आज कोणतेही काम करायचे म्हटले म्हणजे संगणक हेच डोळ्यापुढे उभे राहते. संगणकाविना कोणतेही काम होत नाही, प्रत्येक कामाच्या ठिकाणी संगणक हा लागतोच. तसेच आपण मागील पोस्ट मध्ये संगणक याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे ती माहिती तुम्ही वाचलीच असेल.
याच संगणकामधील विविध घटकांना आपण चांगल्या तर्हेने ओळखतो पण या बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नसते, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संगणकाचा सर्वात महत्वाचा असलेला घटक म्हणजे मॉनिटर याबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करत आहोत.
मॉनिटर म्हणजे काय? | Monitor Meaning in Marathi
मॉनिटर हा संगणकाचा एक सर्वात महत्वाचा अविभाज्य हार्डवेअर घटक आहे, यालाच संगणकाचा चेहरा देखील म्हणू शकतो. मॉनिटर हे एक प्रकारचे आउटपुट डिवाइस आहे, या मार्फत युजर संगणकामध्ये जे काम करतो त्याचे आउटपुट या मॉनिटर स्क्रीन द्वारे दिले जाते.
CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट व वापरकर्ता यांच्यामधील इंटरफेस म्हणून कार्यरत असणाऱ्या आउटपुट डिवाइसला मॉनिटर असे म्हटले जाते. तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर याला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट VDI (Visual Display Unit) असे देखील म्हटले जाते. या मधील User Experience वर प्रभाव पाडणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे मॉनिटरची उच्च ग्राफिक्स कॉलिटी होय.
पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा LCD किंवा LED स्क्रीन नव्हत्या तेव्हा मॉनिटर ची डिस्प्ले क्वालिटी ही खूपच कमी दर्जाची असायची. पण कालांतराने जसजसे तंत्रज्ञान प्रगत झाले तसतसे LCD किंवा LED स्क्रीन बाजारामध्ये उपलब्ध झाले आणि त्यामुळे ग्राफिक्स ची क्वालिटी ही सुधारत गेली.
मॉनिटर चे कार्य । Monitor Function in Marathi
संगणक वापरकर्त्यांनी माऊस व कीबोर्ड उपकरण यांच्या साहाय्याने संगणकावर केलेल्या कामाचे प्रत्यक्ष आउटपुट आपल्याला मॉनिटर स्क्रीनवर पहावयास मिळते. त्याद्वारे आपण त्याच्यात आवश्यक ते प्रमाणे बदल करू शकतो. तसेच संगणकामध्ये केलेले काम आपल्याला सॉफ्टकॉपी च्या स्वरूपात पहावयास मिळते.
मॉनिटर बद्दल माहिती | Monitor in Marathi
- मॉनिटर व सीपीयू या दोन हार्डवेअर डिव्हाइसेस ना जोडण्यासाठी केबल चा वापर केला जातो,
- मॉनिटर मध्ये ग्राफिक्स कार्डचा वापर केला जातो, आणि हे कार्ड मॉनिटरला ग्राफिक्स सिग्नल देण्याचे कार्य करते जेणेकरून या सिग्नल मार्फत चित्र, दस्तऐवज, व्हिडिओ इत्यादी प्रतिक्रिया मॉनिटर स्क्रीनवर दर्शविल्या जातात.
- मॉनिटर मध्ये उच्च दर्जाचे ग्राफिक्स दिसावे यासाठी चांगल्या प्रतीच्या ग्राफिक्स कार्डची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळी जेव्हा मॉनिटरचे मोठमोठे डबे असायचे त्यावेळी सीआरटी (CRT) अर्थातच (कॅथोडे रे ट्यूब) याच्या साहाय्याने मॉनिटर स्क्रीन बनवल्या जात होत्या. त्यांचा आकार हा खूप मोठा असायचा व ते वजनाने ही खूप जड असत.
- या मोठमोठ्या मॉनिटरच्या डब्यांना वीज पुरवठा देखील अधिक प्रमाणात लागत असे, त्यामुळे विजेचे बिल हे भरमसाठ येई. या पूर्वीच्या काळी असलेल्या मॉनिटर ची तुलना जर आजच्या एलसीडी आणि एलईडी स्क्रीन सोबत केली तर हे मॉनिटर स्क्रीन अत्यंत पातळ व वजनाने हलके असतात व त्यांना वीज देखील कमी लागते.
आणखी माहिती वाचा – ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल सविस्तर माहिती
मॉनिटर चा इतिहास | History of Monitor in Marathi
तुम्हाला असे वाटत असेल की ज्यावेळी संगणकाचा शोध लागला त्यावेळी आपण जो संगणक संच आपल्या डोळ्यासमोर पाहतो तोच अस्तित्वात होता की काय? पण तसे नव्हते.
आश्चर्याची बाब अशी की मॉनिटर चा शोध लागण्यापूर्वीच संगणक अस्तित्वात होते. सुरुवातीला संगणकामध्ये मॉनिटर स्क्रीन चा वापर केला जात नव्हता. त्यावेळी इनपुट व आउटपुट दोन्हीही सूचना मिळवण्यासाठी पंच कार्ड चा वापर केला जात असे.
सर्वप्रथम कॅथोड रे ट्यूब चा शोध Karl Ferdinand Braun यांनी लावला. व त्याद्वारे त्यांनी CRT मॉनिटर स्क्रीन बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीची मॉनिटरची स्क्रीन सर्व बाजूने बंद असलेल्या एका डब्याप्रमाणे भासत असे.
या मॉनिटर स्क्रीनच्या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनच्या मार्फत प्रकाश निर्माण होत असे. याच तंत्रज्ञानाचा वापर करून मॉनिटर स्क्रीनवर प्रकाश दिसण्यास सुरुवात झाली. पण त्यावेळी मॉनिटर हे रंगहीन होते. कालांतराने या सीआरटी (CRT) मॉनिटर स्क्रीन मध्ये रंगांचा वापर करण्यात आला त्यावेळी यामध्ये फक्त दोनच रंग होते एक काळा व दुसरा पांढरा रंग.
James P. Mitchell यांनी 1977 मध्ये LCD (Liquid-crystal display) चा शोध लावला व 2000 सालापासून LCD या मॉनिटर स्क्रीनचा वापर करण्यास सुरुवात झाली.
हे पण वाचा – HDD आणि SSD संपूर्ण माहिती
नेहमी विचारले जाणारे प्रश्न । FAQ
मॉनिटर चे प्रकार । Type of Monitor in Marathi
CRT । Cathode Ray Tube
LCD | Liquid Crystal Display
LED । Light Emitting Diode
OLED | Organic Light Emitting Diode Monitor
Plasma Monitor
अश्या प्रकारे मॉनिटर स्क्रीनचे वरील प्रकार दिसून येतात आणि त्याचप्रमाणे मॉनिटर स्क्रीनवर जो रंग प्रदर्शित होतो त्या आधारावर मॉनिटरचे तीन प्रकार पडतात ते म्हणजे कलर मॉनिटर, ग्रे स्केल मॉनिटर, आणि मोनोक्रोम मॉनिटर.
मॉनिटर कोणते उपकरण आहे?
मॉनिटर हा संगणकाचा एक सर्वात महत्वाचा अविभाज्य घटक आहे, आणि मॉनिटर हे एक प्रकारचे आउटपुट डिवाइस / उपकरण आहे.
मॉनिटरचे कार्य काय आहे?
संगणक वापरकर्त्यांनी माऊस व कीबोर्ड यांच्या साहाय्याने संगणकाला दिलेल्या सूचनांचे पालन करणे म्हणजेच त्या सूचनांचे योग्य आउटपुट आपल्याला मॉनिटर स्क्रीनवर देणे. अश्या प्रकारचे कार्य मॉनिटर करत असते.
निष्कर्ष | मॉनिटर बद्दल संपूर्ण माहिती
अश्या प्रकारे आपण आजच्या या लेखामध्ये संगणकाच्या सर्वात महत्वाच्या घटकांबद्दल म्हणजेच मॉनिटर बद्दल संपूर्ण माहिती अभ्यासली आहे. तरी तुम्हाला सदर माहिती मध्ये काही समस्यां असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.
त्याचप्रमाणे मॉनिटर बद्दलचा हा लेख तुमच्या मित्रांना तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करा.
धन्यवाद!!