नेट बँकिंग म्हणजे काय? | Net Banking in Marathi

नेट बँकिंग म्हणजे काय

आताच्या जगामध्ये जर तुम्हाला सगळ्यांच्या बरोबरीने चालायचे असेल तर, टेक्नॉलॉजी सोबत तुम्हाला मैत्री करावी लागेल. तुम्ही बऱ्याच वेळा नेट बँकिंग हा शब्द कुठेतरी ऐकला किंवा वाचला असेल. भारतामधील बर्‍याचशा बँक आता ई-बँकिंग ची सुविधा ग्राहकांना पुरवत आहेत. 

Net Banking बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, ही एक अशी सुविधा आहे जी बँकेद्वारे आपल्या ग्राहकांना पुरवली जाते, ज्याद्वारे ग्राहक बँकेचे सर्व व्यवहार इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या आपल्या अँड्रॉइड मोबाईल च्या माध्यमातून  करू शकतात.

आजच्या लेखामध्ये आपण ई-बँकिंग बद्दल जाणून घेणार आहोत यामध्ये नेट बँकिंग म्हणजे काय?  याचे फायदे व तोटे? त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग चा उपयोग तुम्ही कसा करू शकता? याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? | Net Banking Information in Marathi

इंटरनेट बँकिंग ला Net Banking, Online Banking, E-Banking आणि Virtual Banking असे सुद्धा म्हटले जाते. ग्राहकांचे बँके संबंधित व्यवहार सुखद, जलद आणि सुरक्षित व्हावे यासाठी इंटरनेट बँकिंग ची सुविधा आजकाल जवळपास सर्वच बँका उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेमध्ये अकाऊंट असणे अनिवार्य आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर Internet Banking हि एक इलेक्ट्रॉनिक पद्धती आहे ज्यामुळे आपल्याला बँक खात्यामध्ये असलेली शिल्लक तपासता येते, आपण सतत करत असलेल्या व्यवहारांवर नजर ठेवता येते आणि ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर आणि रिसिव्ह सुद्धा करता येतात. 

तसेच Net Banking ची सुविधा अस्तित्वात असल्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी स्वतः बँकेत जायची गरज नाही. अश्या विविध प्रकारच्या सुविधा बँकांद्वारे आपल्या ग्राहकांना पुरवल्या जातात. ई बँकिंग  च्या वापरामुळे बऱ्याच गोष्टी जलद होऊ लागलेल्या आहेत. 

>> हे पण वाचा – बँक म्हणजे काय आणि बँक बद्दल संपूर्ण माहिती


नेट बँकिंग चे फायदे | Advantages of Net Banking in Marathi

नेट बँकिंगचे बरेचसे फायदे आहेत चला तर आता एक एक करून सर्व फायदे जाणून घेऊया.

  1. E-Banking या सुविधेचा वापर करून तुम्ही कॅशलेस इंडिया चा एक भाग होऊ शकता. ई बँकिंग चा वापर करून तुम्ही घर बसल्या सर्व रिचार्ज चुटकीसरशी करू शकता, जसे की मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, प्रीपेड पोस्टपेड रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, महानगर गॅस बिल, ई.
  2. नेट बँकिंग चा वापर करून तुम्ही फ्लाइट तिकीट व रेल्वेचे तिकीट देखील बुक करू शकता.
  3. वेगवेगळे ॲप्लिकेशन जसे की फोन पे,पेटीएम, गूगल पे, ऍमेझॉन पे इत्यादी पेयमेन्ट गेटवे चा वापर करून तुम्ही मोबाईल रिचार्ज व इतर रिचार्ज केल्यानंतर भरपूर कॅशबॅक देखील मिळवू शकता.
  4. ई बँकिंग च्या सुविधेमुळे तुम्हाला बँकेमध्ये स्वतःला जाऊन कोणतेही काम करण्याची गरज भासत नाही.
  5. Internet Banking चा वापर केल्यामुळे तुमचा बहुमूल्य वेळ वाचतो.
  6. जर तुम्हाला एखादी इमर्जन्सी आली आणि कोणाला पैसे पाठवायचे असतील, तरी देखील तुम्ही नेट बँकिंगचा वापर करून एखाद्याला सहज पैसे पाठवू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही मनी ट्रान्सफर शॉपमध्ये जायची गरज नाही.
  7. नेट बँकिंग सुविधेचा तुम्ही 24 तास लाभ घेऊ शकता.
  8. बऱ्याचशा बँका या रात्री व सार्वजनिक सुट्ट्या दिवशी बंद असतात, अशा वेळेस तुमची कामं होत नाहीत, पण नेट बँकिंग चा वापर करून तुम्ही सुट्टीच्या दिवशी देखील व्यवहार करू शकता.
  9. ई बँकिंग खूपच जलद रित्या काम करते, कितीही मोठी रक्कम अगदी काही सेकंदांमध्ये तुम्ही एखाद्याला पाठवू शकता किंवा स्वतःच्या अकाउंट मध्ये क्रेडिट झालेली पाहू शकता.
  10. तसेच इंटरनेट बँकिंग चा वापर करून आपण इन्शुरन्स प्रीमियम, कर्जाचे EMI तसेच नवीन चेक बुक आणि डेबिट कार्ड कार्ड साठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो.  

नेट बँकिंग चे तोटे | Disadvantages of net Banking in Marathi 

मित्रांनो नेट बँकिंग चे एवढे फायदे जरी असले तरी त्याचे काही तोटे देखील आहेत, ते पुढील प्रमाणे जाणून घेऊ. 

  1. जर एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित अँड्रॉइड फोन वापरता येत असेल तर सुरुवातीला त्याला ई बँकिंग चा वापर करणे जड जाईल.
  2. नेट बँकिंग साठी तुमच्याकडे सतत इंटरनेट असणे अनिवार्य आहे, याशिवाय तुम्ही नेट बँकिंग वरून व्यवहार  करू शकत नाही.
  3. काही काही वेळेस बँकेच्या वेबसाईटचे सर्वर डाऊन असल्यामुळे देखील तुमचे व्यवहार होण्यासाठी वेळ लागू शकतो.
  4. इंटरनेट बँकिंग मध्ये सर्व ऑनलाईन व्यवहार होत असल्यामुळे याला ऑनलाइन हॅकिंगचा देखील धोका असतो. 
  5. इंटरनेट बँकिंग करताना काळजी घेणे खूप महत्वाचे असते जसे कि आपले ई बँकिंग करताना आपले खाते कुठल्याही सायबर कॅफे मध्ये ओपन करू नये किंवा आपल्या बँकिंग चा ID आणि पासवर्ड कोणत्याही व्यक्तीला सांगू नये. 

>> आणखी माहिती वाचा – इंटरनेट म्हणजे काय आणि इंटरनेट बद्दल सविस्तर माहिती वाचा


नेट बँकिंगचा वापर कसा करावा | How To Use Net Banking In Marathi

नेट बँकिंग चालू करण्यासाठी मुख्यतः दोन पद्धती आहेत, एक ऑनलाईन आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन. पुढील प्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन ई बँकिंग कशी सुरु करावी याबद्दल माहिती पाहूया. 

इंटरनेट बँकिंग माहिती

ऑनलाइन नेट बँकिंग कसे सुरू करावे?

 1) नेट बँकिंग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जा (लक्षात ठेवा कि बँकेची वेबसाइट ही https ने सुरू झालेली असावी.)

2) वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला Register करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून सर्वप्रथम तुमचे रजिस्ट्रेशन करा.

3) यानंतर तुम्हाला नेट बँकिंग चालू करण्यासाठी एक पर्याय येईल, त्यावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्या.

4) पुढील स्टेपमध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल, जसे की तुमचा अकाउंट नंबर, किंवा डेबिट कार्ड वरील नंबर इत्यादी.

5) यानंतर तुम्हाला लगेचच युजरनेम आणि आयडी बँकेकडून प्रोव्हाइड करण्यात येईल. ज्याचा उपयोग करुन तुम्ही ई बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता.

ऑफलाइन नेट बँकिंग कसे सुरू करावे?

1) ऑफलाइन पद्धतीमध्ये ई बँकिंग सुरु करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या ब्रांच मध्ये जावे लागेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला इंटरनेट बँकिंग चालू करण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. 

2) हा फॉर्म व्यवस्थित भरून तुम्हाला बँकेकडे सबमिट करावा लागेल.

3) त्यानंतर दोन-तीन आठवड्यांनी तुमच्या घरी पोस्टाद्वारे तुमचा युजरनेम व आयडी पाठवण्यात येईल, ज्याचा वापर करुन तुम्ही नेट बँकिंग सुविधेचा वापर करू शकता.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

कोणत्या बँका ई बँकिंग च्या सुविधा पुरवितात?

State Bank of India
Bank of India
Axis Bank 
ICICI Bank
HDFC Bank
Punjab National Bank
Central Bank of India
Canara Bank
Union Bank of India

आणि इतरही काही बँका आहेत त्या इंटरनेट बँकिंग ची सेवा ग्राहकांना प्रदान करतात.

इंटरनेट बँकिंग ची उदाहरणे काय आहेत?

Internet Banking हि एक इलेक्ट्रॉनिक व्यवहार करण्याची पद्धती आहे ज्यामध्ये बँका आपल्याला विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा जसे कि मोबाईल बँकिंग, Unified Payments Interface (UPI), स्मार्ट कार्ड, ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच (ATM), डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड अश्या विविध प्रकारच्या सेवा प्रदान करते. 


निष्कर्ष | Internet Banking in Marathi

आजच्या या लेखामध्ये आपण नेट बँकिंग म्हणजे काय? (Net Banking Meaning in Marathi) नेट बँकिंग बद्दल सर्व काही माहिती बघितली आहे. ई बँकिंग हि एक अशी सुविधा आहे, ज्याचा  उपयोग आजच्या घडीला करोडो लोक करत आहेत.

याच्या वापरामुळे घरबसल्या चुटकीसरशी व्यवहार करणे, अगदी सोपे, सहज आणि सेफ झाले आहे. तुम्हीसुद्धा निसंकोचपणे नेट बँकिंगचा वापर करून स्वतःचा अमूल्य वेळ वाचवू शकता.

तसेच आमची इंटरनेट बँकिंग संदर्भात हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि जर तुम्हाला पोस्ट उपयोगाची वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, मैत्रिणींना शेअर करा. 

धन्यवाद !

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. Dhanshree kailas zagade

    तुमची माहिती खूप आवडली व अगदी सोप्या शब्दात समजली

  2. Dhanshree kailas zagade

    तुमची माहिती खूप आवडली व अगदी सोप्या शब्दात समजली