आपल्या सर्वांना सोशल मीडिया बद्दल चांगली माहिती आहेच. आपण आपल्या दररोज च्या जीवनात सोशल मीडिया चा वापर करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल सुद्धा अधिक माहिती असायला हवी.
म्हणूनच आजच्या या ब्लॉगपोस्ट मध्ये तुमच्यासाठी Social Media आणि Social Media Marketing म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती घेऊन आलो आहोत.
आपण आपल्या जीवनामध्ये Social Media नेटवर्किंग साईट चा मोठ्या प्रमाणात वापर करतो, पण आपल्याला माहिती आहे की या सोशल मिडियाच्या साहाय्याने आपण विपणन करून आपल्या प्रॉडक्ट्स् आणि सर्विसेस ला प्रमोट करू शकतो किंवा वस्तू व सेवांची विक्री देखील करू शकतो व त्यामधून पैसे सुद्धा कमवू शकतो.
सोशल मीडिया म्हणजे काय? । Social Media in Marathi
‘सोशल मीडिया’ म्हणजे काय तर एकमेकांसोबत संवाद साधण्याचे (Communication) एक सोपे माध्यम होय. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे ज्या मध्ये आपण आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत जोडल्या जातो, तसेच सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नवनवीन इन्फॉर्मेशन शेअर आणि रिसीव्ह करू शकतो.
खालील काही लोकप्रिय सोशल मीडिया ची उदाहरणे दिली आहेत.
सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? । Social Media Marketing in Marathi
सोशल मीडिया मार्केटिंग हा एक डिजिटल मार्केटिंग चाच एक भाग आहे. याला SMM सुध्या म्हटले जाते. सोप्या भाषेत म्हणायचे झाल्यास एखाद्या ब्रँड ला किंवा प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करण्यासाठी सोशल साईट वर जे काही धोरण लागू केले जाते त्यास सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हणतात.
या मार्केटिंग मध्ये आपण आपल्या कन्टेन्ट ला विविध प्रकारे प्रमोट करू शकतो. जसे कि Text, images, Videos, Infographic इत्यादी च्या साहाय्याने आपण आपल्या कन्टेन्ट ला प्रमोट करू शकतो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बद्दल आणखी माहिती वाचा
- Facebook नेटवर्क बद्दल मराठी माहिती
- इंस्टाग्राम बद्दल संपूर्ण माहिती
- YouTube या व्हिडिओ प्लॅटफॉर्म बद्दल माहिती
- लिंक्डइन म्हणजे काय व LinkedIn प्रोफाइल कसे बनवायचे
Social Media बद्दल महत्वाची माहिती | SMM Information in Marathi
सोशल मीडिया मधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसोबत जोडल्या जातो, तसेच आपल्या व्यवसाया ची प्रगती करण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्वाचे साधन मानले जाते.
- Reach
सोशल मीडिया च्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहचू शकता. तसेच याच्या साहाय्याने तुमच्या ब्रँड ला जास्तीत जास्त Reach येऊ शकते.
- Increase Brand Awareness
जर तुमचे ब्रँड, प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस नवीनच असेल तर Social Media एक प्रभावी माध्यम आहे, याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्रँड ची कमीत कमी वेळे मध्ये जागरुकता करू शकता. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या ब्रॅण्ड विषयी माहिती प्रदान करू शकता.
- Traffic Generation
सोशल मीडिया मधून आपण मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मिळवू शकतो. तसेच आपल्या ब्रँड ला विविध सोशल मीडिया किंवा विविध ग्रुप मध्ये शेअर करून ट्रॅफिक मिळवू शकतो. तसेच आपण Paid Promotion करून सुद्धा आपल्या वेबसाईट वर मोठया प्रमाणात ट्रॅफिक आणू शकतो. सोशल मीडिया मधून आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात Traffic जनरेट करू शकतो.
- Conversions
सोशल मीडिया मध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ऍक्टिव्ह असल्याने तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मदत होते. हे एक प्रभावी माध्यम आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस ची लीड जनरेट करू शकता.
Social Media Marketing Tips in Marathi | सोशल मीडिया मार्केटिंग टिप्स
1) आपले ध्येय निश्चित करा | Define Your Goal
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपले ध्येय निश्चित करणे होय. आपले सोशल मीडिया साठी मजबुत ध्येय ठरवलेले नसल्यास आपण वेळोवेळी तयार केलेली योजना विकसित करू शकणार नाही, जर आपले ध्येय निश्चित केलेले असल्यास ध्येय साध्य करण्यासाठी योग्य योजना तयार करून ध्येय साध्य करू शकतो.
2) प्रेक्षकांबद्दल संशोधन करणे | Target Your Audience
आपण Social Media मार्केटिंग करत असाल तर प्रथम आपले ध्येय निश्चित करणे आणि दुसरे म्हणजे आपल्या लक्षीत प्रेक्षकांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. यामध्ये आपल्याला प्रेक्षकांना काय पाहिजे किंवा त्यांच्या आवडी निवडी विषयी जाणून घ्यायला हवे.
प्रेक्षकांना ज्या गोष्टीत जास्त रस आहे त्या विषयावर जास्त भर देऊन त्या विषयी नवनवीन पोस्ट तयार करणे, तसेच त्यांनी केलेल्या कंमेंट वर रिप्लाय देने आणि त्यांचा आपल्या पोस्ट बद्दल चा अभिप्राय गोळा करणे महत्वाचे असते. यामुळे आपण आपल्या Website वर Audience जोडून ठेऊ शकतो.
3) स्पर्धकाविषयी संशोधन | Research Your Competitors
Social Media Marketing मध्ये आपल्या स्पर्धकावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. आपला स्पर्धक त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीचे पालन करतो. तसेच त्याने व्यवसायासाठी वापरलेल्या काही योजनांवर आपण लक्ष ठेवले, तर आपण त्याने वापरलेल्या योजना पेक्षा आणखी चांगली योजना तयार करून अमलात आणू शकतो. अशा प्रकारे आपल्या स्पर्धकाविषयी संशोधन करावे.
4) स्पर्धा चालवा | Competition
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे म्हणून मोठया प्रमाणात स्पर्धा चालूच असतात, आपल्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या Audience च्या मताप्रमाणे किंवा त्यांना ज्या गोष्टी त रस आहे त्या विषयी प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच प्रेक्षकांना काही नवीन शिकायची अपेक्षा असते म्हणून आपण त्यांच्या विषयी संशोधन करून त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे तशाच प्रकारच्या पोस्ट अपलोड कराव्या.
5) सोशल मीडिया कन्टेन्ट | Great Social Content
आपले कन्टेन्ट हे इतरांनी तयार केलेल्या कन्टेन्ट पेक्षा वेगळे असायला हवे. Social Media Content in Marathi तयार करताना ते कन्टेन्ट नवीन आणि उत्कृष्ट असणे महत्वाचे आहे. जर कन्टेन्ट हे स्पर्धकाच्या कन्टेन्ट पेक्षा युनिक असेल तर नक्किच ते आपल्या प्रेक्षकांना आवडेल, आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
- हे पण वाचा – Content Marketing बद्दल संपूर्ण माहिती
7) पोस्ट ऑप्टिमाइझ करा | Post Optimisation
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण टाकलेली पोस्ट वारंवार ऑप्टिमाइझ करावी, म्हणजेच नवनवीन आणि Unique Content पोस्ट करायला हवे, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांचे रिटेन्शन वाढेल. सोशल मीडिया विपणनासाठी उच्च गुणवत्तेची सामग्री प्रकाशित करणे आणि यशस्वी रणनिती तयार करण्यासाठी आपली सामग्री वेळोवेळी ऑप्टिमाइझ करणे महत्वाचे आहे.
6) व्हिडीओ सामग्रीचा वापर करा | Attractive Video Content
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये व्हीडीओ सामग्री किती शक्तीशाली बनली आहे, कदाचित याची आपल्याला कल्पनाही नसेल. म्हणून सोशल मीडिया मध्ये आपण मोठ्या प्रमाणात व्हिडीओ सामग्रीचा वापर करायला हवा. जर आपण व्हिडीओ सामग्रीचा वापर करत असाल तर तुम्हाला भविष्यात यांचा खूप फायदा होतो.
तसेच आपण Facebook आणि Instagram या सोशल मीडियाचा वापर करून Live Video द्वारे आपल्या प्रेक्षकांसोबत थेट संपर्क साधू शकतो.
FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सोप्या शब्दात सोशल मीडिया नक्की काय आहे हे स्पष्ट करा?
सोशल मीडिया एकमेकांसोबक संवाद साधण्याचे सोपे माध्यम आहे, यामध्ये वर्चुअल नेटवर्क च्या साहाय्याने लोकांच्या कल्पना, विचार आणि माहिती सामायिक केल्या जातात आणि शेअर केल्या जातात. तसेच आजच्या युगात सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.
For Ex :- Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, Whatsapp, Youtube, Etc…
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणकोणते आहेत?
Social networking sites – Facebook, LinkedIn.
Bookmarking sites – MahitiPortal, Pinterest, Flipboard, Diggs
Social news – Digg
Media sharing – Pinterest, YouTube, Vimeo
Microblogging – Twitter, Facebook
Social review sites – TripAdvisor, Yelp, FourSquare
निष्कर्ष
या लेखामध्ये आपण मराठी मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय (Social Media Marketing In Marathi) आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती जाणून घेतली.
या ब्लॉग बद्दल तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच सांगा, जेणेकरून आम्ही या ब्लॉग ला भविष्यामधे आणखी उपयुक्त करू शकू, आणि नवनवीन माहिती वाचकांना देण्याचा प्रयत्न करू. तसेच तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कंमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.
🙏धन्यवाद !🙏
खूप सहज आणि सोप्या भाषेत आपण ही माहिती दिली आहे आणि खूप फायदेशीर पण आहे आपले धन्यवाद
🙏धन्यवाद!🙏
Hey kasa shekycha amhi