फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा | How to Start Free Blog in Marathi

How to Start Free Blog in Marathi

नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi Spirit मराठी ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. 

डिजिटल मार्केटिंग च्या दुनियेत जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर ब्लॉगिंग आणि एफिलिएट मार्केटिंग हे मार्ग उपलब्ध आहेत ज्या मधून तुम्ही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पैसे कमवू शकता. 

तुम्हाला खूप साऱ्या वेबसाइट्स किंवा ब्लॉग मिळतील ज्या मधून तुम्हाला ब्लॉग कसा सुरु करू शकतो याबद्दल माहिती दिली जाते. परंतु तुम्ही ब्लॉगिंग च्या दुनियेत नवीन आहात आणि ब्लॉग सुरु करायचा आहे पण ब्लॉगिंग बद्दल तुम्हाला काही कळतच नाही किंवा तुमच्या मनात गोंधळ निर्माण होतो. 

म्हणूनच आम्ही या पोस्ट मध्ये फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा व त्यामधून पैसे कसे कमवायचे याबद्दल विस्तृत माहिती देणार आहोत. 

अनुक्रमणिका show

फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा | Start Free Blog in Marathi

ऑनलाईन पॆसे कमावण्यासाठी ब्लॉगिंग हा सर्वात उत्तम प्लॅटफॉर्म आहे. परंतु ज्या लोकांना ब्लॉगिंग बद्दल माहिती नाही आणि ब्लॉग तयार करण्याची त्यांची इच्छा आहे , तर अशा लोकांनी विनामूल्य ब्लॉग तयार करून ब्लॉगिंग सुरु करू शकतात . 

ब्लॉगिंग च्या साहाय्याने कित्येक लोक आज ऑनलाइन काम करून पॆसे कमावत आहेत. तसेच तुम्ही सुद्धा स्वतःचा ब्लॉग तयार करून पैसे कमाऊ शकता म्हणजेच तुमचे ब्लॉगिंग करिअर स्टार्ट करू शकता. 

जेव्हा विषय येतो फ्री ब्लॉगिंग प्लैटफॉर्म निवडण्याचा, तेव्हा खूप सारे ब्लॉगिंग प्लैटफॉर्म आहेत त्या मधून तुम्ही फ्री Marathi Blog चालू करू शकता. पण या ब्लॉग मध्ये आम्ही दोन टॉप फेमस ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बद्दल सांगणार आहे. 

तर चला बघूया फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म | Top Free Blogging Platform 

अशा प्रकारचे खूप सारे ब्लॉगिंग प्लैटफॉर्म उपलब्ध आहेत, परंतु ब्लॉगर आणि वर्डप्रेस हे प्लैटफॉर्म लोकप्रिय आहेत कारण या प्लैटफॉर्म वर ब्लॉगिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे technical आणि coding knowledge लागत नाही. तसेच यावर आपल्याला विनामूल्य ब्लॉग तयार करता येतो. 

फ्री मध्ये ब्लॉग बनवण्यासाठी काही महत्व पूर्ण माहिती 

ब्लॉग टॉपिक विषय | Blog Topic

जेव्हा ब्लॉगिंग करियर सुरु करण्याचा विचार करता तेव्हा प्रथम तुम्ही कोणत्या टॉपिक वर ब्लॉग लिहणार याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. ब्लॉगचा विषय हा लोकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन किंवा लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये जास्त रस आहे तसेच त्यांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक आहे याबद्दल रिसर्च करून तुम्ही ब्लॉग विषय निवडू शकता. 

 जीमेल अकाउंट | Gmail Account

जेव्हा पण तुम्ही ब्लॉग तयार करताना तुमच्या जवळ एक जीमेल अकाऊंट असणे गरजेचे असते, कारण जेव्हा तुम्ही वर्डप्रेस किंवा ब्लॉगर या साईट वर रजिस्टर करता तेव्हा तुम्हाला जीमेल अकाऊंट मागितले जाते. म्हणूनच जीमेल अकाऊंट असणे खूप आवश्यक असते. 

 डोमेन नाव | Domain Name

वर्डप्रेस किंवा ब्लॉगर वर तुम्ही ब्लॉग बनवता तेव्हा तुम्हाला डोमेन नेम निवडणे महत्वाचे असते. पण तुमचा ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिडवायची असते तेव्हा तुम्हाला डोमेन नाव विकत घेणे आवश्यक असते 

आकर्षक टेम्प्लेट्स  | Responsive Template 

ब्लॉग सुरु करत असाल तेव्हा तुमचा ब्लॉग आकर्षक असणे महत्वाचे असते. ब्लॉगर किंवा वर्डप्रेस मध्ये तुम्हाला खूप सारे टेम्प्लेट्स मिळतील त्याचा वापर करून तुम्ही आकर्षक ब्लॉग बनवू शकता. तसेच  ब्लॉग आकर्षक असेल तर व्हिसिटर तुमच्या साईट वर जास्त वेळ घालवेल त्यामुळे सर्च इंजिन रँकिंग साठी मदत होईल

सोशल मीडिया | Social Media 

 ब्लॉग तयार झाल्यानंतर सुरुवातीला ब्लॉग वर व्हिसिटर्स येण्यासाठी किंवा रँकिंग मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या साहाय्याने आपण ब्लॉग ला कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकतो. 

ब्लॉगर वर फ्री ब्लॉग कसा तयार करावा | How to Start Blog on Blogger

ब्लॉगर हा गुगल चा एक सर्वोत्कृष्ट फ्री ब्लॉगिंग प्लैटफॉर्म आहे. यामध्ये आपण विनामूल्य आणि सशुल्क ब्लॉगिंग सुरु करू शकतो. जेव्हा पण तुम्ही ब्लॉगर मध्ये ब्लॉग बनवत असाल तर तुम्हाला गुगल फ्री मध्ये डोमेन आणि होस्टिंग सर्वर प्रदान करते. Blogger साहाय्याने तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकता व तुमची ब्लॉगिंग प्रवास सुरु करू शकता 

ब्लॉगरवर ब्लॉग कसा सुरु करावा संपूर्ण माहिती

स्टेप बाय स्टेप ब्लॉगर वर ब्लॉग कसा सुरु करावा संपूर्ण माहिती खालील स्टेप्स मध्ये दिलेली आहे, त्याच्या साहाय्याने तुम्ही (Step to Start a Blog on Blogger) ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा सुरू शकता. 

BlogSpot (ब्लॉगर) फ्री ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वेब ब्राउसर वर www.blogger.com हि साईट ओपन करून घ्यावी. 

#स्टेप 1 – ब्लॉगर साईट उघडणे

Blogger साईट ओपन झाल्यानंतर Create your Blog या वर क्लिक करावे. आता आपल्याला जीमेल अकाऊंट विचारल्या जाते, त्यानंतर आपल्याला जीमेल अकाऊंट व पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून घ्यावे. 

ब्लॉगरवर ब्लॉग सुरू करा
ब्लॉगरवर ब्लॉग सुरू करा

 #स्टेप 2 – लॉगिन करणे

ब्लॉगर वर लॉगिन झाल्यानंतर आपल्याला ब्लॉग चा प्रोफाइल तयार करावा लागेल. यामध्ये आपल्याला ब्लॉग चा विषय, URL ऍड्रेस, तसेच टेम्प्लेट निवडून घ्यावे. 

#स्टेप 3 – ब्लॉग चे नाव निवडणे 

यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉग चे  ब्लॉग चे नाव निवडून घ्यावे. तुम्ही तुमच्या ब्लॉग ला जे नाव देत असाल ते लिहून घ्यावे. 

ब्लॉग चे नाव निवडणे

 #स्टेप 4 – ब्लॉग चे URL निवडणे 

यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉग चे URL टाकाय चे असते, म्हणजेच ब्लॉग चे URL वेब पत्ता टाकून घ्यावे. आणि URL लिहताना त्याच्या शब्दा मध्ये Space देऊ नये. 

ब्लॉग चे URL निवडणे

 #स्टेप 5 – ब्लॉग डिस्प्ले नाव 

या मध्ये तुम्हाला तुमचे ब्लॉग जे नाव दाखवायचे आहे म्हणजेच वेबसाईट नेम टाकावे लागेल 

डिस्प्ले नाव ऍड करणे

 #स्टेप 6  – ब्लॉग ची थीम्स निवडणे

ब्लॉगर मध्ये काही टेम्प्लेट्स आणि थिम्स दिलेले असतात त्यापैकी जी थिम्स तुम्हाला आवडेल ती सिलेक्ट करून घ्यावे. नंतर तुम्ही थिम्स बदल करू शकता. 

ब्लॉग ची थीम्स निवडणे

 #स्टेप 7 – नवीन पोस्ट तयार करणे

आता आपल्याला  स्क्रीन वर ब्लॉगर चे डॅशबोर्ड दिसेल. 

नवीन पोस्ट तयार करणे

आपण आता डॅशबोर्ड वरील Create New Post या पर्यायावर क्लिक करून ब्लॉग ची पहिली पोस्ट तयार करू शकता. 

 #स्टेप 8 – नवीन पोस्ट पब्लिश करणे 

या मध्ये तुम्ही तुमची तयार केलेली पहिली पोस्ट पब्लिश करू शकता. पुढील इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आम्ही पोस्ट पब्लिश केलेली आहे. 

नवीन पोस्ट पब्लिश करणे

अशा पद्धतीने आपल्याला ब्लॉगर वर ब्लॉग तयार करता येतो. 

FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ब्लॉगर मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?

1. फ्री ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला www.blogger.com या वेबसाईट वर जीमेल अकाउंट ने साइन अप करून घ्यावे. 
2. नंतर ब्लॉग चे नाव टाईप करावे आणि Next  बटण वर क्लिक करावे. 
3. आता ब्लॉग पत्ता किंवा URL समोरील रकान्यात प्रविष्ट करावे. आणि Save या बटण वर क्लिक करावे. 
अश्या प्रकारे आपला ब्लॉग तयार होईल यामध्ये तुम्ही New Post वर क्लिक करून ब्लॉग पोस्ट पब्लिश करू शकता.  

फ्री मध्ये ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म कोणते?

वर्डप्रेस । WORDPRESS
ब्लॉगर । BLOGGER
विक्स । Wix

निष्कर्ष

मला आशा आहे कि वरील दिलेल्या स्टेप फोल्लो करून स्वतःचा फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा (Create Free Blog in Marathi) याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. परंतु तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कृपया आम्हाला खालील असलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा.

तसेच या ब्लॉग ला आणखी उपयुक्त करण्यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजेच मी भविष्यात या ब्लॉग ला आपण दिलेल्या सूचनांनुसार अद्ययावत करू शकेल.  

धन्यवाद !!!

Leave a Reply

This Post Has 16 Comments

  1. Charudatta

    छानच आहे. माहिती सुद्धा चांगली आहे. तुम्हाला शुभेच्छा.

      1. Vijay Hajare

        धन्यवाद सर🙏🙏

        1. Shweta

          मराठीतून ब्लॉग तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे विषय निवडता येतात?

          1. Marathi Spirit

            तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लॉग सुरु करण्यासाठी कोणताही विषय निवडू शकता, तसेच खालील प्रमाणे काही मराठी ब्लॉग टॉपिक दिले आहेत यामध्ये तुम्ही मराठी ब्लॉगिंग सुरु करू शकता.
            Lifestyle, Personal Development, Product reviews, Latest News, Cooking, Technology, Online Computer Course, Motivational & Inspirational Stories, Education, Health, Fashion, Biography Blog.

  2. Prakash

    Super Article sir

    माझ्या वेबसाईटची लिंक

  3. RUPALI

    TUMHI MAHITI KHUP CHAN DILI
    PAN MALA MARATHI FONT SELECT NAHI HOTE AAHE
    MI FORNT MADHE JAUN DEVNAGARI SELECT KELE PAN TYPE KARTANA PUNHA ENGLISH YETE AAHE

  4. योगिता गावडे

    इथले blog मी copy paste करू शकते का?

    1. Marathi Spirit

      ब्लॉग कॉपी केले तर ते Google Guideline नुसार चुकीचे आहे. तुम्ही स्वतः Write करा आणि Referance म्हणून माहिती वाचू शकता.

  5. का.ना.देशमुख

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.🙏

  6. Sharan

    Images canva madhe create karta ka?size kya thewta 1200*675?