नमस्कार मित्रांनो, मराठी स्पिरिट वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे.
आजच्या लेखामध्ये आपण YouTube Channel कसे तयार करतात हे पाहणार आहोत. युट्युब सर्वांच्या परिचयाचे आहे, दररोज लोक व्हिडीओ पाहण्यासाठी युट्युब चा वापर करतात. YouTube हा जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे.
तसेच Youtube ला जगातील दुसऱ्या नंबर चे सर्च इंजिन म्हटले जाते. युट्युब या प्लैटफॉर्म वर सर्च केले असता आपल्याला एका गोष्टीसाठी खूप व्हिडिओ उपलब्ध होतात. तसेच Youtube वर आपल्याला शैक्षणिक, तांत्रिक, विज्ञान आणि इतर बरेच विषया संदर्भात विडिओ उपलब्ध आहेत.
आजच्या या लेखामध्ये आपण युट्युब चॅनेल काय आहे ? आणि युट्युब चॅनेल कसे तयार करायचे या बद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया. तसेच युट्युब हा एक पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग सुद्धा आहे या मध्ये तुम्ही युट्युब वर विविध प्रकारचे व्हिडीओ अपलोड करून खूप पैसे कमवू शकता. पण युट्युब वर व्हिडीओ अपलोड करायचे असतील तर आपल्याला पहिले एक युट्युब चॅनेल बनवावे लागते.
तर चला पाहूया युट्युब चॅनेल कसे बनवायचे . How to Start YouTube Channel in Marathi
युट्युब चॅनेल काय आहे?
जेव्हा आपल्याला Youtube वर व्हिडीओ अपलोड करायचे असतात, तेव्हा आपल्याला एक Channel तयार करावे लागते त्यालाच आपण युट्युब चॅनेल म्हणतो. युट्युब चॅनेल मध्ये केवळ व्हिडीओ सामग्रीचा च वापर केल्या जातो. युट्युब चॅनेल मध्ये व्हिडीओ टाकणाऱ्याना YouTubers असे म्हणतात.
तसेच YouTube वर कोणतीही व्यक्ती Channel तयार करू शकते. Youtube वर Channel तयार करण्यासाठी फक्त एक G-mail अकाऊंट ची आवश्यकता असते. तसेच युट्युब चॅनेल वर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही.
जर आपण युट्युब चॅनेल वर अपलोड केलेले व्हिडीओ लोकांना आवडत असतील आणि आपल्या व्हिडीओ ला मोठ्या प्रमाणात View येत असतील तर आपण Youtube Channel मधून Earning सुद्धा करू शकतो. या युट्युब चॅनेल च्या साहाय्याने आपण आपल्याजवळ असलेले ज्ञान पूर्ण जगातील लोकां सोबत Share करू शकतो.
हे पण वाचा – लिंक्डइन म्हणजे काय?
यूट्यूब चैनल कसे तयार करावे | How to Create Youtube Channel
स्वतःचे युट्युब चॅनेल तयार करण्यासाठी एक G-mail अकाऊंट ची आवश्यकता असते. जर तुम्ही पूर्वी G-mail तयार केला असेल तर तो सुद्धा चालेल, जर नसेल तर नवीन तयार करून घ्यावा. Beginners Guide to Start Youtube Channel in Marathi and Earn Money
Step By Step Guide YouTube Channel कसे तयार करायचे मराठी मध्ये.
१. सर्वात प्रथम तुम्ही YouTube ओपन करून घ्या.
२. नंतर तुम्हाला उजव्या बाजूला Sign in वर क्लिक करा.
३. Youtube मध्ये तुम्ही तुमचे Gmail अकाउंट वापरून Sign in करून घ्यावे.
४. जेव्हा तुम्ही Gmail अकाऊंट टाकून Sign in करता तेव्हा तुम्हाला गूगल तुमच्या Gmail अकाउंट नुसार तुमचे युट्युब चॅनेल नाव suggest करते. तेव्हा तुम्ही Suggest केलेले नाव सुद्धा ठेवू शकता. किंवा तुम्हाला दुसऱ्या नावाने युट्युब चॅनेल बनवायचे असतील तर तुम्ही नाव बदलू शकता.
५. आता तुमचे युट्युब चॅनेल तयार झाले आहे. यामध्ये तुम्हाला विडिओ अपलोड करता येतात.
युट्युब चॅनेल मधील सर्वात महत्वाचा बाबी
जेव्हा आपण युट्युब चॅनेल मध्ये व्हिडीओ अपलोड करतो तेव्हा तो व्हिडिओ दुसऱ्या व्यक्ती चा कॉपी केलेला नसावा. जर आपण कॉपी केलेला व्हिडीओ आपल्या YouTube Channel मध्ये अपलोड केला तर आपल्या Channel वर YouTube Copyright समस्या निर्माण होते. त्यामुळे आपले Channel सुध्दा Ban होऊ शकते. म्हणूनच युट्युब चॅनेल वर व्हिडीओ टाकताना ते Unique असायला हवे.
तसेच युट्युब चॅनेल वर वादविवाद होतील असे कोणत्याही प्रकारचे Content टाकू नये. अशाचप्रकारे YouTube चे काही नियम आहेत ते वाचून घ्यावे, आणि त्यांचे पालन करावे.
हे पण वाचा – यूट्यूब मधून पैसे कसे कमवायचे
युट्युब चॅनेल तयार केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या.
युट्युब चॅनेल तयार करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. केवळ काही मिनिटात YouTube Channel तयार करता येते. परंतु युट्युब चॅनेल तयार झाल्यानंतर पुढील काही गोष्टींचे पालन करावे.
1) युट्युब चॅनेलतयार केल्यानंतर त्या Channel साठी एक उत्तम Logo तयार करावा, Channel ला Logo असला तर Channel प्रोफेशनल दिसते.
2) युट्युब चॅनेल Art’s आपल्या Channel वर येणाऱ्या लोकांना आकर्षित करते, आणि आपल्या Channel ला आकर्षक बनवते. Channel Art’s Design करताना ते आकर्षक आणि योग्य Size वापरून तयार करावे.
3) युट्युब चॅनेल About मध्ये आपल्याला Channel च्या संदर्भात म्हणजेच Channel कशा संदर्भात आहे आणि आपण Channel मध्ये कोणती सामग्री अपलोड करणार आहोत या बद्दल माहिती द्यावी.
4) युट्युब चॅनेल मध्ये आपल्याला आपल्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम लिंक्डइन अश्या सोशल प्रोफाइल च्या लिंक सुद्धा ऍड करू शकतो.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सर्वात प्रथम युट्युब मध्ये जी मेल अकाउंट वापरून साइन इन करून घ्यावे.
आता प्रोफाइल च्या आयकॉन वर क्लिक करून सेटिंग या पर्यायावर क्लिक करावे.
क्रीएट न्यू चॅनल वर क्लिक केल्यानंतर चॅनल चे नाव टाईप करावे आणि क्रिएट चॅनल वर क्लिक करावे.
अश्या प्रकारे युट्युब चॅनल तयार झाल्यानंतर त्या चॅनल मध्ये डिस्क्रिपशन प्रोफाइल तसेच युट्युब चॅनल बँनर तयार करून घ्यावे.
युट्युब मधून किती पैसे विथड्रॉव करू शकतो?
युट्युब व्हिडीओ मध्ये दिलेल्या जाहिरातीतून कमाई सुरु होते. हि सर्व कमाई गूगल ऍडसेन्स मध्ये स्टोर होत असते आणि जेव्हा 100$ किंवा यापेक्षा अधिक रक्कम जमा होईल तेव्हा तुम्हाला या पैशाचा विथड्रॉव करता येईल.
निष्कर्ष : युट्युब चॅनेल कसे सुरु करावे
युट्युब हा जगातील सर्वात मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे आणि युट्युब ला जगातील दुसऱ्या नंबर चे सर्च इंजिन सुद्धा म्हटले जाते. या युट्युब चॅनेल तयार करून आपण मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो. तुम्हाला आमचा युट्युब चॅनेल म्हणजे काय? व युट्युब चैनल कसे तयार करावे (How to Create Youtube Channel in Marathi) हा लेख कसा वाटला या संदर्भात नक्कीच कंमेंट करा.
तसेच तुम्हाला युट्युब चॅनेल तयार करण्याचा बाबतीत काही प्रश्न किंवा समस्या असतील तर आमच्या सोबत शेयर करा. आणि आमचा ब्लॉग तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
अती सुंदर
🙏धन्यवाद!🙏
यु ट्यूब वरती व्लोग कसा तयार करायचा
मी youtube channel बनवायला आहे पण त्याला एडिट करता येत नाही.
चॅनलचे नाव बदलायचे आहे
लोगो टाकायचा आहे
याबद्दल माहिती हवी आहे
YouTube चॅनल सेटिंग मध्ये तुम्ही चॅनल नेम आणि लोगो चेंज करू शकता