डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Digital Marketing Meaning in Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing in Marathi) याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती जाणून जाणून घेऊया.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? । Digital Marketing in Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची इंटरनेटच्या साहाय्याने केली जाणारी मार्केटिंग होय. डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग डिजिटल तंत्राचा वापर करून केल्या जाते. तसेच या मार्केटिंग च्या माध्यमातून नवनवीन ग्राहकापर्यंत आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस ला पोहचविणे सर्वात सोपे आणि सुलभ आहे.

“इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.”

“एखाद्या (product) वस्तूला किंवा सेवेला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून Promote करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.”

For Example: आपल्या मोबाइलवर येणाऱ्या Ads (जाहिराती) किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या जाहिराती ह्या डिजिटल मार्केटिंग चाच भाग आहे.

डिजिटल मार्केटिंग ला इंटरनेट मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग असे देखील म्हणतात.

आजच्या इंटरनेट च्या युगामध्ये डिजिटल मीडिया, सोशल मीडिया यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, तसेच ऑनलाईन शॉपिंग आणि प्रॉडक्ट सर्व्हिसेस ची खरेदी विक्री देखील ऑनलाईन केली जाते. म्हणूनच ऑनलाईन मार्केटिंग खूप गरजेची आणि महत्वाची आहे.

तसेच आजच्या या ऑनलाईन मार्केटिंग च्या युगात प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस ला ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी योग्य मार्केटिंग ची गरज असते. म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी कंपन्या डिजिटल मार्केटिंग वर जास्त भर देतात. मोबाईल, लॅपटॉप, संगणक, इंटरनेट इत्यादी साधनांचा वापर करून आपण घरी बसल्या डिजिटल मार्केटिंग करू शकतो.


डिजिटल मार्केटिंग चे प्रकार ( Types of Digital Marketing)

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सर्वात महत्वाचे साधन म्हणजे इंटरनेट. या मार्केटिंग मध्ये Social Media Marketing, Email Marketing, Affiliate Marketing, PPC Marketing, Apps Marketing या सर्व प्रकारच्या मार्केटिंग चा समावेश असतो.

डिजिटल मार्केटिंग बद्दल संपूर्ण मागदर्शन

1) सर्च इंजिन ऑप्टिमायझेंशनSEO

SEO म्हणजेच Search Engine Optimization होय, हा डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी एक सर्वात महत्वाचा आणि गरजेचा असलेला घटक आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरून आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला Search Engine मध्ये उच्च रँकिंग मिळविण्यासाठी कार्य केल्या जाते.

(SEO) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे महत्वाचे घटक

On Page SEO । ऑन पेज एस. इ. ओ.

Off Page SEO । ऑफ पेज एस. इ. ओ.

Technical SEO । टेकनिकल एस.ई.ओ.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेंशन (SEO) हि एक प्रक्रिया आहे ज्याच्या साहाय्याने आपली वेबसाईट सर्च इंजिन मध्ये ऑप्टिमाइझ केल्या जाते. आपल्या वेबसाईट ला उच्च रँक मिळवणे आणि वेबसाईट मधील ट्रॅफिक वाढवणे हे SEO चे मुख्य उद्दीष्टे असते. 


2) सोशल मीडिया मार्केटिंगSMM

सोशल मीडिया हा डिजिटल मार्केटिंगचा एक महत्वाचा भाग बनला आहे. या मीडिया च्या साहाय्याने आपले प्रॉडक्ट्स् किंवा सर्व्हिसेस ला प्रमोट करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रॉडक्ट्स् विषयी ग्राहकां चे मत सुद्धा जाणून घेऊ शकतो. 

सोशल मीडिया हे जाहिराती चे प्रभावी माध्यम आहे. यामध्ये मार्केटिंग करण्याचे महत्वाचे साधन म्हणजे (Ads) जाहिराती होय. Facebook, Instagram वर मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिसतात. तसेच आपण सोशल मीडिया मध्ये Paid Promotion मार्केटिंग करू शकतो. तसेच या माध्यमातून एखादी व्यक्ती हजारो लोकांसमोर आपले मत विचार मांडू शकते.


3) E-Mail Marketing

ई-मेल मार्केटिंग हा एक डिजीटल मार्केटिंग चा एक प्रमुख प्रकार आहे. ज्यात आपण आपल्या उद्योग व्यवसायासाठी डिजीटल पद्धतीचा उपयोग करून ईमेल च्या माध्यमातून मार्केटिंग करत असतो.

या मार्केटिंग मध्ये प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ची ई-मेल च्या माध्यमातून मार्केटिंग करणे आणि प्रमोशन करणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय. तसेच आपल्या ग्राहकांना नवीन प्रॉडक्ट्स किंवा नवनवीन Offers ची माहिती देण्यासाठी ई-मेल मार्केटिंग एक सोपे माध्यम आहे.


4) Youtube Marketing

युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिडीओ मार्केटिंग केल्या जाते. ज्या विषयाची मार्केटिंग करायची असेल त्या विषयी विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करून युट्यूब चॅनल मध्ये अपलोड करावे.

earn money on youtube by uploading videos marathi

युट्यूब हा सर्वात लोकप्रिय असलेला व्हिडीओ मार्केटिंग प्लैटफॉर्म आहे. युट्यूब वर मोठ्या प्रमाणात वापरकर्ते उपलब्ध आहेत, तसेच या मध्ये जाहिरात (Advertisement) च्या माध्यमातून सुध्दा मार्केटिंग केल्या जाते. या प्लॅटफॉर्म मधून आपल्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस संदर्भात ग्राहकांच्या प्रतिक्रिया सुद्धा मिळवू शकतो.

पुढील लिंक ला क्लिक करून मराठी स्पिरीट युट्युब चॅनल ला Follow करू शकता.


5) Affiliate Marketing

Affiliate Marketing हा एक प्रकारचा प्रोग्रॅम आहे ज्याला जॉईन करण्यासाठी आपल्याला अफिलिएट प्रोग्रॅम प्रदान करणाऱ्या वेबसाईट वर अकाऊंट तयार करून हा प्रोग्रॅम जॉईन करून घ्यावा आणि नंतर आपण या प्रोग्रॅम च्या मदतीने विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवेची मार्केटिंग करता येईल.

खालील काही कंपन्या एफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम प्रदान करतात. 


6) PPC Marketing | Pay Per Click

PPC म्हणजे Pay Per Click होय, हा एक सर्च इंजिन मार्केटिंग SEM चा प्रकार आहे. यामध्ये आपण गूगल Adwords च्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्ट्स् ची किंवा सर्विसेस ची जाहिरात करतो. PPC मध्ये जेवढे ग्राहक आपल्या जाहिरातीवर क्लिक करतील त्यानुसार आपला जाहिरात खर्च होईल. 

ppc result in marathi
organic result in marathi

खालील उदाहरणात सर्व जाहिराती या PPC प्रकारच्या जाहिराती आहेत. अशा प्रकारे जाहिराती च्या माध्यमातून PPC मार्केटिंग केली जाते. 


7) Mobile Marketing

आजच्या इंटरनेटच्या काळात स्मार्ट फोन वापरकर्त्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. म्हणून या मोबाइल च्या माध्यमातून मार्केटिंग केल्या जात आहे. मोबाइल मार्केटिंग मध्ये लोकांना SMS किंवा Whatsapp Messages पाठविले जातात.

Make Money form Mobile Apps in Marathi

या Messages मध्ये विविध कंपन्या त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल किंवा प्रॉडक्ट्स् बद्दल माहिती प्रदान करतात. मोबाइल चा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे म्हणूनच मोबाइल मार्केटिंग खूप महत्वाची आहे.


8) Apps Marketing

अँप्स मार्केटिंग करण्यासाठी सर्वात आधी अँप्स डेव्हलोप करावे लागेल आणि नंतर या अँप्स ला विविध लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला कि या अँप्स मध्ये मार्केटिंग साठी वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाच्या जाहिराती तसेच बँनर, फ्लेक्स आणि Adds यांचा समावेश केला जातो यालाच आपण अँप्स मार्केटिंग म्हणू शकतो. 

अँप्स मार्केटिंग हा आजच्या युगातील डिजिटल मार्केटिंग करण्याचा सर्वात उत्तम मार्ग समजला जातो. कारण आजकाल सर्वांजवळ स्मार्ट फोन्स आहेत आणि या  फोन्स मध्ये लोक विविध प्रकारची अँप्स डाउनलोड करतात. या अँप्स मध्ये शॉपिंग अँप्स, गेमिंग अँप्स आणि इतरही खूप प्रकारचे अँप्स मोबाईल मध्ये डाउनलोड केले जातात.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

डिजिटल मार्केटिंग काय आहे?

एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला डिजिटल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रमोट करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी मार्केटिंग म्हणजे Digital Marketing होय. 

टॉप डिजिटल मार्केटिंग स्किल्स कोणते?

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन । Search Engine Optimization
सोशल मीडिया मार्केटिंग । Social Media Marketing
सामग्री निर्मिती । Content Creation 
स्पर्धक विश्लेषण । Competitor Analysis
व्हिडिओ विपणन । Video Marketing

डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे?

डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कमविण्यासाठी पुढील काही मार्ग खूप महत्वाचे आहेत.
ब्लॉगिंग । Blogging
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन । SEO
ई-मेल विपणन । Email Marketing
वेब डिझायनिंग । Website Designing
मोबाईल मार्केटिंग । Mobile Marketing
कन्टेन्ट मार्केटिंग । Content Marketing
अफिलिएट विपणन । Affiliate Marketing
सोशल मीडिया विपणन । Social Media Marketing


निष्कर्ष । Digital Marketing Guide in Marathi

आम्ही आशा करतो की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? (Online Marketing Marathi) आणि इंटरनेट मार्केटींग कसे करावे हे चांगल्या तर्हेने समजलेच असेल. तसेच विवीध प्रकारची माहिती सुद्धा तुम्हाला मिळाली असेल.

परंतु जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कृपया आम्हाला खालील असलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा.

तसेच या ब्लॉग ला आणखी उपयुक्त करण्यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. म्हणजेच आम्ही भविष्यात या ब्लॉगला आपण दिलेल्या सूचनांनुसार अद्ययावत करू शकेल. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 11 Comments

  1. sk

    khup chan mahiti

  2. K B Mahajan

    It will be better If I can download or take print out of this useful artical

  3. subhash bhakte

    Very nice and important information. great

  4. Shaikh meenaj

    Thank you so much

  5. Mahendra

    Type of seo, black hat, white hat, grey hat ye seo type hai ya ON page OFF page ye wale

  6. Sneha

    Khup chan mahiti