Machine Learning म्हणजे काय? । Machine Learning in Marathi

Machine Learning म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो जसे की मागच्या पोस्ट मध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल जाणून घेतली, तसेच आजच्या पोस्टमध्ये आपण Machine Learning म्हणजे काय? या नवीन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती घेणार आहोत. 

मशीन लर्निंग या प्रोग्रामच्या लोकप्रियतेमुळे या टेकनॉलॉजि ला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, तसेच या तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अश्या लोकप्रिय टेकनॉलॉजि बद्दल आपल्याला माहिती असणे खुप गरजेचे असते म्हणून आजच्या लेखामध्ये या तत्रंज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

(Ultimate Guide about What is Machine Learning, History and Types in Marathi)

मशीन लर्निंग म्हणजे काय? | Machine Learning Meaning in Marathi 

मशीन लर्निंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा एक भाग आहे किंवा हे प्रोग्रॅमिंगचे एक असे आधुनिक तंत्र आहे, ज्याद्वारे संगणक प्रोग्राम्स अशा प्रकारे तयार केले जातात की ते नवीन गोष्टींचा स्वतःहून अभ्यास करायला शिकतात आणि आवश्यकतेनुसार स्वतःहून निर्णय घेऊ शकतात.

मशीन लर्निंगमुळे कोणतीही यंत्रणा एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी पुरेशी कार्यक्षम बनवू शकते तसेच मशीन ते कार्य पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यात सुधारण्यासाठी वापर करू शकेल.


मशीन लर्निंगचा इतिहास | Machine Learning History

१९५२ मध्ये Arthur Samuel यांनी मशीन लर्निंग हा विचार मांडला होता. Arthur Samuel यांचा नुसार मशीन लर्निंग हे एक तंत्रज्ञान आहे जे मशीनला माणसासारखे वागण्यास सक्षम करते. सरळ व सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या एप्लीकेशन मध्येच एक प्रकारचे अल्गोरिदम आहे, जे सॉफ्टवेअर ला चांगल्या प्रकारे प्रोग्राम करण्यास मदत करते. 

ॲलन ट्युरिंग यांनी ट्युरिंग टेस्ट’ नावाचा एक प्रोग्राम तयार केला होता ज्यामध्ये कम्प्युटरची बुद्धिमत्ता तपासली जायची. या टेस्टमध्ये कम्प्युटर कशाप्रकारे मानवासारखे कार्य करू शकतो हे तपासले जात होते. १९५२ मध्ये अर्थर यांनी पहिला कम्प्युटर प्रोग्राम लिहिला होता व यानंतर १९५७ मध्ये फ्रॅंक रेसिंगब्लॅक यांनी पहिले न्यूट्रल नेटवर्क हे कम्प्युटर साठी डिझाईन केले होते. जे मानवाची विचार करण्याची क्षमता मशीन मध्ये स्टीम्युलेट करू शकेल.१९६७ मध्ये ‘नियरेस्ट नेबर’ हे अल्गॉरिथ्म लिहिण्यात आलं होतं. 

मशीन लर्निंग काय आहे

यामुळे कम्प्युटर्सला बेसिक पॅटर्न रिकॉग्निशन हे शिकवले जात होते. हे सॉफ्टवेअर नेव्हिगेशन साठी वापरले जात होते. व यानंतर मशीन लर्निंगला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला व त्याची प्रगती ही पुढच्या टप्प्यावर जाऊन पोहोचली. मशीन लर्निंग च्या मदतीने बरेचशे सॉफ्टवेअर बनवता आले होते. जसे की टेरी सेजनोवाकी यांनी ‘नेटटॉक’ नावाचे एक सॉफ्टवेअर बनवले होते, जे अगदी बाळाच्या आवाजामध्ये बोलू शकते. 

IBM ने बनवलेल्या डीप ब्ल्यु वर्ल्ड चॅम्पियन मध्ये चेस देखील खेळले होते. त्यानंतर जिओफरी हिंटन यांनी डीप लर्निंग संशोधनात आणला होता जो कम्प्युटर किंवा मशीनला बघण्यामध्ये आणि वस्तूंना ओळखण्यामध्ये अगदी मनावसारखा होता. आयबीएम ने बनवलेला वॉटसन याने जिओपार्टी येथे माणसांना देखील मागे टाकले होते. 

बऱ्याश्या मोठ्या कंपन्या म्हणजे OpenAI (ChatGPT), Google Brain, Facebook, Amazon, Microsoft यांनी मशीन लर्निंग याचा सर्वात जास्त उपयोग करून बरेचसे सॉफ्टवेअरस बनवले. बरीशी लोक विचार करतात की संगणक किंवा सॉफ्टवेअर कधीही मानवासारखा विचार करू शकत नाही त्यांचे कम्प्युटेशनल एनालिसिस आणि अल्गॉरिथ्म हे माणसाशी कधीही जोडू शकत नाही मात्र मशीन लर्निंग मुळे हे सगळे सिद्ध झाले आहे.


मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग यांच्यातील संबंध | Machine Learning and Deep Learning in Marathi

डीप लर्निंग हा मशीन लर्निंग चा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजेच विशिष्ट भाग आहे. या टेक्निक मध्ये मानवाच्या पद्धतीने कोणतेही ज्ञान प्राप्त करून त्याचे सखोल अनुकरण करतो तसेच मशीन सखोल ज्ञान प्राप्त करून म्हणजेच दिलेल्या पॅटर्न मधून अनुकरण काढते यालाच डीप लर्निग असे म्हणले जाते.

हे पण वाचा – बिग डेटा म्हणजे काय? संपूर्ण माहिती


मशीन लर्निंगचे प्रकार । Types of Machine Learning in Marathi 

मशीन लर्निंगचे प्रकार
  1. Supervised learning | सुपरवाईज लर्निंग

सुपरवाइस लर्निंग यामध्ये लेबल आणि स्ट्रक्चर सोबत डेटा एकत्र केला जातो आणि ज्यामध्ये लेबल केलेला डेटा मशीनला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जातो व या मशीनच्या प्रेडिक्शन आणि डिसिजन घेण्याच्या क्षमतेत वाढ केली जाते.

2. Unsupervised learning | अनसुपरवाईज लर्निंग

Unsupervised learning मशीन लर्निंग मध्ये लेबल आणि स्ट्रक्चर शिवाय डेटा सेटला एकत्र करून क्लस्टर मध्ये डेटा चा ग्रुप तयार केला जातो व यांच्यातील पॅटर्न आणि रिलेशनशिप शोधले जातात.

3. Semi-supervised learning । सेमी-सुपरवाइज्ड लर्निंग 

Semi-Supervised learning एक मशीन लर्निंगचा प्रकार जे supervised learning और unsupervised learning या दोन्हींनी बनलेली आहे. 

4. Reinforcement learning | रीएनफोर्समेंट लर्निंग

रीएनफोर्समेंट लर्निंग मध्ये मानवी ऑपरेटरला बदलून त्याच्या ऐवजी काम करण्यासाठी कम्प्युटर प्रोग्राम चा वापर केला जातो ज्यामध्ये फीडबॅक लूप वर आधारित परिणाम काढणे हे काम असते. Reinforcement learning एक शिकण्याचे तंत्र आहे ज्यामध्ये एजंटला योग्य गोष्टी केल्याबद्दल reward दिले जाते आणि चुकीच्या गोष्टीसाठी Penalty दिली जाते.

संपूर्ण माहिती वाचा – डेटा सायन्स नक्की काय आहे? या बद्दल सविस्तर माहिती


Artificial Intelligence VS Machine Learning in Marathi | मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील फरक

Sr.No.Artificial Intelligence | AIMachine Learning | ML
1.AI चा full form आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) असा होतोML चा full form मशीन लर्निंग (Machine Learning) होतो.
2.आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक असे तंत्रज्ञान आहे जामध्ये मशीनला माणसासारखे वागण्यास योग्य बनवते.मशीन लर्निंग हा एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रकार आहे ज्यामध्ये मशीन जो आपण देतो त्या डेटावरून शिकत जाते. 
3.आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे मुख्य ध्येय हे मानवाच्या कठीण समस्या सोडवण्यास सक्षम संगणक प्रणाली बनवणे.मशीन लर्निंग चे उद्दिष्ट म्हणजे मशीन्सना अचूक डेटा देऊन आणि त्यामधून योग्य ते आउटपुट तयार करणे. 
4.आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे स्वतः Decision Making असते.मशीन लर्निंग सिस्टिम ला डेटामधून नवीन गोष्टी शिकण्याची परवानगी देते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

1. मशीन लर्निंग काय आहे?

मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा भाग आहे ज्यामध्ये मशीन लर्निंग अल्गोरिदम मशीनमध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करते .

मशीन लर्निंग उपयोग कोठे होतो?

मशीन लर्निंग चे खूप सारे उपयोग आहेत जसे कि, Face Recognition, Speech Recognition, Product Recommendation, Natural Language Processing etc.

मशीन लर्निंग किती प्रकार आहेत?

मशीन लर्निंग चे पुढीलप्रमाणे ४ प्रकार आहेत. 
Supervised
Unsupervised
Semi-supervised 
Reinforcement Learning


निष्कर्ष

अश्या प्रकारे वरील लेखामध्ये आम्ही Machine Learning म्हणजे काय आणि याबद्दल पूर्ण माहिती मराठी भाषेतून आणि अगदी सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या लेखाबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असेल तर आम्हाला कळवा

आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल कंमेंट करा. आणि या मशीन लर्निंग बद्दलच्या माहिती ला तुमच्या परिचयाच्या जास्तीत जास्त व्यक्तीपर्यंत शेअर करा. 

धन्यवाद!!

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. Mangal Sonone

    Beautiful information in lucid language