आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला रँडम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओन्ली मेमरी या बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच संगणक, मोबाईल आणि लॅपटॉप चा वापर करणार्यांना रॅम आणि रोम याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे असते.
चला तर पाहूया…. रॅम आणि रोम म्हणजे काय?
संगणक यामध्ये डेटा साठवून ठेवण्यासाठी RAM आणि ROM या दोन प्रकारच्या मेमरी चा वापर केला जातो, रॅम हि एक प्रायमरी मेमरी असते तर रोम हि सेकंडरी मेमरी असते.
रॅम म्हणजे काय? | RAM in Marathi
RAM या मेमरी चा फुल्ल फॉर्म म्हणजेच संक्षिप्त रूप Random Access Memory असे होते. या मेमरी ला Volatile आणि Temporary Memory मेमरी असे देखील म्हटले जाते.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जेव्हा आपण संगणका मध्ये एखादे कार्य करत असतो अणि अचानकपणे आपल्याकडुन संगणक बंद झाला किंवा काही कारणास्तव पीसी अचानक बंद पडला तर आपण जो डेटा माहिती टाईप केलेला असतो तो सर्व डेटा संगणक बंद झाल्यामुळे डिलीट होतो.
हा डिलीट झालेला डेटा आपल्याला परत मिळू शकत नाही, म्हणुनच या मेमरी ला वोलाटाईल म्हणजे अस्थिर तसेच तात्पुरती मेमरी म्हणुन संबोधिले जाते.
रोम म्हणजे काय? | ROM in Marathi
ROM या मेमरी चा फुल्ल फॉर्म Read Only Memory असा होतो, या मेमरी ला Secondary, Non Volatile आणि Permanent Memory असे सुद्धा म्हटले जाते.
रॅम मध्ये ज्या प्रमाणे संगणकावर काम करत असताना अचानक संगणक बंद झाल्यामुळे आपण टाईप केलेला सर्व डेटा डिलीट होतो, रोम अगदी याच्या उलट काम करत असते.
म्हणजेच या मेमरी मध्ये संगणक बंद झाल्यामुळे आपला डेटा डिलिट होत नाही, पुन्हा संगणक सुरु केला तर तो डेटा जसाच्या तसाच राहतो. म्हणूनच या मेमरी ला स्थिर अणि कायमस्वरूपी मेमरी असे देखील संबोधले जाते.
हे पण वाचा – कंट्रोल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय? संपूर्ण माहिती वाचा
रॅम आणि रोम मधील फरक | Difference Between Ram & Rom in Marathi
क्र | RAM | रँडम ऍक्सेस मेमरी | ROM | रीड ओन्ली मेमरी |
1 | RAM म्हणजेच रँडम ऍक्सेस मेमरी याला प्राथमिक, मुख्य किंवा Volatile Memory असे देखील म्हटले जाते. कारण या मेमरी मधील डेटा हा संगणक बंद झाला कि पुसल्या जातो म्हणजेच Delete होतो. म्हणूनच याला अस्थिर मेमरी असे सुद्धा म्हणतात. | रोम हि एक Non Volatile मेमरी आहे, या मेमरी ला सेकंडरी आणि पर्मनंट मेमरी असे देखील म्हटले जाते. या मेमरी मधील डेटा हा पर्मनंट साठवून ठेवल्या जातो. |
2 | रॅम मध्ये असलेल्या माहिती किंवा डेटा ला सहजपणे बदलता येते म्हणजेच त्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. | पण रोम मध्ये असलेल्या माहिती किंवा डेटा ला मॉडिफाय करता येत नाही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नाहीत. |
3 | तसेच रॅम मधील सर्व डेटा CPU द्वारे डायरेक्ट अँक्सेस केला जातो कारण रँम मेमरी ही सीपीयुचा एक महत्वपूर्ण घटक असते. | डेटाला आधी रोममधून रॅम मध्ये काँपी पेस्ट करून घ्यावं लागतं आणि नंतर सीपीयुला रोममधला डेटा अँक्सेस करता येतो. |
4 | रँडम ऍक्सेस मेमरीचा आकार रोमपेक्षा मोठा असतो त्यामुळे हि मेमरी जलद गतीने काम करू शकते. | तर रीड ओन्ली मेमरी चा आकार रॅम पेक्षा कमी असतो म्हणुन या मेमरी ची गती कमी असते. |
5 | रॅम हि मेमरी अधिक खर्चिक अणि महाग असते.कारण या मेमरी चा आकारही मोठा असतो अणि गतीने काम सुद्धा करते. | रोम ही रँमपेक्षा स्वस्त दरात बाजारात उपलब्ध होत असते. कारण या मेमरी चा आकार कमी असतो अणि वेग देखील रँम मेमरी पेक्षा कमी असतो. |
6 | रँममध्ये आपण फक्त काही मेगाबाइट पर्यत मर्यादित डेटा स्टोअर करू शकतो. | पण रोम मेमरीत आपण पाहिजे तेवढा मल्टीपल गेगाबाईट डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. |
7 | रँमचे दोन मुख्य प्रकार Dynamic Ram Static Ram | रोम चे दोन मुख्य प्रकार PROM EPROM EEPROM |
FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न
RAM ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे?
RAM म्हणजेच रँडम ऍक्सेस मेमरी (अस्थिर मेमरी) होय, याला प्राथमिक, मुख्य किंवा Volatile Memory असे देखील म्हटले जाते. कारण या मेमरी मधील डेटा हा संगणक बंद झाला कि पुसल्या जातो म्हणजेच Delete होतो.
RAM चा फुल्ल फॉर्म काय आहे?
RAM Full Form in Marathi – Random Access Memory | रँडम ऍक्सेस मेमरी.
ROM ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे?
रोम हि एक Non Volatile मेमरी आहे, या मेमरी ला सेकंडरी आणि पर्मनंट मेमरी असे देखील म्हटले जाते. या मेमरी मधील डेटा हा पर्मनंट साठवून ठेवल्या जातो.
ROM चा फुल्ल फॉर्म काय आहे?
ROM Full Form in Marathi – Read Only Memory | रीड ओन्ली मेमरी.
निष्कर्ष | RAM & ROM Meaning in Marathi
आम्हाला आशा आहे कि आजचा RAM & ROM म्हणजे काय? (What is RAM & ROM in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती असलेला हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तसेच तुमच्या या लेखाबद्दल च्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना हा लेख नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा महत्वाची आणि उपयुक्त माहिती मिळू शकेल.
त्याच बरोबर तुम्हाला नवनवीन तत्रंज्ञान, इंटरनेट, ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन अश्या प्रकारची टेकनिकल माहिती वाचायला आवडत असेल तर आमच्या मराठी स्पिरिट वेबसाईट ला नक्की व्हिझीट करा.
धन्यवाद !