किवर्ड हा सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन मध्ये सर्वात महत्वाचा घटक मानला जातो, याच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला रँक करू शकतो. सर्वच सर्च इंजिन वर आपल्या ब्लॉग ला किवर्ड च्याच मदतीने शोधल्या जाते, योग्य किवर्ड चा वापर केल्याने आपल्या वेबसाईट वर मोठ्या प्रमाणात रँकिंग मिळवू शकतो.
स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा असेल आणि ब्लॉगिंग मध्ये जर तुम्हाला यशस्वी ह्यायचं असेल तर तुम्हाला योग्य प्रकारे किवर्ड रिसर्च करता यायला पाहिजे. जर तुम्हाला किवर्ड रिसर्च करता येत नसेल, तर तुम्ही आमच्या या पोस्ट च्या मदतीने किवर्ड रिसर्च कसे करायचे शिकू शकता.
तसेच, या पोस्ट मध्ये आपण कीवर्ड म्हणजे काय? Keyword Meaning in Marathi आणि किवर्ड रिसर्च कसे करायचे तसेच किवर्ड चे विविध प्रकार याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊ.
कीवर्ड म्हणजे काय? | What is Keywords in Marathi
सर्च इंजिनवर काहीही शोधण्यासाठी आपण काही शब्दांचा किंवा वाक्यांचा उपयोग करतो, त्या शब्दांना किंवा वाक्यांना कीवर्ड असे म्हणतात.
आपण जो लेख लिहितो त्या कन्टेन्ट मार्केटिंग मध्ये योग्य ठिकाणी कीवर्ड वापरावा लागतो. तसेच काही Content Writer ब्लॉग किंवा कन्टेन्ट लिहिताना कीवर्ड लक्षात घेऊनच लिहीत असतात. आपल्या वेबसाइटला सर्च इंजिनवर रँक करण्यासाठी कीवर्ड खूप महत्वाचा असतो.
कीवर्ड चे कोण कोणते प्रकार आहेत | Type of Keyword in Marathi
तर चला आता आपण कीवर्ड च्या काही प्रकाराबद्दल जाणून घेऊ, वेबसाईट तयार केल्यानंतर पोस्ट पब्लिश करताना तुम्ही कीवर्ड रिसर्च करत असता. पण कीवर्ड शोधण्याच्या पहिले तुम्हाला कीवर्ड व त्याचे प्रकाराबद्दल संपूर्ण ज्ञान असणे खूप आवश्यक असते.
1. Short Tail Keywords
शॉर्ट टेल कीवर्ड हा सर्वात पहिला कीवर्ड चा प्रकार आहे, याच्या नावावरून च तुम्हाला समजले असेल कि हे किवर्ड एक ते तीन शब्दांचे असतात. या किवर्ड चा Monthly Search Volume Rate हा खूप जास्त असतो, कारण या कीवर्ड ला सर्च इंजिन मध्ये सर्वात जास्त सर्च केले जाते.
म्हणूनच या किवर्ड मध्ये खूप स्पर्धा बघायला मिळते. या किवर्ड च्या मदतीने आपल्याला सर्च इंजिन वर रँकिंग मिळवायची असेल तर जास्त मेहनत करावी लागेल.
2. Long Tail Keywords
किवर्ड चा दुसरा प्रकार म्हणजेच लॉन्ग टेल किवर्ड होय, हा किवर्ड साधारण तीन किंवा त्या पेक्षा अधिक शब्दाचा असू शकतो. या किवर्ड चा Monthly Search Volume Rate हा Short Tail Keywords पेक्षा कमी असतो, म्हणूनच या किवर्ड मध्ये स्पर्धा बघायला मिळत नाही.
तसेच या किवर्ड ला सर्च इंजिन मध्ये सुद्धा जास्त सर्च केल्या जात नाही. परंतु स्पर्धा कमी असल्यामुळे लॉन्ग टेल किवर्ड ला आपण लवकर रँकिंग मिळवू शकतो.
आणखी वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
3. LSI Keywords in Marathi
LSI Keywords म्हणजे काय तर Latent Semantic Indexing किवर्ड होय. हा keywords वेबसाईट, ब्लॉग पोस्ट आणि SEO साठी खूप महत्वपूर्ण समजला जातो. या किवर्ड च्या मदतीने आपण वेबसाईट किंवा ब्लॉग पोस्ट ला सर्च इंजिन मध्ये रँक करू शकतो.
जेव्हा आपण गुगल मध्ये आपला किवर्ड सर्च करतो, तेव्हा गुगल आपल्याला किवर्ड suggest करतो ते तुम्ही पुढील Image मध्ये पाहू शकता.
कीवर्ड रिसर्च म्हणजे काय?| What is Keyword Research in Marathi
सुरुवातीला आपण किवर्ड म्हणजे काय हे जाणून घेतले आहे, पण आता आपल्याला किवर्ड रिसर्च बद्दल जाणून घ्यायचे आहे. तर चला बघूया मराठी मध्ये Keyword Research बद्दल संपूर्ण माहिती .
किवर्ड रिसर्च एक प्रकारची क्रिया आहे ज्या मध्ये आपल्याला योग्य किवर्ड शोधून काढावे लागतात. तसेच यामध्ये आपल्याला सर्च इंजिन वर कोणत्या किवर्ड ला जास्त सर्च करतात, व त्या किवर्ड चा व्हॉल्युम, आणि त्या किवर्ड ची स्पर्धा शोधून काढावी लागते.
जेव्हा पण तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहता, ती पोस्ट लिहण्याचा पहिले तुम्हाला त्या पोस्ट चे किवर्ड किती लोक सर्च करतात, किंवा त्याचा सर्च व्हॉल्युम किती आहे याबद्दल माहिती घेणे आवश्यक असते कारण जेव्हा किवर्ड चा सर्च व्हॉल्युम जास्त नसेल तर तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक येणार नाही.
म्हणूनच योग्य किवर्ड चा वापर केल्याने आपली वेबसाईट किंवा ब्लॉग सर्च इंजिन मध्ये रँक होऊ शकतो. म्हणून किवर्ड रिसर्च चांगल्या प्रकारे व काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग पोस्ट च्या संबंधित योग्य किवर्ड शोधून काढण्यासाठी खालील काही टूल्स दिलेले आहेत, त्याच्या साहाय्याने तुम्ही योग्य किवर्ड शोधून ब्लॉग पोस्ट मध्ये ऍड करू शकता.
आणखी वाचा – ब्लॉग म्हणजे काय?
टॉप कीवर्ड रिसर्च टूल्स |Top Keyword Research Tool
कीवर्ड रिसर्च करण्यासाठी विविध प्रकारचे टूल उपलब्ध आहेत. या टूल मध्ये काही टूल्स विनामूल्य वापरल्या जातात तर काही टूल्स वापरण्यासाठी Premium भरावे लागते. या लेखामध्ये आपण Best Free and Premium Keywords Research Tools in Marathi कोणते आहेत हे पुढीलप्रमाणे पाहूया.
Keyword Planner हा Google ने तयार केलेला कीवर्ड रिसर्च टूल आहे. काही कीवर्ड रिसर्च टूल Paid आहेत म्हणजेच त्याचा वापर करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, पन गूगल कीवर्ड प्लॅनर हा विनामूल्य वापरला जाणार कीवर्ड रिसर्च टूल आहे.
Google Keyword Planner हा सर्वात लोकप्रिय टूल आहे, जो ब्लॉगिंग मध्ये किवर्ड रिसर्च करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जातो. विनामूल्य कीवर्ड रिसर्च करण्यासाठी कीवर्ड प्लॅनर हा सर्वात चांगला पर्याय आहे.
गूगल कीवर्ड प्लॅनर हा टूल जागतिक आणि स्थानिक स्तरावरील Monthly Searches चे Result दाखवतो. ज्यांच्या मदतीने आपल्याला सर्च इंजिन मधून येणाऱ्या ट्रॅफिक बद्दल अंदाज लावता येतो, आणि कमी व जास्त स्पर्धा असलेले कीवर्ड शोधून काढता येतात.
2) Ahref
Ahref हा टूल खूप लोकप्रिय आणि पेड टूल आहे, यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रत्येक कीवर्ड बद्दल उत्कृष्ट आणि सखोल माहिती मिळते. तसेच या टूल मध्ये कीवर्ड वरील स्पर्धा आणि त्या कीवर्ड वरील रहदारी योग्य प्रकारे दाखविल्या जाते.
बऱ्याच कीवर्ड रिसर्च टूल्स मध्ये अस्पष्ट आणि चुकीची माहिती दर्शवली जाते. पण Ahref मध्ये अचूक व सखोल माहिती मिळते. Ahref हा टूल्स वापरण्यासाठी खूप सोपा आहे, हा टूल आपल्याला सात दिवस फ्री ट्रायल मध्ये वापरता येतो, आणि नंतर वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात.
3) SEMrush
SEMrush या टूल मध्ये ज्या कीवर्ड ची स्पर्धा सुरुवातीपासून आहे असे कीवर्ड दर्शविले जातात. त्याचबरोबर यामध्ये मॅजिक कीवर्ड सुद्धा दर्शविले जातात, आणि या मॅजिक कीवर्ड च्या मदतीने आपण परफेक्ट कीवर्ड शोधू शकतो.
SEMrush हा टूल Paid आहे, या टूल्सचा वापर करण्यासाठी काही प्रमाणात पैसे द्यावे लागतात, आणि या टूल मध्ये 14 दिवसासाठी फ्री ट्रायल मिळतो आणि नंतर काही प्रीमियम भरून वापरल्या जातो. या टूल्स मध्ये कीवर्ड रिसर्च करणे खूप सोपे आहे. कीवर्ड सर्च करण्यासाठी हा टूल योग्य व सखोल माहिती पुरवते.
4) Ubersuggest
Ubersuggest हा टूल नील पटेल यांनी बनवला आहे, किवर्ड रिसर्च किंवा कन्टेन्ट आयडिया साठी हा टूल्स फ्री आणि प्रीमियम मध्ये उपलब्ध आहे. या टूल्स चा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे किवर्ड सर्च करू शकता, या टूल्स मध्ये तुम्हाला खूप सारे Features मिळतील त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट चा SEO आणि इतर काही समस्या तपासू शकता.
Keyword.io हा कीवर्ड रिसर्च टूल सुद्धा Long Tail कीवर्ड शोधण्यासाठी महत्वाचा मानला जातो. हा टूल्स Google या सर्च इंजिन वरील सर्वात जास्त सर्च केले जाणारे कीवर्ड दर्शविते. तसेच या टूल च्या मदतीने Youtube वरील महत्वाचे कीवर्ड शोधले जातात.
Moz हा सुद्धा उत्तम कीवर्ड रिसर्च टूल्स आहे, या टूल्स मध्ये मोठ्या प्रमाणात कीवर्ड शोधल्या जातात. Moz या टूल मध्ये कीवर्ड रिसर्च च्या व्यतिरीक्त Domain Authority सुद्धा शोधली जाते. याची सुद्धा माहिती मिळते. म्हणूनच Moz Keyword Explorer हा महत्वाचा SEO Keyword रिसर्च टूल्स आहे.
कीवर्ड रिसर्च कसे करावे | How to Do Keyword Research in Marathi
Google Keyword Planner रिसर्च करताना कीवर्ड च्या समोर Monthly Searches याचा Volume आणि High, Medium आणि कमी स्पर्धा असलेले कीवर्ड दिसतात. मोठ मोठ्या वेबसाईट किंवा ब्लॉगिंग कंपन्या हे High Competition असलेले कीवर्ड वापरतात.
तसेच कमी स्पर्धा असलेले कीवर्ड असतात. आपण जर नवीन असाल तर आपण कमी स्पर्धेची कीवर्ड वापरायला हवी. तसेच कीवर्ड वापरताना Long Tail Keyword चा वापर करावा कारण या कीवर्ड मूळे रहदारी वाढण्याची शक्यता जास्त असते.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
ब्लॉगसाठी कीवर्ड कसे शोधावे?
किवर्ड रिसर्च करण्यासाठी सर्च इंजिन वर पेड आणि फ्री टूल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामधील एक टूल्स निवडून त्या टूल्स च्या मदतीने तुम्ही ब्लॉग साठी किवर्ड रिसर्च करू शकता.
बेस्ट किवर्ड रिसर्च टूल्स
Google Keyword Planner
Ahref
Ubersuggest
SEMrush
KeywordTool.io
Moz Keyword Explorer
किवर्ड चे प्रकार कोणकोणते आहेत?
किवर्ड चे खूप प्रकार पडतात पण आपण मुख्य आणि महत्वाचे तीन प्रकार पाहू.
Short Tail Keywords । शॉर्ट टेल कीवर्ड
Long Tail Keywords । लॉन्ग टेल किवर्ड
LSI Keywords । लॅटेन्ट सेमँटिक इंडेक्सींग
निष्कर्ष :- किवर्ड बद्दल संपूर्ण माहिती
अश्या प्रकारे या लेखांमधून तुम्हाला कीवर्ड कशाला म्हटल्या जाते, किवर्ड म्हणजे काय? आणि किवर्ड रिसर्च कसे करायचे Keyword Research Meaning in Marathi किवर्ड रिसर्च कशाप्रकारे केल्या जाते, तसेच किवर्ड चे विविध प्रकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टॉप किवर्ड रिसर्च टूल्स याबद्दल संपूर्ण माहिती या पोस्ट मधून मिळाली आहे.
वेबसाईट किंवा ब्लॉग साठी किवर्ड रिसर्च करताना तुम्हाला आमची हि पोस्ट खूप उपयोगी पडणार, जर तुम्हाला हि पोस्ट वाचून काही फायदा झाला असेल तर नक्कीच कंमेंट मध्ये कळवा व तुमच्या मित्रांना सुद्धा शेयर करा.
🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏
Khup chan mahiti dili 👍