VPN म्हणजे काय? | What is VPN in Marathi

VPN म्हणजे काय

आज प्रत्येक जण ह्या डिजीटल युगात आपल्या स्मार्टफोनचा तसेच मोबाईल इंटरनेटचा वापर इंटरनेटवरून माहीती प्राप्त करण्यासाठी तसेच आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी करतो. याचशिवाय आपण आँनलाईन खरेदी वगैरे करण्यासाठी वेगवेगळया शाँपिंग वेबसाईटचा देखील उपयोग करत असतो. आणि तिथे आपल्याला आपली काही वैयक्तिक माहीती देखील द्यावी लागत असते. जसे की आपला बँक खाते क्रमांक वगैरे… आपली ही वैयक्तिक माहीती गोळा करून तिचा दूरूपयोग देखील हँकर्स द्वारा केला जात असतो.

पण आता आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करताना तसेच कोणतेही आँनलाईन काम करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये आणि हे सर्व शक्य झाले आहे ते व्हीपीएन नेटवर्क मुळे.

म्हणुन आजच्या लेखात आपण ह्याच व्हीपीएन विषयी सविस्तरपणे माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

VPN म्हणजे काय? | What is VPN in Marathi

व्हीपीएन ही एक नेटवर्कची अशी सिस्टम आहे ज्यामुळे कोणतीही अनोळखी व्यक्ती खासकरून हँकर्स वगैरे आपला प्रायव्हेट डेटा प्राप्त करण्यापासून रोकु शकतो. व्हीपीएन चा वापर मोठमोठ्या कंपन्या तसेच संस्था आपला डेटा हँकर्सपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी करत असतात.

व्हीपीएन चा फुल फाँर्म Virtual Private Network हा आहे. 

VPN चा वापर फ्री मध्ये करता येतो तसेच पैसे देऊन सुद्धा VPN सर्व्हिस वापरता येते, जर फ्री मध्ये VPN सर्व्हिस घेतली तर काही मर्यादित फिचर्स वापरता येतील आणि प्रीमियम घेतले तर खूप सारे फीचर्स उपलब्ध होतील. 

VPN चे प्रकार | Type of VPN in Marathi

  1. Site to Site VPN

साईट टु साईट व्हिपीएन हा एक असा व्हिपीएनचा प्रकार आहे, ज्याचा वापर करताना आपल्याला किंवा मोठमोठ्या कंपनी तसेच संस्थेला कोणत्याही एका निश्चित स्वरुपाच्या लाईनचा वापर करावा लागत नसतो. कारण ह्या नेटवर्क सिस्टममध्ये अशी काही सिस्टम तयार केलेली असते, की ज्यामुळे एकाच संस्थेच्या आपल्या वेगवेगळ्या बनवलेल्या साईट्स एकमेकांना जोडण्याचे काम केले जात असते.

  1. PPTP VPN | Point to Point Tunneling Protocol 

पीपीटीपी ही एक अशी नेटवर्क सिस्टम आहे ज्यात एका नोडकडुन दुसऱ्या नोडकडे म्हणजेच एका केंद्राकडुन दुसऱ्या केंद्राकडे संदेश पाठविला जात असतो. आणि ह्यामुळे आपल्याला म्हणजेच सेंडरला आपला डेटा तसेच संदेश एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पाठवता येत असतो.

  1. IPs VPN | Internet Protocol Security 

ह्या व्हीपीएन नेटवर्कचा फुल फाँर्म आहे (Internet Protocol Security VPN) हे व्हिपीएन मुख्यकरून इंटरनेट प्रोटोकाँल ट्रँफिकसाठी विशेषत बनवले गेले आहे.

>> हे पण वाचा – Wi-Fi म्हणजे काय? संपूर्ण माहिती


व्हिपीएन चे फायदे | Advantages of VPN

  • व्हीपीएनचा वापर करून आपण कोणतीही अशी वेबसाईट जी ब्लाँक करण्यात आली आहे ती देखील सहजपणे ओपन करू शकत असतो.
  • व्हिपीएनचा वापर करून आपण आपली लोकेशन जिथे आपण सध्या उपस्थित आहे ती न दाखवता आपण इतर ठिकाणी आहे हे दाखवण्याकरिता चेंज सुदधा करू शकतो.
  • व्हीपीएन सर्विसचा वापर आपण दोन पद्धतीने करू शकतो एक फ्रि मध्ये किंवा पैसे भरून.
  • आपला डेटा आपण हँकर्सपासुन ह्यामुळे सुरक्षित ठेवू शकतो.

व्हिपीएन मुळे होणारे नुकसान | Disadvantages of VPN

  • आपल्याला वाटते की व्हीपीएन सर्विसचा वापर करत असल्यामुळे आपली लोकेशन कोणीच ट्रँक करू शकत नाही. पण हा आपला गैरसमज आहे. कारण जरी आपण आपली करंट लोकेशन व्हीपीएनद्वारे चेंज करू शकतो, पण व्हिपीएनच्या सर्वरमधील आपला डेटा हा जसाच्या तसा राहत असतो. ज्यामुळे आपण पकडले जाऊ शकतो.
  • बाजारामध्ये अशा देखील व्हीपीएन सर्विस आज उपलब्ध आहेत ज्या आपण फ्री मध्ये वापरू शकतो. पण आपण फ्री मध्ये घेतलेल्या सर्विस मध्ये आपल्या डेटाचा गैरवापर करण्याची देखील भीती असते. कारण आपला डेटा अँक्सिस त्यांनी प्राप्त केलेला असतो.
  • आणि सगळयात महत्वाचे म्हणजे जेव्हा कधीही आपण व्हिपीएन सर्विसचा वापर करत असतो तेव्हा आपल्या इंटरनेटचा वेग हा कमी होत असतो. ज्यामुळे आपले नेट जोरात चालत नसते.
  • व्हीपीएनचा वापर केल्यामुळे हँकरला ILLEGAL काम करण्यास म्हणजेच आपला डेटा चोरी करण्यास जास्त फायदा होत असतो. जे आपल्यासाठी खुप खतरनाक ठरू शकते.

सर्वोत्तम व्हिपीएन सर्विसची निवड कशी करावी?

कोणत्याही व्हिपीएन सर्विसची निवड करत असताना सगळयात आधी हे बघावे की आपण जी सर्विस घेतो आहे तिची किंमत किती आहे? तसेच त्यापेक्षा कमी किंमतीत उत्तम प्रकारची कोणती सर्विस आपल्याला मिळु शकते हे बघावे.

आणि मग सगळयांची नीट तुलना करून कमी किंमतीत एक चांगल्या तसेच उत्तम व्हिपीएन सर्विसची निवड आपण करायला हवी.


टाँप व्हिपीएन 2021 | Top VPN in Marathi

  • NordVPN
  • ExpressVPN
  • Perfect-Privacy 
  • CyberGhost 
  • TorGuard 
  • Hide Me 
  • ProtonVPN
  • PrivadoVPN 
  • VyprVPN 
  • Surf Shark
  • IPVanish 
  • F-Secure Freedome 

VPN नेटवर्क प्रोटोकाँलचे प्रकार

  • IP Security
  • PPTP | Point-To-Point Tunneling Protocol 
  • L2TP | Layer 2 Tunneling Protocol
  • SSL | Secure Sockets Layer 
  • SSH | Secure Socket Shell
  • OpenVPN
  • L2TP/IPSec

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

VPN चा फुल्ल फॉर्म काय आहे?

व्हिपीएन चा फुल फाँर्म – Virtual Private Network 

VPN नेटवर्क प्रोटोकाँल काय असतो?

व्हिपीएन नेटवर्क प्रोटोकाँल हा एक नियम असतो जो सर्वर आणि कस्टमर (क्लाईंट) यांच्यामध्ये कनेक्शन तयार करण्यासाठी वापरला जातो. याने क्लाईंट म्हणजेच कस्टमर यांच्यामध्ये सुरक्षितपणे डेटाची देवाणघेवाण करण्याचे काम होत असते.

VPN चे प्रमुख काम काय असते?

व्हिपीएन सर्व्हिसचे महत्वाचे आणि प्रमुख काम असते आपल्या नेटवर्कला सुरक्षितता प्रदान करणे. याचसोबत व्हिपीएन हे आपली रिअल आयडेंटीटी तसेच लोकेशन लपवण्याचे काम देखील करत असते. म्हणुन जास्तीत जास्त हँकर इनलिगल (ILLEGAL) काम करण्यासाठी याचा वापर करत असतात.


अंतिम निष्कर्ष 

आम्ही तुम्हाला वरील प्रमाणे VPN म्हणजे काय? आणि VPN चे फायदे / तोटे आणि व्हिपीएन चे प्रकार (VPN Meaning in Marathi) अश्या प्रकारची व्ही पी एन बद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती प्रदान केलेली आहे.

जर तुम्हाला वरील माहिती उपयोगी आणि उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रांना लेख शेयर करा आणि तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली याबद्दल कमेंट करायला विसरू नका.

🙏किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!🙏

Leave a Reply