SIP म्हणजे काय? | SIP Meaning in Marathi

SIP म्हणजे काय

आज या पोस्ट मध्ये आपण SIP म्हणजे काय? आणि या बद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती पाहूया.

SIP म्हणजे काय? | SIP Meaning in Marathi 

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच पद्धतशीर पणे गुंतवणूक करण्याची एक योजना होय. एसआयपी हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंड नी मध्यम वर्गीय लोकांसाठी आणि जे लोक पैशाची गुंतवणूक करू शकत नाही अश्या लोकांसाठी गुंतवणूक करण्याची एक उत्तम आणि सोयीस्कर योजना आहे.  

या SIP प्लॅन मध्ये आपण नियमित कालावधीने म्हणजेच दरमहा किंवा तीन महिन्यातून एक निश्तिच स्वरूपाची रक्कम जमा करत असतो, यासाठी कमीत कमी आपण ५०० रुपयापासून सुरुवात करू शकतो. 

SIP चा फुलफाॅम | SIP Full Form in Marathi 

SIP या शब्दाचा फुल्ल फॉर्म “सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन” (Systematic Investment Plan) असा होतो, यालाच आपण मराठी मध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना असे देखील म्हणू शकतो.


SIP मध्ये गुंतवणुक कशी करावी | How to invest in SIP

या प्लॅन मध्ये आपल्याला महिन्यातून एकदा तिमाही किंवा सहामाही तसेच एका वर्षातुन एकाच वेळी एकरकमी पैशाची गुंतवणूक करू शकतो. तसेच बरेच लोक या मधील मंथली योजना निवडतात म्हणजेच महिन्यातून एकदा आपण ठरवलेली एक निश्चित स्वरूपाची रक्कम जमा करता येईल. 

तसेच या SIP योजने मध्ये आपण जी रक्कम जमा करतो ती रक्कम फंड मॅनेजर विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवत असतात, अणि निर्धारित करण्यात आलेल्या एका निश्चित तारखेला ही एसआयपी ची रक्कम आपल्या खात्यातुन वजा होऊन एसआयपी मध्ये जमा केली जात असते.

SIP द्वारे आपण एक मोठी रक्कम जमा करण्यासोबत चांगला परतावा देखील प्राप्त करू शकतो, जर समजा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर आपणास जमा केलेल्या पैशांवर मार्केट च्या स्थिती नुसार रिटर्न देखील मिळतात. 

जर आपण म्युच्युअल फंड मध्ये हजार रुपये गुंतवणूक केलेल्या एका युनिटचे (Net Asset Value) NAV युनिट २० असेल तर तर गुंतवणूक दाराला हजार रुपये मध्ये त्या म्युच्युअल फंडची एकुण ५० युनिट प्राप्त होतील. जसजसे ह्या युनिटच्या एनएव्ही मध्ये वाढ होत जाईल आपल्याला एस आयपी मधील गुंतवणूकीवर मिळणारा परताव्यात देखील वाढ होत असते.

उदा, एका वर्षासाठी १२ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास आपणास १३ हजार २१ रूपये प्राप्त होतील अणि दोन वर्षांसाठी आपण २४ हजाराची गुंतवणूक केल्यास २८ हजार १३५ रूपये प्राप्त होईल. तसेच जर आपण तीन वर्षांसाठी ३६ हजार रूपये गुंतवले तर आपणास ४५ हजार ६७९ रूपये प्राप्त होतील.

शेअर मार्केट च्या भावात चढ उतार आला तर त्याचा परिणाम आपल्याला प्राप्त होत असलेल्या परताव्यावर देखील होतो. म्हणजेच बाजारात तेजी आली तर फायदा होतो अणि बाजारात मंदी म्हणजे मार्केट डाऊन झाले तर नुकसान देखील सहन करावे लागते.

SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे | Benefits of SIP in Marathi

SIP मध्ये इतर स्कीमच्या तुलनेत अधिक चांगले रिटर्न प्राप्त होतात तसेच SIP मध्ये अगदी ५०० रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. 

या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणुकीची रिस्क खूप कमी असते ज्याप्रमाणे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणुकीची रिस्क असते त्याच्या तुलनेत sip मध्ये रिस्क खूप कमी प्रमाणात असते. 

तसेच यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आपणास चक्रवाढ पद्धतीने व्याज प्राप्त होते, म्हणजेच यात Compound Interest चा देखील लाभ मिळतो, त्यामुळे आपल्याला चांगला परतावा देखील मिळविता येतो. 

एका ठाराविक कालावधी मध्ये पैशांची गुंतवणूक केली जात असल्याने यात आपणास बचतीची अणि गुंतवणूकीची शिस्त प्राप्त होते. कारण एसआयपी मध्ये गुंतवणूक करावयाची रक्कम बाजुला काढल्यानंतर आपण इतर खर्च करतो.

>> SIP Calculator


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

SIP चा फुल्ल फॉर्म काय आहे?

SIP या फुल्ल फॉर्म Systematic Investment Plan (सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन) असा होतो, यालाच आपण मराठी मध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना असे देखील म्हणू शकतो.

SIP मध्ये किती गुंतवणूक करता येते?

SIP मध्ये गुंतवणुकीची सुरुवात किमान 500 रुपयांपासून करू शकता आणि कितीही जास्त रक्कम गुंतवू शकता. 

SIP चे प्रकार कोणते आहेत?

Step-up or top-up SIP
Perpetual SIP
Fixed SIP
Trigger SIP
Flexible SIP
अश्या प्रकारचे विविध SIP बाजारात उपलब्ध आहेत.


निष्कर्ष | SIP Information in Marathi

SIP मध्ये तुम्हाला पैशाची योग्य आणि सिस्टिमॅटिक गुंतवणूक करण्याची एक उत्तम सवय लागते यामुळे तुम्ही पैशाची बचत होते, म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने SIP मध्ये गुंतवणूक करायलाच हवी. तसेच वरील (SIP Guide) बद्दल संपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कंमेंट करा आणि SIP बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही निसंकोच पणे विचारू शकता, तसेच पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. 

धन्यवाद!! 

Leave a Reply