Mutual Fund म्हणजे काय? | Mutual Fund Meaning in Marathi

Mutual Fund म्हणजे काय

आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग हा सेव्हिंग मध्ये टाकायचा असतो. आता हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण आपले पैसे एखाद्या गाडीसाठी किंवा नवीन घर घेण्यासाठी साठवून ठेवावेत. तर काही लोकांना पैसे एखाद्या आपत्कालीन स्थितीसाठी साठवून ठेवायची सवय असते. 

सेव्हिंग करण्यासाठी बँक मध्ये पैसे ठेवणे हे सर्वसामान्य व्यक्तींचे उद्दिष्ट असते. पण काही व्यक्ती हे पैसे एखाद्या ठिकाणी गुंतवून ठेवत असतात म्हणजेच ते गुंतवणूक करीत असतात. पैसे गुंतविण्यासाठी म्युच्युअल फंड हा पर्याय शेअर मार्केट पेक्षा कमी जोखमीचा असतो. 

पण Mutual Fund म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होतात जसे कि म्युच्युअल फंड काय आहे? यामध्ये गुंतवणूक कशी करावी? म्युच्युअल फंड मध्ये रिस्क किती असते? आणि यामधून परतावा किती प्रमाणात मिळणार? अश्या विविध प्रकारच्या प्रश्नांची माहिती आपण या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Mutual Fund in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक आहे ज्यामध्ये आपण एका ठिकाणी गुंतवणूक करून आपली गुंतवणूक विविध ठिकाणी करू शकतो. समजायला थोडं अवघड जातंय ना? पुढे वाचा, नक्कीच समजून घेता येईल. 

म्युच्युअल फंड  हे Asset Management Company म्हणजेच AMC कडून सुरू केले जातात. तुम्ही आणि तुमच्यासारखे इतर सर्व लोक आपले पैसे Asset Management Company कडे देत असतात. या AMC हा पैसा एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. यामध्ये गुंतवणूक करत असताना त्यांच्याकडे काही तज्ञ मंडळी बसलेली असतात आणि याच तज्ञ मंडळींच्या सल्ल्याने या AMC गुंतवणूक करत असतात. 

वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या गुंतवणुकीतुन AMC ला जो काही रिटर्न मिळतो, त्यातून काही टक्केवारी म्हणजेच 1 ते 2 % कमिशन कंपनी स्वतःकडे ठेवून इतर पैसा रिटर्न म्हणून म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला देत असते. 


असेट्स मॅनेजमेंट कंपनी | Assets Management Company

सध्या भारतात HDFC, ICICI, SBI, HSBC सारख्या बँक आणि Aditya Birla, Reliance, TATA सारख्या कंपन्या AMC चालवतात. प्रत्येक असेट्स मॅनेजमेंट कंपनी ही वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स घेऊन बाजारात येत असतात. HDFC सारख्या बँकेचे जवळपास 1000 हुन अधिक म्युच्युअल फंड्स आहेत. 


म्युच्युअल फंड मध्ये रिस्क किती असते?

तुम्ही ज्या म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूक करणार आहात, त्या म्युच्युअल फंड ला चालवणारी AMC पैसे कुठे गुंतवणार आहे हे सांगत असते. त्यानुसार मग तो फंड रिस्की आहे किंवा नाही हे तुम्हाला लगेच लक्षात येईल.

म्युच्युअल फंड देणाऱ्या कंपनी त्यांचे फंड्स आधीच रिस्क नुसार विभागत असतात. काही म्युच्युअल फंड हे झिरो रिस्क असतात तर काही हाय रिस्क देखील असतात. जर ती AMC तुमचे पैसे स्टॉक मध्ये गुंतवणूक करत असेल तर तुम्हाला जास्त रिस्क असेल. तुमचा पैसा हा जर सरकारी बॉण्ड मध्ये गुंतवला जात असेल तर मग रिस्क कमी असेल.  

>> आणखी माहिती वाचा – IPO म्हणजे काय? संपूर्ण माहिती


म्युच्युअल फंड चे प्रकार | Types of Mutual Fund in Marathi

म्युच्युअल फंड चे खालीलप्रमाणे तीन मुख्य प्रकार पडतात त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 

1. Equity Mutual Fund

या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये तुमचा पैसा हा स्टॉक मार्केट मध्ये गुंतविला जातो. या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये रिस्क जास्त असते आणि सोबतच मिळणारा रिटर्न देखील जास्तच असतो. AMC कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत यावरून इक्विटी म्युच्युअल फंडचे तीन प्रकार पडतात.

इक्विटी म्युच्युअल फंड

Large Cap Mutual Fund –  जेव्हा म्युच्युअल फंड सर्वात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपनी मध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्यांना Large Cap Mutual Fund असे म्हणतात. या मध्ये जोखीम खूप कमी असते आणि त्याच बरोबर रिटर्न सुद्धा कमी मिळतो. 

Mid Cap Mutual Fund –  ज्या कंपन्यांची मार्केट कॅपिटलायझेशन व्हॅल्यू मध्यम स्वरूपाची असते अश्या कंपनी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असल्यास त्यांना Mid Cap Fund असे म्हटले जाते. या मध्ये लार्ज कैप फंड पेक्षा जास्त जोखीम असते आणि रिटर्न सुद्धा जास्त असतो.  

Small Cap Fund – या मध्ये म्युच्युअल फंड सर्वात कमी कॅपिटलायझेशन म्हणजेच लहान कंपनी मध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणून त्यांना Mid Cap Fund असे म्हणतात. या सारख्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केल्यास जोखीम खूप जास्त असते आणि रिटर्न सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो. 

Diversified Mutual Fund – नावात सांगितल्याप्रमाणे Large Cap, Mid Cap आणि Small Cap  मध्ये गुंतवणूक विभागून केलेली असते. यालाच Multi Cap फंड म्हणतात. 

Equity Linked Saving Scheme (ELSS) – इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम या प्रकारच्या फंड मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या नफ्याची रक्कम 1.5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला टॅक्स वाचविता येतो. 

Sector Mutual Fund – एका क्षेत्राशी निगडित सेक्टर मध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये रिस्क जास्त असते.

Index Funds – हे Passively Managed Funds असतात. यामध्ये AMC चा काही संबंध नसतो. शेअर मार्केट मधील इंडेक्स म्हणजेच SENSEX आणि NIFTY यांच्या नंबर अनुसार यात बदल होत असतात.

>> हे पण वाचा – Cryptocurrency म्हणजे काय?

2. Debt Mutual Fund

या प्रकारच्या फंड मध्ये येणारे पैसे हे Debt Instruments म्हणजेच बॉण्ड्स, डिबेंचर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट मध्ये गुंतविले जातात. हे फंड कमी रिस्की आणि कमी रिटर्न देणारे असतात. 

डेब्ट म्युच्युअल फंड

Gilt Fund – सरकारी बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करत असल्याने हे झिरो रिस्क फंड्स असतात मात्र यात रिटर्न कमी मिळतो. 

Liquid Funds – आपली गुंतवणूक 2 ते 3 दिवसात पुन्हा कॅश मध्ये हवी असेल तर हे liquid funds सर्वात उत्तम पर्याय आहे.

Fixed Maturity Plan – FD ला पर्याय म्हणून तुम्ही याकडे बघू शकता. हे म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न हा मुदत ठेव पावतीपेक्षा जास्त देतात मात्र यामध्ये तुम्हाला एक मुदतीनंतरच पैसे काढता येतात.

3. Hybrid Mutual Fund

जेव्हा म्युच्युअल फंड Equity आणि Debt Fund या दोन्ही फंड मध्ये गुंतवणूक करते तेव्हा त्याला Hybrid Mutual Fund असे म्हणतात. या फंड मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षा जोखीम कमी असते.   

हायब्रिड म्युच्युअल फंड

Arbitrage Fund –  या फंड मधील पैसे हे बॉण्ड्स मध्ये आणि स्टॉक मार्केट मध्ये देखील गुंतविलेले असतात. म्हणजेच Debt Fund आणि Equity Fund मध्ये एकत्रित गुंतवणूक केल्या जाते. अश्या प्रकारे MIP-Monthly Income Plan, Balanced Fund हे सुद्धा Hybrid Mutual Fund चे मुख्य प्रकार आहेत.


म्युच्युअल फंड मधील महत्वाच्या संज्ञा

Return Percentage – निवडलेल्या म्युच्युअल फंड च्या इतिहासातील कामगिरी वरून आपल्याला त्या म्युच्युअल फंड मधून मिळणारा Expected Return Percentage कॅल्क्युलेट करून मिळत असतो. हा अंदाज लावून काढलेला रिटर्न असल्याने हेच भविष्यात घडेल का? याविषयी काहीही गॅरंटी देता येत नाही.

Expense Ratio – Expense Ratio हा AMC स्वतःहून काढून घेणारी असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर AMC जे कमिशन घेते त्याला Expense Ratio असे म्हणतात.

Asset Under Management – AMC ने एकूण पैसा किती गुंतवलेला आहे किंवा जमा केलेला आहे याविषयी माहिती Asset Under Management यातून मिळते. 

>> हे पण वाचा – Bank म्हणजे काय? संपूर्ण माहिती


म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक का करावी?

  • सेव्हिंग खात्यात पैसे गुंतविणे हे सर्वात सोयीस्कर आणि कमी धोक्याचे आहे. मात्र यामध्ये आपल्याला मिळणारा रिटर्न हा 4% इतकाच असतो. 
  • फिक्सड डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव आपण बँकेच्या माध्यमातून करत असतो मात्र यामध्ये तुम्हाला एका ठराविक कालावधी नंतरच पैसा मिळत असतो. त्यामुळे एखाद्या आपत्कालीन स्थितीत पैसे काढणे या गुंतवणूक पर्यायात शक्य नाही.
  • सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे सध्याच्या स्थितीत कठीण आहे, कारण यामध्ये किंमती ह्या सतत बदलत असतात. 
  • रिअल इस्टेट मध्ये गुंतवणुकीला रिटर्न आहे मात्र यामध्ये एखाद्याला कमी गुंतवणूक करायची असेल किंवा SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तो पर्याय उपलब्ध नाही.
  • शेअर मार्केट मध्ये आपल्याला रिटर्न भरपूर मिळतो मात्र यामध्ये रिस्क देखील खूप जास्त असते. 
  • म्युच्युअल फंड मध्ये शेअर मार्केट पेक्षा खूप कमी रिस्क आहे. याशिवाय आपले पैसे आपण हवे तेव्हा काढू शकतो. म्हणजेच आपल्याला आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज असेल तर आपल्याला पैसे मिळतील.
  • आपल्याकडे गुंतवणूक करायला फक्त 100 रुपये असतील तरी देखील आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. 
  • म्युच्युअल फंड हे विभागून गुंतवणूक करत असतात आणि त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता यात खूप कमी असते. 
  • अनेकांना SIP मध्ये गुंतवणूक करायची असते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड म्हणजे एक सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे.

>> हे पण वाचा – Bitcoin म्हणजे काय? बिटकॉईन बद्दल संपूर्ण माहिती वाचा


म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे | Benefits of Mutual Fund

  1. रिस्क खूप कमी असते. कारण तुमचे फंड हे विभागून गुंतवणूक केलेले असतात त्यामुळे स्टॉक मार्केट मधील एका क्षेत्रातील पडझडीचा तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परिणाम होत नाही.
  1. तुम्हाला आर्थिक तज्ञ इथे मिळत असतो त्यामुळे तुम्हाला पैसे फक्त म्युच्युअल फंड मध्ये टाकायचे आहे, बाकी सर्व काम तो एक्सपर्ट करणार आहे.
  1. आता बाजारात अनेक म्युच्युअल फंड Apps आलेले आहेत आणि त्यामुळे कमिशन लेव्हल खूप कमी आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

कोणत्या म्युच्युअल फंड मधून सर्वात जास्त रिटर्न्स मिळू शकतो?

इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund) मधून सर्वात जास्त रिटर्न मिळू शकतो पण यामध्ये जोखीम खूप जास्त असते.  

म्युच्युअल फंड किती रिटर्न देतात?

Mutual Fund किती परतावा देईल हे सर्व काही तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहात यावर अवलंबून आहे. म्युच्युअल फंड मधून मिळणारा रिटर्न हा कमीत कमी 4% तर जास्तीत जास्त 30% किंवा त्याहून अधिकही असू शकतो. 
तुम्ही जर हाय रिस्क फंड्स मध्ये गुंतवणूक केली असेल तर मग तुम्हाला रिटर्न देखील मोठा मिळण्याची शक्यता असते.


निष्कर्ष | Mutual Fund Information in Marathi

जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून पैसे कमवायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यावी लागेल. आणि याच बद्दल संपूर्ण माहिती आम्ही आमच्या ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या मायबोली मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. 

जर तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय? (What is Mutual Fund in Marathi) त्याचे प्रकार, फायदे आणि यामध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट मध्ये केल्यास तुम्हाला किती रिटर्न्स मिळू शकते याबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आली आहे. हा लेख सर्वसामान्य व्यक्तीसाठी आणि गुंतवणुकीला सुरुवात करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त असेल.

तसेच तुम्हाला हा लेख कसा वाटला? हे नक्कीच कंमेंट मध्ये सांगा आणि या टॉपिक बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. तसेच तुमच्या मित्रांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती शेअर करा जेणेकरून ते पण गुंतवणूक करू शकतील. 

धन्यवाद !!

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. Pranali Mestry

    Very good information ☺️☺️