच हे Static IP Address संगणक नेटवर्क द्वारे तयार केले जातात.
आणखी माहिती वाचा – VPN बद्दल संपूर्ण माहिती
IP Address Versions – IPv4 vs IPv6
IPv4 ही IP Address चे जुने व्हर्जन आहे, तर IPv6 हे त्याचे अपग्रेड किंवा नवीन व्हर्जन आहे. तसेच IPv4 ची रेंज 0 से 255 या डिजिट पर्यंत असते. For Ex. – 192.168.10.26 आणि IPv6 मध्ये, जवळ जवळ 340 खरब आयपी एड्रेस प्रदान केले जाऊ शकतात. For Ex. – 3FBB:1806:4545:2:100:L8FF:FE21:P75.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न । FAQ
1. IP Address चा फुल्ल फॉर्म काय आहे?
इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस | Internet Protocol Address
2. मोबाइल मध्ये IP Address कसा शोधता येईल?
IP ॲड्रेस शोधण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मध्ये वेब ब्राउजर ओपन करा, नंतर गुगल सर्च इंजिन मध्ये what is my IP Address असे सर्च करा. यानंतर तुम्हाला IP Address मिळून जाईल.
त्याच प्रमाणे मोबाइल च्या Setting मध्ये जाऊन About Phone या पर्यायावर क्लिक करा, नंतर Status हा पर्याय निवडा आता तुम्हाला मोबाईल डिव्हाईस चा IP Address दिसून जाईल.
अश्या प्रकारे आपण मोबाईल मध्ये IP Address शोधू शकतो.
निष्कर्ष | IP Address Information in Marathi
या लेखामध्ये आम्ही इंटरनेट प्रोटोकॉल एड्रेस म्हणजेच IP Address या बद्दल संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या मराठी भाषेत मांडायचा प्रयत्न केला आहे. तरी तुम्हाला सदर लेखामधील माहिती आवडली असेल तर नक्कीच कंमेंट करा आणि हा लेख तुमच्या मित्र मंडळी सोबत शेअर करायला विसरू नका.
तसेच तुम्हाला आणखी कोणत्या नवीन विषयाबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कंमेंट मध्ये सांगा.
धन्यवाद!!
खूपच फायदेशीर माहिती आहे