OTP म्हणजे काय? One Time Password in Marathi

OTP म्हणजे काय

तुम्ही सर्वांनी ऑनलाईन व्यवहार करतांना OTP चा वापर तर केला असेलच. पण OTP वापरण्यामागच कारण तुम्हाला माहित आहे का? OTP सारखी कोणती संकल्पना जर अस्तित्वात च नसती तर त्याचा काय परिणाम झाला असता याचा कधीतरी विचार केला का?

आणि म्हणूनच विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आमच्या आजच्या या लेखात आम्ही ओटीपी काय आहे? आणि ओटीपी बद्दल ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये तुमच्यासमोर मांडायचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

तर आज आपणं OTP म्हणजे काय? (One Time Password in Marathi) OTP चे प्रकार आणि OTP चे फायदे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

OTP म्हणजे काय? | What is OTP Meaning in Marathi

OTP ही एक सॉफ्टवेअर सेवा आहे जिचा उपयोग दूरध्वनी क्रमांक सत्यापित करण्यासाठी केला जातो. OTP हे संक्षिप्त रूप आहे “One Time Password” चे ज्याला मराठीत “एक वेळ संकेतशब्द” असे म्हटल्या जाते. म्हणजेच हा पासवर्ड फक्त एकाच वेळी वापरता येतो आणि त्याची वैधता सुद्धा खूप कमी असते.

एखादा ओटीपी नंबर हा केवळ पाच किंवा दहा मिनिट पर्यंत च वैध राहतो. त्यानंतर तो अवैध होऊन जातो व नंतर त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे परत त्याच प्रक्रियेसाठी नविन ओटीपी ची गरज भासते. हा आलेला नविन OTP दहा मिनिटच्या आत एंटर केल्यावर च समोरची प्रक्रिया पार पाडली जाते.

आता येथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो-


ओटीपी पासवर्ड म्हणजे नेमकं काय? OTP Password in Marathi

ओटीपी पासवर्ड म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वापरकर्ता नेमकं कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी किंवा समोरचा व्यक्ती तुम्हीच आहे याचा पुरावा देण्यासाठी हा संकेतशब्द संगणकाला द्यावा लागतो.

पासवर्ड म्हणजेच अक्षरे आणि संख्या यांच्या संयोजनापासुन तयार झालेला एक असा गुप्त शब्द जो फक्त आणि फक्त वापरकर्त्याला माहित असेल.

तुम्ही बऱ्याचदा नोटीस केल असेल की जेव्हाही तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअर/संगणक किंवा कुठल्याही सोशल मीडिया अकाउंट मध्ये लॉगिन करायचे असते तेव्हा तुमचा संगणक तुम्हाला पासवर्ड मागतो. आणि तुम्हाला त्या संगणकात तोपर्यंत प्रवेश मिळत नाही जो पर्यंत तूम्ही अचूक पासवर्ड संगणकाला देत नाही.

संपूर्ण माहिती वाचा – संगणक म्हणजे काय? व संगणकाची पूर्ण माहिती

दूरध्वनी क्रमांक तेथे एंटर केल्यावर त्या नंबर च्या पृष्टीसाठी एंटर केलेल्या मोबाईल नंबर वर मजकूर संदेश म्हणून सहा किंवा आठ अंकी पासकोड येतो. याला च ओटीपी नंबर अस सुद्धा म्हटल्या जाते. नंतर आलेला ओटीपी पासवर्ड अचूकपणे समाविष्ट केल्यावर च आपणं त्या वेबसाईट मध्ये लॉगिन करू शकतो.


दोन फॅक्टर प्रमाणीकरण | Two Factor Authentication

One Time Password या संकल्पनेत आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे “टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन” (2FA) चा. हे जवळपास OTP Code सारखेच आहे.

OTP आणि टू-फॅक्टर ऑथेटिकेशन मध्ये फक्त येवढाच फरक असतो की दूरध्वनी क्रमांकावरील मजकूर संदेशाएवजी आपल्या ईमेल पत्त्यावर मेल द्वारे पासवर्ड पाठवला जातो.

वन टाईम पासवर्ड मराठी

OTP कशा प्रकारे निर्माण केला जातो?

OTP च्या निर्मितीसाठी एकापेक्षा अधिक मार्ग उपलब्ध आहेत. परंतू वारंवार आणि सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे OTP निर्मितीची “वेळ-आधारित” (Time Based) पद्धत.

या पद्धतीमध्ये ओटीपी नंबर तयार करण्यासाठी टोकण वापरले जाते. या पद्धतीमध्ये ‘वेळ’ ही सर्वात महत्वाची बाब आहे जी इनपुट म्हणून वापरली जाते. तसेच ही पिढी गणितीय सूत्रांचा वापर करून आऊटपुट च्या रुपात OTP देते.

आऊटपुट म्हनून प्राप्त झालेला हा OTP वेगवेगळ्या मार्गाने (उदा: मजकूर संदेशाव्दारे किंवा मेल व्दारे) वितरित केला जातो. आता OTP Number चा वापर का केला जातो? याबद्दल माहिती पाहूया. 

हे पण वाचा – इंटरनेट म्हणजे काय? व इंटरनेट बद्दल संपूर्ण माहिती


ओटीपी चा वापर | Advantages OTP in Marathi

  1. ऑनलाईन बँकिंग किंवा ऑनलाईन खरेदी करतांना बऱ्याचदा OTP वापरल्या जातो. हा संकेतशब्द संगणक सिस्टीम किंवा इतर डिजिटल उपकरणांवर फक्त एका लॉगिन सत्रासाठी/व्यवहारासाठी वैध असतो.
  2. One Time Password हा वापरकर्ता आणि मोबाईल नंबर यांच्यातील परस्पर संबंधाचा  पुरावा देतो आणि खात्याची सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे.
  3. वन टाईम पासवर्ड चा वापर करून जर पैशांची देवाणघेवाण होत असेल तर बऱ्याचदा होणारी फसवणूक आपण टाळू शकतो आणि ते अधिक सोयीचे ठरते.
  4. वापरकर्त्याच्या मोबाईल नंबर ची पुष्टी करण्यासाठी तसेच अनेकदा होणारे संशयास्पद क्रियाकलाप कमी करण्यासाठी ओ.टी.पी. खूप मदतगार ठरतो. आणि याच कारणामुळे पैशांचा व्यवहार करतांना ई-कॉमर्स अनुप्रयोग आणि वेबसाइट एसएमएस द्वारे OTP पाठवून व्यवहाराचं प्रमाणीकरण करतात.
  5. वैद्यकीय कागदपत्रे, कायदेशीर कागदपत्रे सुरक्षित करने, तसेच खाजगी माहितीच्या सुरक्षिततेसाठी वन टाईम पासवर्ड हा एक चांगला मार्ग आहे. अशा प्रकारची खाजगी माहिती कोणाला मिळणार आहे याची खात्री करून, सुरक्षा तपासणी करूनच समोरच्याला माहिती पाठवली जाते.
  6. आपल्या सेल्फ सर्व्हिस बँकिंग प्रोफाईल मध्ये बदल झाल्यास OTP Number च्या माध्यमातुन सुनिश्चित केल्या जाते की हे सर्व बदल खाते मालकाद्वारे केले गेले आहेत, आणि सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे.
  7. जेव्हा एखादा अज्ञात वापरकर्ता  डिव्हाइस, ॲप किंवा वेबसाईटवर लॉगिन करतो आणि संकेतशब्द पुनर्संचयित करण्याची विनंती करतो तेव्हा मूळ वापरकर्त्याला एसएमएस द्वारे OTP पाठवल्या जातो आणि OTP पाहून मूळ वापरकर्ता आधीच सतर्क होऊन जातो. यामधून फसवणूक आणि चोरी यांसारखे धोके टाळण्यास मदत होते.
  8. जेव्हा एखादा वापरकर्ता दीर्घ कालावधी पर्यंत निष्क्रिय राहल्यानंतर वेबसाईट लॉगिन करायचा प्रयत्न करते तेव्हा ती वेबसाईट OTP चा वापर करून समोरचा व्यक्ती हा हॅकर किंवा स्पॅमर नसून आपला मूळ वापरकर्ता आहे याची खात्री करते.

अशा प्रकारे विविध क्षेत्रांत विविध प्रकारे OTP Number in Marathi चा वापर करून होणारे सायबर गुन्हे आणि फसवणूक आपणास टाळता येते आणि सुरक्षिततेची गोपनीयता ही नेहमी कायम राहते. 


OTP काय आहे?

OTP म्हणजे एक वेळ संकेतशब्द. हा एक सुरक्षा कोड असतो. जो ऑनलाईन व्यवहार, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन खरेदी इत्यादी व्यवहारासाठी आपण OTP चा वापर करतो, जेव्हा ऑनलाईन व्यवहार करताना आपला मोबाईल नंबर त्या साईट मध्ये एंटर केल्या जातो तेव्हा मोबाईल नंबर च्या पृष्टीसाठी एंटर केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर एक मजकूर संदेश म्हणून चार, सहा अंकी पासकोड येतो याच पासकोड ला ओटीपी नंबर असे म्हणतात.

OTP चा फुल फॉर्म काय आहे?

OTP चा फुल फॉर्म “One Time Password” असा आहे, ज्याला मराठी मध्ये “एक वेळ संकेतशब्द” असे म्हटल्या जाते. हा ओटीपी पासवर्ड फक्त एकाच वेळी वापरता येतो आणि त्याची वैधता ५ मिनिट किंवा १० मिनिटांच्या निश्चित वेळेसाठी असते आणि नंतर ओटीपी निष्क्रिय होते.


निष्कर्ष :- OTP बद्दल संपूर्ण माहिती 

आम्हाला आशा आहे की आजचा हा वन टाईम पासवर्ड (OTP Information) बद्दलचा लेख तुम्हाला आवडला असेल. आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला OTP म्हणजे काय? (One Time Password in Marathi) OTP चे प्रकार आणि OTP चे फायदे यांबद्दल महत्वपूर्ण आणि सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

जर खरोखर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल आणि मदतगार ठरला असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सोबतच जर काही अडचण, प्रश्न किंवा लेखाबाबत काही महत्वाची सूचना असेल तर कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. जेणेकरून आम्ही ते योग्य प्रकारे संपादित करू.

Leave a Reply