MS Word म्हणजे काय? | Microsoft Word Information in Marathi

MS Word म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. अगदी प्रत्येक घरामध्ये ते मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेस पर्यंत संगणकाशिवाय कोणाचे पान देखील हलत नाही त्यामुळे आजकाल जसे अन्न ,वस्त्र, निवारा हे घटक मनुष्याच्या जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच संगणक व त्यातून मिळणारी महत्त्वपूर्ण माहिती व सुविधा यादेखील मनुष्याच्या अपरिहार्य गरजा बनलेल्या आहेत. 

त्याचप्रमाणे संगणकामध्ये विविध प्रकारचे नवनवीन सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम चा वापर केला जात असतो याच प्रोग्रॅम, सॉफ्टवेयर च्या माध्यमातून काम अगदी सहज करता येते. म्हणून आज आपण या पोस्ट मध्ये संगणकामध्ये वापरल्या जाणारा मायक्रोसॉफ्ट ऑफिस सुटच्या एका प्रोग्रॅम बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 

चला तर मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय? आणि मायक्रोसॉफ्ट वर्डची संपूर्ण माहिती पाहूया. 

MS Word म्हणजे काय? | MS Word Meaning in Marathi

मायक्रोसॉफ्ट वर्ड यालाच आपण शॉर्ट मध्ये एम. एस. वर्ड म्हणून ओळखत असतो, MS Word हा एक प्रकारचा प्रोग्रॅम आहे ज्याला मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केले आहे. या प्रोग्राम चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि प्रत्येक लहान मोठ्या उद्योगामध्ये काम करणारे व्यक्ती किंवा इतरही खूप व्यक्ती या वर्ड प्रोसेसिंग अँप्लिकेशन प्रोग्रॅम चा वापर करतात.  

मायक्रोसॉफ्ट वर्ड हा सर्वाधिक वापरला जाणारा मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट चा प्रोग्राम असून त्यात तुम्ही लेख तयार करू शकता, महत्त्वपूर्ण माहिती त्यामध्ये टाईप करून ठेवू शकता, व्यवसायिक कागदपत्रे व दस्तऐवज अहवाल इत्यादी तयार करू शकता आणि त्याचप्रकारे या टाईप केलेल्या लेखाला, कागदपत्रांना तसेच दस्त ऐवजांना विविध प्रकारे डिझाईन देखील करू शकता.  

हे पण वाचा – ऑपरेटिंग सिस्टिम नक्की काय? संपूर्ण माहिती

तसेच या प्रोग्राम मध्ये अनेक प्रभावी व प्रगत अशी नवनवीन फीचर्स आढळून येतात ज्याचा वापर करून आपण महत्त्वपूर्ण फाईल्स व कागदपत्रे उत्तम प्रकारे मांडू शकतो व संपादित करू शकतो आणि डिझाईन देखील करू शकतो. 


एमएस वर्ड चा इतिहास | History of MS Word

Microsoft Word या प्रोग्रॅम ची सुरुवात १९८३ मध्ये झाली, काही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स यांनी एकत्र येऊन हा प्रोग्रॅम विकसित केला. तसेच या प्रोग्रॅम ला पूर्वी “मल्टी टूल वर्ड” अश्या नावाने ओळखले जात होते. आणि १९८५ मध्ये या प्रोग्रॅम ला मायक्रोसॉफ्ट कंपनीने “एम एस वर्ड फॉर मॅक” अशी ओळख मिळवून दिली. 

मायक्रोसॉफ्ट कंपनीने १९८३ मध्ये एम एस वर्ड चे 1.0 अशे पहिले व्हर्जन लाँच केले होते. यानंतर MS Word चे विविध व्हर्जन लाँच केले गेले त्यामध्ये असलेल्या नवनवीन फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञानामुळे कालांतराने प्रगती होत गेली, आणि सर्वत्र एम. एस. वर्ड याची उपयुक्तता, त्याच्यावर सहज रीतीने काम करता येण्याची सोय, वेगवान दृष्टी अश्या विविध प्रकारच्या फीचर्स मुळे हा प्रोग्रॅम लोकप्रिय झाला. 


एमएस वर्ड कसे सुरू करावे? | How to Learn MS Word

संगणकावर एम एस वर्ड ऑपरेट करण्यासाठी खालील स्टेप्स फोल्लो करा.  

  1. सर्वप्रथम आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला असलेल्या स्टार्ट या बटनावर क्लिक करा. 
  2. नंतर ऑल प्रोग्राम्स या बटनावर क्लिक करून त्यातील मायक्रोसॉफ्ट ऑफिस निवडून घ्या.  
  3. अजून एक उत्तम पर्याय पहावयाचा झाल्यास माऊस वर लेफ्ट क्लिक करून तेथे तुम्हाला काही पर्याय पहावयास मिळतील त्यातील न्यू या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील विविध प्रोग्रॅम्स पाहावयास मिळतील त्यातील एम एस वर्ड हा पर्याय निवडून तुम्ही तुमचे काम  सुरू करू शकता.

आणखी माहिती वाचा – संगणकामध्ये कंट्रोल प्रोसेसिंग युनिट कशाला म्हणतात?


एमएस वर्डची वैशिष्ट्ये | Features of Microsoft Word 

Features of Microsoft Word
  1. मुख्यपृष्ठ | HOME

एमएस वर्ड चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यपृष्ठ किंवा होम यामध्ये तुम्हाला विविध पर्याय अर्थात विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील यामध्ये फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, पेज अलाइनमेंट, बुलेट्स, लाईन स्पेसिंग, फॉन्ट कलर, इत्यादी घटक पाहावयास मिळतात. MS Word मध्ये तयार केलेले दस्तऐवज व्यवस्थित रित्या संपादित करण्यासाठी आणि डिझाईन करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व महत्वपूर्ण घटक या मुख्य पृष्ठ किंवा होम टॅब या पर्यायाअंतर्गत येतात. 

  1. इन्सर्ट | INSERT 

मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजेच इन्सर्ट टॅब होय इन्सर्ट या टॅब मध्ये दस्ताऐवजाला 

प्रभावशाली बनवणारे सर्व घटक असतात जसे की गणितीय उदाहरने चार्ट किंवा आलेखाच्या स्वरूपात दर्शविने. त्याचबरोबर आकार, प्रतिमा ,शीर्षलेख, पृष्ठ क्रमांक, इत्यादी घटक या इन्सर्ट टॅब मध्ये असतात.

  1. डिझाइन | DESIGN 

एम एस वर्ड चा तिसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच डिझाईन टॅब. या अंतर्गत आपण तयार केलेल्या लेखाला किंवा डॉक्युमेंट ला अधिक प्रभावशाली आणि आकर्षक बनविता येते. 

  1. पेज आराखडा | PAGE LAYOUT

PAGE LAYOUT या टॅब ला मराठी मध्ये पानाचा आराखडा असे म्हणतात. या पेज आराखडा च्या अंतर्गत पेजला विशिष्ट आणि आकर्षक बॉर्डर देणे, तसेच आपल्या सोयीनुणार मार्जिन ठेवणे, आणि विशिष्ट Rows किंवा Column ऍड करणे इत्यादी क्रिया या टॅब च्या साहाय्याने करता येते.

  1. पुनरावलोकन | REVIEW

शेवटचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रिव्ह्यू किंवा पुनरावलोकन या टॅब अंतर्गत तुम्ही दस्ताऐवजांमध्ये वापरले गेलेले व्याकरण, शब्दकोश, त्यामधील शब्द संख्या, भाषा, काही शब्दलेखन तपासण्या, अनुवाद, विशिष्ट टिप्पण्या, इत्यादींचा आढावा घेऊ शकतात.

आणखी माहिती वाचा – कीबोर्ड बद्दल सविस्तर माहिती


एमएस वर्ड चा उपयोग | Usage of MS Word 

Microsoft Word हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट मधील सर्वाधिक वापरला जाणारा लोकप्रिय प्रोग्राम आहे तर त्याचे उपयोगही तेवढे प्राबल्यशाली व प्रभावशाली आहेत. 

  • एम एस वर्ड चा उपयोग हा शिक्षक व विद्यार्थी दोघेही खूप प्रभावीपणे करू शकतात. आज-काल एमबीए इंजीनियरिंग, सायन्स, कॉमर्स अश्या शाखांमधील विध्यार्थी एम एस वर्ड मध्ये विद्यार्थी सहजरित्या नोट्स तयार करतात. यामध्ये असलेल्या विविध फीचर्स मुळे विद्यार्थी त्यामध्ये आलेख, विविध डायग्रॅम, विशिष्ट चित्रे इत्यादी चा वापर करून आपल्या नोट्स प्रभावशाली बनवितात.  
  • त्याचप्रमाणे एम. एस वर्ड चा वापर हा सरकारी कार्यालयांमध्ये महत्वाचे दस्ताऐवज बनवण्यासाठी, व्यवसायाच्या ठिकाणी लेटरहेड्स तयार करणे, अहवाल तयार करणे, दस्तऐवज टाईप करणे, पत्रे तयार करणे, व ते मेलद्वारे इतर संस्थांना पाठवणे अशा अनेक कामांमध्ये एम एस वर्ड चा प्रभावी उपयोग केला जातो. 
  • नवीन नोकरीच्या शोधात असलेले युवक युवती हे आपला रिझ्युमे एम एस वर्ड मधील प्रगत फीचर्स वापरून अधिक प्रभावशाली बनवू शकतात. 
  • तसेच लेखकांसाठी एम.एस वर्ड हे एक वरदानच ठरलेले आहे त्यासाठी कुठेही कंबर पाठ एक करून पेन वही घेऊन तासंतास लिहत बसावं लागत नाही तुम्ही निवांतपणे आपल्या आराम खुर्चीत बसून आपल्या मनातील मजकूर अगदी आपल्या मोबाईल मधील एम. एस. वर्ड मध्ये देखील तयार करू शकता. 

तसेच आपण केलेल्या कामाची डॉक्युमेंट फाईल तयार करून किंवा पीडीएफ फाईल तयार करून ती लगेच दुसऱ्या व्यक्तीला काही सेकंदातच हस्तांतरित करता येते.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे सुरू करावे?

सर्वप्रथम आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला असलेल्या स्टार्ट या बटनावर क्लिक करा. 
नंतर ऑल प्रोग्राम्स या बटनावर क्लिक करून त्यातील मायक्रोसॉफ्ट ऑफिस निवडून घ्या.  
अजून एक उत्तम पर्याय पहावयाचा झाल्यास माऊस वर लेफ्ट क्लिक करून तेथे तुम्हाला काही पर्याय पहावयास मिळतील त्यातील न्यू या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील विविध प्रोग्रॅम्स पाहावयास मिळतील त्यातील एम एस वर्ड हा पर्याय निवडून तुम्ही तुमचे काम  सुरू करू शकता.

मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये किती व कोणकोणते टॅब असतात?

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 8 टॅब असतात ते पुढील प्रमाणे आहेत. प्रत्येक टॅबमध्ये विविध प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात. 
मुख्यपृष्ठ | HOME
इन्सर्ट | INSERT
डिझाइन | DESIGN
पेज आराखडा | PAGE LAYOUT
संदर्भ | REFERENCES
मेलिंग | MAILING
पुनरावलोकन | REVIEW
व्हिव | VIEW 


निष्कर्ष | What is MS Word Information in Marathi

अश्या तऱ्हेनं आम्ही तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हा सर्वानाच सदर माहिती आवडली असेल अशी आशा बाळगतो. वरील माहितीत तुम्हाला काही समस्या किंवा प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कंमेंट मध्ये कळवा आणि हा लेख शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद!

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Madhuri chef

    Ms word mdhe letter writting kase karave ha mudda clear hava ahe please